will mirzapur season 3 become more successful than previous season :- मिर्झापूर सिझन ३ पहिल्या दोन सिजनपेक्षा जबरदस्त !

mirzapur season 3

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेब सिरीज ज्याची प्रेक्षक अक्षरशः वाट बघून बघून कंटाळून गेले ती म्हणजे mirzapur season 3 शेवटी एकदाची रिलीज होण्यासाठी सज्ज झालीय. पहिल्या दोन सीजनच्या घवघवीत यशानंतर सीरिजच्या निर्मात्यांनी तिसऱ्या सीजनसाठी प्रेक्षकांना खूप वाट बघायला लावली. २०२४ च्या सुरवातीला रिलीज होणार असं म्हणता म्हणता शेवटी काय तो सीरिजने जुलै उजाडलाच आणि ५ जुलैच्या मुहूर्तावर amazon prime वर सीरिज प्रदर्शित होणार आहे.

mirzapur season 3 च्या स्टोरीची सुरवात तिथूनच होते जिथे mirzapur season 2 चा शेवट झाला तो म्हणजे मुन्ना भैय्याच्या मृत्यने. mirzapur season 2 मध्ये नव्याने उदयास आलेले गुड्डू भैया, शरद ,बिना , गोलू , यांचा mirzapur season 3 मध्ये कशा प्रकारे रोल असेल आणि mirzapur च्या गादीचा खरा मालक कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे mirzapur सीरिजचे सर्व चाहते mirzapur season 3 सीजनसाठी खूपच उत्सुक आहेत.

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.) Mirzapur Season 3

Mirzapur season 3 चा ट्रेलर पाहिलात का ?

१९ मार्च २०२४ ला amazon prime ने बहुचर्चित Mirzapur season 3 च्या ट्रेलरचा एक प्रेव्हिएव लाँच केला आणि प्रेक्षकांमध्ये Mirzapur season 3 साठी एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली. येणारा Mirzapur season 3 हा नक्कीच Mirzapur च्या आतापर्यंतच्या सिजनपेक्षा जबरदस्त असणार हे प्रेव्हिएव वरून एकंदरीत समजत होतं. Mirzapur season 3 मध्ये बदला , ताकद आणि मिरझापूरची गादी कोण बळकावणार यासाठी चढाओढ दाखवली आहे.

Mirzapur season 3 नक्की रिलीज कधी होतोय ?

बहुप्रतिक्षित वेब सिरीज आधी २०२४ च्या सुरवातीलाच रिलीज होणार होती पण पोस्ट प्रोडक्शनच्या कामामुळे शेवटी ५ जुलै २०२४ ला amazon prime वर सिरीज रिलीज होणार आहे.

Mirzapur season 3 मध्ये कोणाची एन्ट्री कोणाची एक्सिट झाली ?

Mirzapur season 3 हि अशी एक वेब सिरीज आहे ज्याचे फॅन्स आख्या जगात आहे. पंकज त्रिपाठी, अली फझल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, विजय वर्मा , इशा तलवार , अंजुमन शर्मा , प्रियांशु पैंयुली, हर्षित शेखर गौर, राजेश तैलंग, शिबा चड्डा, मेघना मलिक आणि मनू ऋषी चड्डा यांनी मिर्झापूरचे दोन्ही सीजन गाजवले होते आणि चाहत्यांनीपण यांवर भरभरून प्रेम केलं. सीरिजमधले पंकज त्रिपाठी कालीन भैयांच्या रोलसाठी, रसिका दुगल बिना च्या रोलसाठी, अली फझल गुड्डू भैय्यासाठी आणि श्वेता त्रिपाठी गोलू च्या रोलसाठी एकदम परफेक्ट आहेत असे सगळ्यांना वाटले.

