Munjya OTT Release Date
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या चित्रपट गेल्या महिन्यातल्या ७ जूनला प्रदर्शित झालेला आणि बघता बघता चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला. अजूनही चित्रपट काही थेटर्समध्ये चालू आहे लोकं अजूनही मुंज्याला तेवढाच प्रतिसाद देतायत. एक लोककथा ते एक सक्सेसफुल ब्लॉकबस्टर हॉरर कॉमेडी चित्रपट असा काहीसा या चित्रपटाचा प्रवास होता. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना चित्रपटाच्या यशाबद्दल विचारलं असताना चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले कि मुंज्या चित्रपटाचं यशस्वी होणं यामागे सर्वांची मेहनत आणि टीम वर्क आहे. थिएटरमधील एकंदरीत कामगिरीनंतर मुंज्या आता ओटीटी वर येण्यास सज्ज झालाय.
Munjya OTT Release Date :- मुंज्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया
मुंज्या चित्रपटाचे लेखन नीरेश भट्ट आणि योगेश चांदेकर या जोडीने केले आहे. हा चित्रपट मराठी लोककथेचा एक भाग आहे ज्यामध्ये उत्तम पद्धतीने CGI आणि VFX चा वापर करून एक हॉरर मूवी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जो लोकांनी बर्यापैकी स्वीकारलाय. बराचश्या लोकांना अशा लोककथेमध्ये रस असतो आणि वरून जर ती लोककथा भुतांवर आधारित असेल तर कोणाला आवडणार नाही ? त्यामुळे माझ्यासारख्या बराचश्या लोकांना हा चित्रपट एक आकर्षणाचा भाग बनला आहे आणि तसही चित्रपटाची स्टोरी इतकी सोपी आहे कि चित्रपट समजायला काही रॉकेट सायन्स लागत नाही. चित्रपटाच्या सुरवातीपासून तुम्ही त्याचा भाग व्हायला लागतात. CGI निर्मित मुंज्या हा या चित्रपटाचा मेन हिरो किंवा पात्रं असल्यामुळे ते चित्रपटाच्या आकर्षणाचं कारण बनतय.
POOR BAI GA BOX OFFICE COLLECTION :- स्वप्नील-प्रार्थनाची जादू चालली का नाही जाणून घ्या
जर चित्रपटाच्या एकंदरीत कथेबद्दल बोलायचं झाल तर या आधी खूप चित्रपट अश्या ओसाड कोंकणातल्या लोकेशनवर बनलेत पण एका साध्या सरळ कथेला डायरेक्टर आदित्य सारपोतदार यांनी चांगल्या पद्धतीने मांडलेत. कथेनुसार योग्य जागेवर कॉमेडी आणि हॉरर यांची बरोबर सांगड घातली गेलीय ज्यामुळे चित्रपट बघताना तुम्ही कंटाळून जात नाही. चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा पहिला तेव्हा मला वाटलं चित्रपटामध्ये हॉरर सीन जास्त असतील पण जर तुम्ही अशी अपेक्षा ठेऊन जात असाल तर तुम्ही निराश व्हाल कारण चित्रपटात थोडे हॉरर सीन कमी आहेत. चित्रपटाच्या अखेरीस काही सीन उगाचच दाखवले गेलेत असं तुम्हाला दिसेल ते नाही दाखवले असते तर चित्रपट अजून चांगला झाला असता.
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)
Munjya OTT Release Date :- मुंज्या कुठे व कधी बघायचा ?
अवघ्या ३० कोटींमध्ये बनलेल्या मुंज्या चित्रपटाने जगभरात १३० कोटींचा गल्ला जमवला आहे अजूनही चित्रपट काही थेटरमध्ये दाखवला जातोय. एका मुलाखतीमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांना मुंज्या ओटीटी कधी प्रदर्शित होणार विचारल्यावर ते म्हणाले की चित्रपट रीलीज झाल्यावर २ महिन्याच्या नंतरच तो ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर रिलीज करावा लागतो त्यामुळे प्रेक्षकांना मुंज्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बघायला मिळेल. डिजनी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉमने मुंज्याच्या ओटीटी रिलीजचे सर्व अधिकार विकत घेतले असून रिलीजची तारीख अद्याप माहिती नाहीय. लवकरच डिजनी प्लस हॉटस्टारवर त्याची तारीख घोषित केली जाईल असं एकंदरीत समजण्यात येतंय.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्यामध्ये शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग हे लीड रोलमध्ये होते IMDB वर चित्रपटाला १० पैकी ७.५ एवढी रेटिंग देण्यात आलेली आहे. मुंज्या हा चित्रपट खूप साऱ्या दिग्दर्शकांसाठी एक शिकावण ठरेल कि एका सध्या स्टोरी आणि VFX चा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत चित्रपट कसा पोहचवायचा ते.
Munjya OTT Release Date :- तुम्ही मुंज्या चित्रपट का बघावा ?
एकंदरीत, मुंज्या चित्रपट नीटनेटका, फॅमिलीसोबत नक्की बघावा असा वन टाइम हॉरर कॉमेडी चित्रपट असून त्यात उत्कृष्ट कामगिरी CGI आणि VFX चा वापर केला आहे. मॅडॉक फिल्म्स हे स्त्री, भेडिया आणि आता “मुंज्या”सारख्या हॉरर जॉनरच्या चाहत्यांना जबरदस्त कथांनी लुटत आहेत. गेल्या काही वर्षात हॉरर कॉमेडी जॉनरच्या चित्रपटांची संख्या वाढत चाललीय आणि मला कधी कधी भीती वाटते कि जर अश्या हॉरर कॉमेडी जॉनरचे चित्रपट यायचे बंद झाले तर आमच्यासारख्या हॉरर कॉमेडी आवडणाऱ्यांनी करावे तरी काय ?
तुम्ही मुंज्या चित्रपट ओटीटी वर बघण्यासाठी किती उत्सुक आहेत आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा आणि चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.