Poor bai ga box office collection :- स्वप्नील-प्रार्थनाची जादू चालली का नाही जाणून घ्या

bai ga box office collection :-

गेल्या १२ जुलैला स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, सुकन्या कुलकर्णी मोने, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, समीर धर्माधिकारी आणि सागर कारंडे यासारख्या दिग्गज कलाकारांची तगडी स्टारकास्ट असलेला फॅमिली एंटरटेनमेंट चित्रपट “बाई ग” रिलीज झाला. चित्रपटाचा जेव्हा ट्रेलर आला होता तेव्हा प्रेक्षक चित्रपटासाठी खूप उत्सुक होते. खूप दिवसानंतर त्यांना स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांची जोडी पाहायला मिळणार होती त्याशिवाय सहा बायका आणि फजीती ऐका असं काहीतरी एकंदरीत समीकरण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं त्यामुळे एक वेगळीच कथा प्रेक्षकांना पाहायला मिळेल या उद्देशाने प्रेक्षक उत्सुक होते.

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)

Bai ga box office collection ची स्टोरी काय असेल ?

बाई गं चित्रपटाच्या स्टोरीबद्दल जर म्हणायचं झालं तर या चित्रपटात बाईच्या मनात नेमकं काय काय चालू असतं आणि ते समजण्यासाठी पुरुषाची कशी तारांबळ उडते याचं विनोदी समीकरण म्हणजेच हा चित्रपट आहे. जर तुम्ही देवाकडे तुमच्या वैवाहिक जीवनाला सुधारण्यासाठी मागणं मागितलं आणि देवाने तुमचं मागणं मान्य करून मागच्या सात जन्मातल्या वैवाहिक आयुष्याला ठीक करायची संधी दिली तर तुमची किती तारांबळ होईल ? तशीच तारांबळ या चित्रपटातील धनुष म्हणजेच स्वप्नील जोशींची झालीय. आपल्या एका वैवाहिक जीवनाला ठीक करण्यासाठी देवाकडे मागितलेले वरदान त्याला पुरतं डोईजड होणार आहे.

AMAZING PILL REVIEW :- रितेश देशमुखची करतायत सगळे तारिफ पहा नक्की कसा आहे चित्रपट

चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, सुकन्या कुलकर्णी मोने, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, समीर धर्माधिकारी आणि सागर कारंडे या सर्वांचं परफॉर्मन्स एकदम जबरदस्त आहे. दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीही चित्रपटाला उत्तम प्रकारे दिग्दर्शित केलय शिवाय चित्रपटातील “चांद थांबला” या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलाय.

bai ga box office collection
bai ga box office collection

Bai ga box office collection चित्रपटाने नेमके किती कमावले ?

“सॅकनिल्क” च्या वृत्तानुसार चित्रपटाने पहिल्याच दिवशी निराशाजनक ओपनिंग केलीय प्रेक्षकांची उत्सुकता बघता चित्रपटाला जोरदार ओपनिंग मिळाली पाहिजे होती पण चित्रपटाने पहिल्या दिवशी ९ लाख इतका गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने पहिल्या दिवसापेक्षा थोडी जास्त म्हणजेच २२ लाख आणि रविवारी २८ लाख इतकी असून पहिल्या आठवड्यात अंदाजे ६०-६५ लाखार्पणपर्यंत गेला असावा असा अंदाज आहे. चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा फॅमिली एंटरटेनमेंट असून तुम्ही एकदा चित्रपटाला बघू शकता. चित्रपटामध्ये काही त्रुटी आहेत जसं कि चित्रपटाची स्टोरी अजून थोडी प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात अयशस्वी झालीय तुम्हाला चित्रपट बघताना समजेल कि मध्ये मध्ये चित्रपट भरकटतोय. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी अजून थोडी चांगली झाली असती तरीपण ओव्हरऑल सिनेमा वन टाइम बघण्यासारखा नक्कीच आहे.

Bai ga Movie बद्दल थोडी अधिक माहिती घेऊया :-

ए बी सी क्रिएशन , नितीन वैद्य प्रॉडक्टशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग जाधव यांनी केले असून Bai Ga Movie चित्रपटाची निर्मिती डॉ. आशिष अग्रवाल , नितीन प्रकाश वैद्य आणि ओ. एम, जी. मिडिया व्हेंचर्स यांनी केलं आहे. “Bai ga movie” चे संकलन निलेश गावडे यांनी केले असून छायांकन नागराज एम.डी दिवाकर यांनी केले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, आणि संवाद लेखन पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे. Bai Ga Movie चित्रपटाची गाणी जय अत्रे, मंदार चोळकर आणि समीर सावंत यांनी लिहिली आहेत तर वरूण लिखते यांनी या गाण्यांना स्वरबध्द केले आहेत.

Bai ga बॉक्स box office collection ची स्टारकास्ट कोण आहे जाणून घ्या :-

Bai ga movie चित्रपटाला स्वप्नील जोशी , प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, सुकन्या कुलकर्णी मोने, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, समीर धर्माधिकारी आणि सागर कारंडे यासारख्या दिग्गज कलाकारांची जोड मिळाली आहे. Bai Ga Movie चित्रपट एकंदरीत खूप मनोरंजक असणार आहे यात वादच नाही. अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कऱ्हाडे , शरयू दाते , श्वेता दांडेकर , सुस्मिरता डावलकर आणि संचित मोरजकर ह्यांनी या संपूर्ण चित्रपटाला स्वरबद्ध केलं आहे

तुम्ही बाई गं चित्रपट पाहिलात का जर पहिला असेल तर तुमच्या प्रत्रिक्रिया आम्हला कंमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीची चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.

Leave a Comment