SUPERB ! KALKI 2898 AD BOX OFFICE COLLECTION :- फक्त ५ दिवसात ५०० करोड

हे सगळेच जण आपल्या mirzapur season 3 मध्ये बघायला मिळणार आहेत त्याशिवाय पंचायत वेब सिरीज गाजवलेला सगळ्यांचा फेव्हरटे जितेंद्र कुमारदेखील एका मुख्य भूमिकेत आपल्याला mirzapur season 3 मध्ये पाहायला मिळेल.
आतापर्यंत Mirzapur season गाजवलेल्या आपल्या सगळ्यांच्या आवडीचा मुन्ना त्रिपाठी म्हणजेच दिवेन्दु शर्माला मात्र Mirzapur season 3 मध्ये आपण सगळे मिस करू कारण तो mirzapur season 3 मध्ये नसणार आहे.

Mirzapur season 3 ला उशीर होण्याचं एक कारण म्हणजे पंकज त्रिपाठी

Mirzapur season 3 सिरीज उशिरा येण्यासाठी पोस्ट प्रोडक्शन बरोबरचं अजून एक कारण
होतं ते म्हणजे पंकज त्रिपाठी यांच्या खऱ्या आयुष्यातला चढ उतार. सीरिजच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या मेव्हण्याचं निधन झालं त्याचबरोबर त्यांची बहिणसुद्धा काही दुखापतीमुळे त्यांनी काही काळ आपल्या परिवारासोबत बिहारमध्ये घालवला ज्यासाठी त्यांना त्यांच्या फॅन्स आणि प्रोडक्शन टीमकडून खूप सपोर्ट मिळाला त्यामुळेच आपल्याला सगळ्यांना कालीन भैया Mirzapur मधलं पात्र बघायला मिळालं.

Mirzapur season 3 साठी सगळ्यात जास्त कोणी फीस घेतली जाणून घ्या

Mirzapur season 3 साठी कोणी किती फीस घेतली याचा डेटा तर अजून नाही आला पण मागच्या सीजनच्या डेटानुसार Mirzapur सीजन एक आणि दोन गाजवणाऱ्या रसिक दुगल म्हणजेच बीनाने प्रत्येक एपिसोड साठी जवळपास ३-५ लाख फीस घेतली आहे. एका रिपोर्टनुसार अली फझलने प्रत्येक एपिसोडसाठी १५-२० लाख चार्जेस घेतले आहेत. श्वेता त्रिपाठीने गोलू या पात्रासाठी जवळपास ३-५ लाख प्रति एपिसोड घेतले असून सगळ्यात जास्त चार्जेस घेतले आहेत आपले सगळ्यांचे लाडके कालीन भैया म्हणजेच पंकज त्रिपाठी यांनी. त्यांनी एका एपिसोडचे जवळपास १०-१२ करोड घेतले आहेत.

Mirzapur Season 3
Mirzapur Season 3 Credit :- Google Mirzapur Season 3

Mirzapur season 3 नेमकं काय दाखवण्यात येईल जाणून घ्या

Mirzapur season 2 मध्ये गुड्डू भैया मुन्ना ला मारतो आणि घायाळ कालीन भैयाला तसाच सोडून देतो त्यानंतर शरद शुक्ला घायाळ कालीन भैयाची सुटका करतो आणि मिर्झापूरच्या नवीन सीजनची स्टोरी तयार होते. Mirzapur season 3 मध्ये आपल्याला गुड्डू भैया, बिना भाबी, गोलू आणि सगळ्यात महत्तवाचं म्हणजे कालीन भैया या सगळ्यांमध्ये मिर्झापूरवर राज करण्यासाठी चढाओढ दिसणार आहे आणि हा मिर्झापूरचा शेवटचा सीजन असेल कि मेकर्स Mirzapur season 4 ची झलक यामधून दाखवणार हि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता राहिलीय.

तुम्ही Mirzapur Season 3 चा ट्रेलर बघितला आहे का ? बघितला असेल तर आम्हाला तुमच्या प्रत्रिक्रिया कंमेंटमध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चला फॉलो करायला विसरू नका.

Leave a Comment