Hindustani 2 : तब्बल २८ वर्षानंतर कमल हसन येतोय सेनापतीच्या अवतारात नक्की विषय काय जाणून घ्या ?

Hindustani 2

तुम्हाला कमल हसनचा साधारणपणे १९९६ साली आलेला Hindustani म्हणजेच Indian हा सिनेमा आठवतो का ? ज्यामध्ये कमल हसन एका अश्या मिलिटरी ऑफिसरच्या भूमिकेत होता जो अन्यायाच्या विरोधात काम करतो. कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्याला जागच्या जागी सजा द्यायची आणि ज्यावर अन्याय झालाय त्याला न्याय मिळवून द्यायचा अशी एकंदरीत त्या सिनेमाची कथा होती. Hindustani चित्रपट बघताना नेहमी वाटायचे कि या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येईल ते आणि तेच झालाय तेपण चक्क २८ वर्षानंतर. कमल हसनच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक असलेल्या Hindustani चा दुसरा भाग म्हणजेच Hindustani 2 चा ट्रेलर काल यूट्यूबवर आला आणि सगळ्यांच्याच लहानपणीचा Hindustani चित्रपट डोळ्यासमोर आला. या चित्रपटातदेखील कमल हसन सेनापतीच्या भूमिकेत आहे एक रिटायर्ड फ्रीडम फायटर जो भ्रष्टाचारी माणसांविरुध्द लढतो आणि अन्यायाला वाचा फोडतो.

Hindustani 2
Hindustani 2 Credit:- Google

चला जाणून घेऊया Hindustani 2 चित्रपटाबद्दल

Hindustani 2 हा मुख्यतः तामिळ भाषेतला चित्रपट असून चित्रपटाला दिग्दर्शित केलय एस.शंकर यांनी ज्यांनी चित्रपटाच्या संवाद लेखनाची जबाबदारी बी. जयमोहन आणि कबिलन वैरामुथू यांच्याबरोबर घेतली आहे. Hindustani 2 ची निर्मिती लायका प्रोडक्शन आणि रेड जायंट मुव्हीज यांनी केली असून हा चित्रपट Hindustani या १९९६ मध्ये आलेल्या कमल हसनच्या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. चित्रपटात आपल्याला कमल हसन बरोबर सिद्धार्थ, एस. जे. सुयश, रकुल प्रीत सिंग, बॉबी सिम्हा, विवेक, प्रिया भवानी शंकर, गुलशन ग्रोव्हर, सामुथिरकानी आणि नेदुमुदी वेणू देखील दिसतील.

या चित्रपटाची कल्पना २०१७ मध्ये सुरु केली होती चित्रपटाच्या शूटचे लोकेशन चित्रपटाची कथा तयार होईपर्यंत २०१९ उजाडलं. मग COVID-19 च्या महामारीमुळे चित्रपट सुमारे ४ वर्षे रखडला आणि या सगळ्या दिरंगाईनंतर Hindustani 2 शेवटी १२ जुलै २०२४ ला चित्रपटगृहात रिलीझ होणार आहे. एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक एस. शंकर यांच्या मते चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजे Hindustani 3 पण येऊ शकतो.

Hindustani 2 चित्रपटाचा ट्रेलर पहा
Hindustani 2 Trailer

हेपण वाचा :- MUNJYA BOX OFFICE COLLECTION DAY 19 : मुंज्याने १९ व्या दिवशी केले १०० कोटी पार १९ व्या दिवशी किती कमाई केली ?

Hindustani 2 चित्रपटाची स्टारकास्ट जाणून घेऊया

कमल हसन, सिद्धार्थ , राकुल प्रीत सिंग, बॉबी सिम्हा, विवेक, प्रिया भवानी शंकर, गुलशन ग्रोव्हर, सामुथिरकानी आणि नेदुमुदी वेणू अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटाला लाभली आहे. चित्रपटाला संगीत दिलय अनिरुद्ध रविचंदर यांनी. याआधी अनिरुद्ध यांनी कलाम हसनच्या विक्रम चित्रपटाला संगीत दिलं होतं आणि त्यामुळे कमल हसन आणि अनिरुद्ध यांची जोडी परत तिचं जादू या चित्रपटात करेल अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे.

Hindustani 2 चित्रपटाची थोडक्यात कथा काय असेल ?

Hindustani 2 चित्रपटात सेनापतीची भूमिका करणारा कमल हसन हा इंटरनेटवरील व्हिडिओद्वारे देशातील भ्रष्ट राजकारण्यांचा पर्दाफाश करणाऱ्या चित्रा वर्धाराजन म्हणजेच सिद्धार्थची मदत करण्यासाठी हॉंगकॉंगमधून भारत देशामध्ये येतो आणि त्याच्या त्याच शैलीमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांना तो धडा शिकवतो अशी एकंदरीत चित्रपटाची कथा आहे. Hindustani बघितलेल्या सगळ्या प्रेक्षकांमध्ये Hindustani 2 बद्दल फार उत्सुकता आहे.

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)

Hindustani 2
Hindustani 2 Credit :- Google

सिद्धार्थने एका मुलाखतीमध्ये सांगितले कि या चित्रपटासाठी कमल हसनला २ ते ३ तास मेकअप करायला आणि तेवढेच तास मेकअप काढायला लागायचे. शूटिंगमध्ये असताना मेकअप खराब होऊ नये त्यासाठी कमल हसन फक्त लिक्विड डाएट वर राहायचे कधी कधी तर त्यांनी पाणीसुध्दा घेतलं नाही. जसं कमल हसनने Hindustani च्या पहिल्या भागामध्ये प्रेक्षकांना त्याच्या एक्टिंग आणि लूकने चकित केलं होतं तसंच त्याने दुसऱ्या भागातपणं केलंय.
चित्रपटाचा ट्रेलर जसा यूटुबवर शेअर केला तसाच चाहत्यांनी त्यावर कंमेंटचा वर्षाव केला एकाने लिहीलंय कि “१०० करोड कंफर्म झाले” तर दुसर्याने लिहिलंय कि “कमल हसन जगातला सगळ्यात श्रेष्ठ अभिनेता आहे भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही.

तुम्ही Hindustani 2 चित्रपटाचा ट्रेलर पहिला आहे का ? जर पहिला असेल तर आम्हाला तुमच्या प्रत्रिक्रिया नक्की कळवा आणि चित्रपटाच्या लेटेस्ट घडामोडीसाठी चित्रपट चर्चला फॉलो करायला विसरू नका

Leave a Comment