Kalki 2898 AD हॉलिवूडलापण मागे टाकू शकतो हा प्रभासचा चित्रपट अमिताभ आणि दीपिका पदुकोनही आहे चित्रपटात

Kalki 2898 AD चित्रपटात असणार कमल हसन “कली” च्या भूमिकेत.

Kalki 2898 AD हा येत्या २७ जूनला प्रदर्शित होणार आतापर्यंत भारतीय सिनेमाच्या इतिहासात बनणारा पहिला सायन्स फिक्शन ऍक्शन चित्रपट आहे. सुरवातीला Kalki 2898 AD हा चित्रपट तेलगूमध्ये चित्रित करण्यात येणार होता पण नंतर काही दृश्ये हिंदीमध्ये चित्रित करण्यात आली.

Kalki 2898 AD या चित्रपटाचा ट्रेलर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेची सफर होईल जसा हॉलिवूडमध्ये “अवतार” चित्रपटासाठी एका वेगळ्या विश्वाची निर्मिती केली होती तसंच काही पोस्ट-अपोकॅलिप्टिक जगाचा सेट या चित्रपटासाठी उभारण्यात आलेला होता. हिंदू धर्मग्रंथावर आधारित असलेल्या Kalki 2898 AD या चित्रपट अमिताभ बच्चन, कमल हसन, प्रभास, दीपिका पदुकोण, दिशा पटानी आणि ब्रम्हानंदम यांच्या प्रमुख भूमिका आहे.

Kalki 2898 AD
Credit :- Google Kalki 2898 AD

जवळपास चार वर्षानंतर येतोय Kalki 2898 AD :-

Kalki 2898 AD या चित्रपटाची पहिल्यांदा घोषणा झालेली फेब्रुवारी २०२० मध्ये पण COVID-19 च्या महामारीमुळे एक वर्षाचा विलंब झाला पुढे मग २०२१ मध्ये रामोजी फिल्मसिटी मध्ये पोस्ट-अपोकॅलिप्टिक युगाचा सेट उभारून चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरवात झाली. Kalki 2898 AD हा सगळ्यात महागड्या चित्रपटापैकी एक चित्रपट असल्यामुळे याच्या निर्मितीला जवळपास ६०० कोटींपेक्षा जास्त खर्च झाल्याचं सांगण्यात येतंय तब्बल ३ वर्षे चित्रीकरण केल्यानंतर २०२४ मध्ये चित्रीकरण पूर्ण झालं. Kalki 2898 AD हा चित्रपट कल्की सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पहिला एक्शन चित्रपट असून पुढील वर्षात त्याचे वेग-वेगळे भाग येतील यात शंका नाही.

हेपण वाचा :- MUNJYA BOX OFFICE COLLECTION DAY 13: १३ व्या दिवशीपण “मुंज्या” चा बॉक्स ऑफिसवर धमाका कायम

Kalki 2898 AD चित्रपट असं वेगळं काय आहे ?

Kalki 2898 AD या चित्रपटाचे शीर्षक हिंदू पुराणिक धर्मग्रंथावर आधारित असलेल्या भगवान विष्णू यांच्या कलियुगातील “कल्की” अवतारावर आधारित आहे. महाभारत युद्धानंतर कलियुगाची सुरवात झाली असे मानले जाते तश्याच प्रकारचा सेट Kalki 2898 AD चित्रपटासाठी उभारला आहे. जसं कलियुगात असुरांचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंना “कल्की” अवतार घ्यावा लागतो तशीच काहीशी कथा Kalki 2898 AD चित्रपटाची असेल असं एकंदरीत चित्रपटाच्या ट्रेलरवरून दिसतंय.

Kalki 2898 AD चित्रपटामध्ये मुख्य खलनायकाची भूमिका “कमल हसन” करत असून “प्रभास” चित्रपटाचा नायक आहे. आतापर्यंत बॉलीवूडमध्ये चक्क हॉलिवूडला टक्कर देईल अश्या धाटणीचा एकही सिनेमा नव्हता पण Kalki 2898 AD हा चित्रपट ते करू शकतो. Kalki 2898 AD चित्रपटामध्ये वापरले गेलेले CGI आणि VFX इफेक्टस तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातील. Kalki 2898 AD या चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांची चित्रपट बनवण्याची शैली हि काही वेगळीच आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण जर सांगायचं झालं तर Kalki 2898 AD हा चित्रपट.

Kalki 2898 AD चा ट्रेलर पहिला का ?

Credit :- Vyjayanthi Network Kalki 2898 AD

Kalki 2898 AD चित्रपटाची स्टारकास्ट कशी आहे :-

Kalki 2898 AD चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत प्रभास, अमिताभ बच्चन, दिशा पटानी, राणा डुग्गुबाती, कमल हसन आणि ब्रह्मनंदम आहेत त्याशिवाय दालकीर सलमान, अनंत शर्मा, कीर्ती सुरेश, शास्वत बॅनर्जी देखील आहेत. Kalki 2898 AD चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांचे असून चित्रपटाला संतोष नारायण यांनी संगीत दिलंय. Kalki 2898 AD चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी नितीन जिहानी चौधरी यांनी घेतली आहे आणि Kalki 2898 AD चित्रपटाचे संपादन कोटागिरी वेंकटेश्वर राव यांनी केले आहे.
Kalki 2898 AD चित्रपटाच्या ट्रेलरवरून चित्रपट बॉलीवूडचे आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडून काढेल असं एकंदरीत अंदाज चित्रपट समीक्षक दर्शवतायत. Kalki 2898 AD चित्रपटाचं पाहिलं गाणं “भैरव अँथेम” रिलीज केल्यानंतर काही मिनिटातच गाण्याला मिलियनमध्ये लाईक्स आणि कंमेंट्स आलेत.

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)

Kalki 2898 AD चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विनबद्दल जाणून घेऊया :-

नाग अश्विनच्या २०१९ मधल्या “महानती” चित्रपटाच्या यशानंतर अश्विनने सांगितले कि तो एका ओरिजिनल कथेवर खूप वर्षांपासून काम करतोय सुरवातीला त्याच्या या चित्रपटाचे नाव त्याने “प्रोजेक्ट K” ठेवले होते पण जस जसं त्याला चित्रपटासाठी एक एक पात्र मिळत गेलं तस त्याचा
हा ड्रीम “प्रोजेक्ट K” “Kalki 2898 AD” मध्ये निर्माण झाला.

Kalki 2898 AD या चित्रपटासाठी उच्य दर्जेचं तंत्रज्ञान आणि भविष्यात वापरली जाणारी वाहने दाखवणे गरजेचे होते त्यासाठी त्याने काही हायली ऍडव्हान्स टीम बनवली जी त्याला CGI आणि VFX मध्ये मदत करेल. एवढंच नाही तर त्याने प्रसिद्ध उद्योजक “आनंद महिंद्रा” याना भविष्यात वापरली जातील अशी ऍडव्हान्स वाहने बनवून देण्याबद्दल विनंतीदेखील केली.

तर तुम्हला Kalki 2898 AD चित्रपटाचा ट्रेलर बघून काय वाटतंय ?

खरंच Kalki 2898 AD बॉलीवूडचे सगळे रेकॉर्डस् मॉडेल का Kalki 2898 AD हा एक बिग बजेट फ्लॉप चित्रपट बनेल आम्हाला तुमच्या प्रत्रिक्रिया नक्की कंमेंट करून सांगा

Kalki 2898 AD

Table of Contents

Leave a Comment