Auron Mein Kahan Dum Tha release date postpone
बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण आणि तब्बू यांचा बहुचर्चित चित्रपट Auron Mein Kahan Dum Tha येत्या ५ जुलैला चित्रपटगृहात रिलीज होणाच्या तयारीत असतानाच अचानक चित्रपटाच्या निर्मात्यांनी Auron Mein Kahan Dum Tha चित्रपटाच्या रिलीजची तारीख पुढे ढकलली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृतपणे असं सांगितलं आहे कि चित्रपट डिस्ट्रिब्युटर्स आणि थेटर मालकांच्या विनंतीवरून Auron Mein Kahan Dum Tha चित्रपटाची रिलीज डेट पोस्टपोन करण्यात येत आहे आणि नवीन रिलीज डेट काही दिवसात अधिकृत मीडियावर सांगण्यात येईल
Auron Mein Kahan Dum Tha release date postpone करण्याची अधिकृत पोस्ट बघा
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)
Auron Mein Kahan Dum Tha चित्रपट पोस्टपोन होण्याची कारणे कोणती ?
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक गिरीश वानखेडे म्हणतात कि Auron Mein Kahan Dum Tha चित्रपटाची रिलीज डेट पोस्टपोन होण्यामागचं खरं कारण म्हणजे kalki 2898 AD चित्रपटाची एकंदरीत बॉक्स ऑफिसवर चाललेली जबरदस्त कामगिरी. जर Auron Mein Kahan Dum Tha चित्रपट त्याच्या ठरलेल्या दिवशी म्हणजेच ५ जुलैला रिलीज झाला असता तर कदाचित चित्रपट एक आठवडापण थेटरमध्ये टिकला नसता आणि त्यामुळेच Auron Mein Kahan Dum Tha चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलेली आहे.
मिर्झापूर सिझन ३ पहिल्या दोन सिजनपेक्षा जबरदस्त !
ऐन तोंडावर चित्रपट पुढे ढकलण्याचे दुसरं कारण असं सांगण्यात येतंय कि फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि थेटर चालक सध्याच्या घडीला ब्लॉकबास्टर ठरत असलेल्या kalki 2898 AD चित्रपटाशिवाय कोणत्याच चित्रपटाचं डिस्ट्रिब्युशन करायला तयार नाहीयत कारण बॉलीवूडमध्ये एक समीकरण नेहमीचं असतं ते म्हणजे जो “बिकता हे वो चलता हे” त्यामुळे उगाच चित्रपट रिलीज करून नको ते संकट ओढवण्यापेक्षा निपचीत शांत पडून राहिलेलं नेहमी उत्तम हे कदाचित Auron Mein Kahan Dum Tha च्या निर्मात्यांना समजलं असावं.
चित्रपट समीक्षक राज बन्सल म्हणतात Auron Mein Kahan Dum Tha चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पोस्टपोन करणे हा खूप महत्वाचा आणि धाडसी निर्णय आहे कारण ज्याप्रकारे kalki 2898 AD चित्रपटाची एकंदरीत कामगिरी बघितली तर त्यासमोर कोणत्याच स्टारचा चित्रपट जास्त काळ टिकू शकणार नाही.
Auron Mein Kahan DumTha चित्रपटाची स्टारकास्ट काय आहे ?
अजय देवगण , तब्बू जिमी शेरगिल, शंतनू माहेश्वरी , पुष्पेंद्र सिंग आणि आपल्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजेच सई मांजरेकर सुध्या या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
Auron Mein Kaha Dum Tha चित्रपटत नेमकं काय पाहायला मिळेल ?
एकंदरीत चित्रपटाच्या टीझरवरून लक्षात येतंय कि हा चित्रपट एक म्युझिकल लव्ह स्टोरी असेल ज्याची स्टोरी 2002 ते 2023 अश्या 20 वर्षांमधली असणार आहे . या चित्रपटाला संगीतबद्द केलंय फेमस म्युझिक डायरेक्टर मम करीम ज्यांना गेल्या वर्षी आर.आर .आर चित्रपतील लोकप्रिय गाणं ” नाठु नाठु ” साठी ऑस्कर पुरस्कार मिळालं होतं .अजय देवगण आणि तब्बू यांनी बॉलीवूड ला एकापेक्षा एक असे चित्रपट दिलेय ते या आधी विजयपथ , हकीकत , थक्षक , द्रिश्यम , गोलमाल अगेन , दे दे प्यार दे , द्रियम 2, आणि भोला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
फक्त अजय देवगणचाच नाही तर शाहरुखनेपण केला होता त्याचा सिनेमा पोस्टपोन
मागच्या वर्षी रणबीर सिंगचा ऍनिमल चित्रपट देखील ऑगस्ट २०२३ महिन्यात रिलीज होणार होता पण काही पोस्ट प्रोडक्शनच्या कामामुळे तो १ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित करण्यात आला. अजय देवगणने या आधी त्याचा मैदान चित्रपट पोस्टपोन केला होता आधी तो २७ नोव्हेंबर २०२० लाच प्रदर्शित होणार होता पण नंतर १० एप्रिल २०२४ ला प्रदर्शित करण्यात आला. एवढंच नाही तर चक्क शाहरुख खानला देखील त्याच्या जवान चित्रपटाची तारीख पोस्ट प्रोडक्शनच्या कामामुळे २ जून २०२३ बदलून ७ सप्टेंबर २०२३ करावी लागली.
Auron Mein Kahan Dum Tha चित्रपटातील ए दिल जरा हे गाणं पहा
तुम्ही Auron Mein Kahan Dum Tha चा ट्रेलर बघितला आहे का ? बघितला असेल तर आम्हाला तुमच्या प्रत्रिक्रिया कंमेंटमध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चला फॉलो करायला विसरू नका.
Auron Mein Kahan Dum Tha release date.