kakuda movie Trailer आधी ‘मुंज्या” नंतर “काकुडा” आदित्य सरपोतदारांची हॉरर कॉमेडीची मेजवानी !

kakuda movie trailer

हॉरर कॉमेडी मूवी मुंज्या च्या बॉक्स ऑफिसवरील यशस्वी कारकीर्दीनंतर दिग्दर्शक आदित्य सरपोतदार घेऊन आलाय तसाच एक जबरदस्त हॉरर कॉमेडीपट ज्यामध्ये रितेश देशमुख , सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम एकत्र येऊन धम्माल करणार आहेत. मुंज्या च्या घवघवीत यशानंतर आदित्य सरपोतदार kakuda movie बद्दल खूप पॉसिटीव्ह आहे आणि प्रेक्षकसुद्धा त्याच्या या चित्रपटाला मुंज्यासारखंच प्रेम देतील यात काही शंका नाही

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)

kakuda movie कधी आणि कुठे रिलीज होणार आहे जरा बघा

आदित्य सरपोतदारचा मुंज्या हा चित्रपट थेटरमध्ये रिलीज झाला होता पण kakuda movie थेटरमध्ये रिलीज होणार नाहीय. kakuda movie हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या १२ जुलैला चित्रपटाचा प्रेमिअर होईल आणि प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

WHY AURON MEIN KAHAN DUM THA RELEASE DATE POSTPONE कल्की 2898 AD च्या रिलीजला घाबरले चित्रपटाचे मेकर्स

kakuda movie चा ट्रेलर पहिला नसेल तर इथेच पाहून घ्या

Kakuda Movie Credit :- ZEE5

आदित्य सरपोतदारांचा “मुंज्या” चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमावाला आणि तो बॉलीवूडच्या १०० करोड क्लब मध्ये जाऊन बसला एका साध्या लोककथेने १०० कोटी कमवावे हे खूपच प्रेरणादायी आहे आणि याच प्रेरणेने आदित्य सरपोतदार त्यांचा बॉलीवूडमधला दुसरा भयपट घेऊन येत आहे. kakuda movie चा ट्रेलर तर खूप जबरदस्त आहे.

गावाला लागलेल्या एका श्रापामुळे दर मंगळवारी संध्याकाळी ७.१५ वाजता गावातील प्रत्येकाला आपल्या घराचा छोटा दरवाजा उघडा ठेवावा लागतो आणि तस जर केलं नाही तर घरातल्या कर्त्या पुरुषाचा १३ व्या दिवशी मृत्यू होतो आहे ना चित्रपटाची कथा इंटरेस्टिंग ?
या चित्रपटात रितेश देशमुखने घोस्ट हंटरची भूमिका बजावली आहे तर काय रितेश त्या गावाला “कुकडा” च्या श्रापातून मुक्त करण्यात यशस्वी होईल कि तोच होईल “कुकडा”चा शिकार हे बघायला भारी मज्जा येईल. तर हा कुकडा नक्की आहे तरी कोण आणि गावाला त्याचा श्राप कसा लागला हे जाणून घेण्यासाठी येत्या १२ जुलैला kukda movie बघावा लागेल.

आदित्य सरपोतदार आणि रितेश देशमुख यांनी एकत्र किती सिनेमे केले ?

महाराष्ट्राची सुपरहिट जोडी आदित्य आणि रितेश देशमुख यांनी साल २०१८ ला एकत्र येऊन “माउली” चित्रपट सुपरहिट केला होता. त्यानंतर आदित्य आणि रितेशचा हा दुसरा चित्रपट आहे त्यामुळे प्रेक्षकांना हीच अपेक्षा आहे कि माउलीसारखं हापण चित्रपट सुपरहिट होईल.

आदित्य सरपोतदारने या आधी किती सिनेमे डायरेक्ट केले

“मुंज्या” डायरेक्टर आदित्य सरपोतदारने या आधी मराठीमध्ये डायरेक्ट केलेले सर्वच चित्रपट यशस्वी झालेत. त्यापैकी ‘उलाढाल’, ‘झोम्बीवली’, ‘नारबाची वाडी’, ‘माउली’, ‘सतरंगी रे’. हि काही चित्रपटाची नावे आहे.

रितेश देशमुखचे येणाऱ्या काळात कोणते चित्रपट आहेत ?

रितेश देशमुखने २०२२ मध्ये ‘एक था व्हिलन 2′ हा चित्रपट सोडल्यास कोणताही मोठा सिनेमा केला नाहीय. त्यानंतर तो आपल्याला “कुकडा’ या चित्रपटात दिसेल आणि त्यानंतर “हाऊसफुल 5”, हा चित्रपट येणार आहे. अजय देवगणचा सुपरहिट चित्रपट रेड चा दुसरा पार्ट म्हणजेच “रेड 2” मध्ये रितेश खलनायकाची भूमिका साकारताना दिसेल. एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर “राजा शिवाजी” नावाचा चित्रपट देखील काही वर्षात प्रदर्शित होणार आहे सध्या त्याबद्दलची माहिती रितेशने त्याच्या सोशल मीडियावरून शेर केली आहे.

सोनाक्षी सिन्हाचे येणाऱ्या काळात कोणते चित्रपट आहेत

ऍक्टर सोनाक्षी सिन्हा जहीर इकबालशी नुकत्याच लग्नबंधनात अडकली आहे या दोघांनी मागच्या महिन्यात लग्न केलं होत. सोनाक्षी सिन्हा चा येणाऱ्या काळात ‘कुकडा’, ‘हाऊसफुल 5’, ‘निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस’ असे तीन चित्रपट आपल्याला पाहायला मिळतील तर ते कसे असतील त्याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता तर आहेच.

kakuda movie पाहिल्यानंतर तुमच्या प्रत्रिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका आणि चित्रपटसृष्टीच्या ताज्या घडामोडीसाठी चित्रपट चर्चला फॉलो करायला विसरू नका.

1 thought on “kakuda movie Trailer आधी ‘मुंज्या” नंतर “काकुडा” आदित्य सरपोतदारांची हॉरर कॉमेडीची मेजवानी !”

Leave a Comment