Phullwanti Movie :- प्राजक्ता माळीचा आगामी चित्रपट
अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच तिच्या सोशल मीडियावरून तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली ज्याचं नाव असणार आहे “फुलवंती” Phullwanti Movie. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. सध्या चित्रपटाच्या प्रोमोशन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्हिवू देत असताना तिने या चित्रपटाची निर्मिती करत असताना तिला आलेले अनुभव आणि काही खुलासे तिने एका वृत्तवहिनीला इंटरव्हिव देताना सांगितले आहेत तर प्राजक्ता माळीने नक्की कोणते खुलासे केले त्याबद्दल जाणून घेऊया.
Phullwanti Movie :- नेमका चित्रपट कोणाबद्दल आहे चला जाणून घेऊया
तर विषय असा आहे कि “फुलवंती” हा मराठीमधला आगामी ऐतिहासिक चित्रपट असून तो थोर इतिहासकार आणि शिवप्रेमी लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्या मराठी कादंबरी “फुलवंती” यांवर आधारित आहे . या चित्रपटात आपल्याला पेशवेकालीन नर्तिका फुलवंती आणि पेशवा पंडित वेंकट शास्त्री यांच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी याचि देही याचि डोळा पाहता येणार आहे. सांगायची गोष्ट म्हणजे आतापर्यंत आपण प्राजक्ता माळी हीला वेगवेगळ्या चित्रपट मालिकांतून अभिनय करताना पाहिलं होतं पण या चित्रपटानिमित्त ती पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय तसाच चित्रपटात मुख्य भूमिका असलेली फुलवंतीचं पात्र तीच पडद्यावर रेखाटणार आहे. तिच्याबरोबर पंडित वेंकट शास्त्रीची भूमिका साकारणार आहेत अभिनेते गश्मीर महाजनी त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा या चित्रपटाबद्दल वाढल्या असून चित्रपटात नक्की काय बघायला मिळेल याची प्रेक्षक आतूरतेने वाट बघतायत.
Phullwanti Movie :- फुलवंती चा ट्रेलर पाहिलात का ? नसेल पाहिलात तर पहा
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)
Phullwanti Movie :- फुलवंती चित्रपटाचं नेमकं आकर्षण काय आहे ?
मराठीमध्ये हल्ली ऐतिहासिक चित्रपटांची सरबत्ती सुरु आहे हंबीरराव, फत्तेशिखस्त, राव-रंभा, वीर मुरारबाजी आणि असे असंख्य चित्रपट आतापर्यंत येऊन गेले आणि त्यांना प्रेक्षकांनी तसा चांगला प्रतिसादही दिला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेते गश्मीर महाजनी यांचा फुलवंती हा चित्रपटपण अशाच एका ऐतिहासिक नर्तकी वर आधारित आहे जिच्या सौंदर्याने अक्खी पेशवेशाही उजळून निघाली होती.
एक अशी नर्तिका जी अत्यंत अभिमानी, स्वाभिमानी अशी आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात तिची शास्त्रीबुवांशी ओळख होते. शास्त्रीबुवांना भेटल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये एक छानसं वळण येतं. फुलवंतीला परीरस्पर्श करणारे शास्त्रीबुवा आहेत त्यांच्या शिवाय फुलवंती अपूर्ण आहे तर अशी फुलवंतीची कहाणी येत्या ११ ऑक्टोबरला आपल्याला पाहायला मिळेल. स्नेहल तरडे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून चित्रपटाचे संवादलेखन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना किती भुरळ पडतोय त्याकडे लक्ष लागलाय.
Punha Ekda Saade Maade Teen : साडे माडे तीन पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला..!
Phullwanti Movie :- चित्रपटासाठी ;लागणाऱ्या दागिनंसाठी माझ्या टीमने खूप रीसर्च केला
फुलवंती चित्रपटामध्ये वापरण्यात आलेले सर्व दाग-दागिने प्राजक्ता माळी हिच्या प्राजक्तराज या ब्रँड चे आहेत. चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान न्युज 18 लोकमतशी बोलताना प्राजक्ता माळी म्हणते की चित्रपटाची कथा ऐतिहासिक असल्यामुळे माझ्या प्राजक्तराज टीमने पेशवेकालीन भारतभर नर्तन केलेली नर्तिकेच्या गळ्यातील हार, बांगड्या, कानातले दागिने आणि त्याकाळात वापरण्यात येणाऱ्या शाली आणि साड्या कशा असतील त्याबद्दल रीसर्च केले. प्राजक्ता सांगते की फुलवंतीला बडोद्याच्या राजांनी दागिने भेट म्हणून दिले शाहू महाराजांनी दागिने भेट केले तर ते कसे असतील याबद्दल प्रेजक्तराज ब्रँडच्या टीमने खूप रीसर्च केला. त्याचबरोबर फुलवंतीचा रोल करताना मी तिच्या दिसण्यावर, चालण्यावर नाचण्यावर, मुरडण्यावर विशेष लक्ष दिलं जेणेकरून माझा रोल फुलवंतीसाठी साजेसा होईल.
पुढे ती म्हणते की या चित्रपटासाठी प्रवीण तरडे यांचं संवादलेखन लाभलं आहे त्यामुळे ऐतिहासिक चित्रपट आणि त्यावर प्रवीण तरडे यांचं संवादलेखन त्यामुळे चित्रपटाचा एक एक डायलॉग बोलताना वेगळीच मज्जा होती. गश्मीरने देखील मला खूप मदत केली चित्रपटाचं शूटिंग जेव्हा सुरु होतं तेव्हा मला एकदाही कधी त्याने पैशाबद्दल विचारलं नाही की माझे ऍडव्हान्स बाकी आहेत किंवा पैसे कधी मिळतील पूर्ण शूटिंग दरम्यान तो शांत राहिला.
गश्मीर म्हणाला की मी काहीतरी वेगळा करण्याच्या तयारीत होतो तेव्हाच मला नरसिंह शास्त्रींचा रोल करायला मिळाला. या चित्रपटासाठी मी व्हॉइस मोडूलेशन केलंय आतापर्यंत मी माझा बेस आवाज वापरात होतो पण शास्त्रींच्या रोलसाठी मी थोडा बारीक आवाज वापरला आहे जो कि त्यांना साजेसा वाटतो. शास्त्रींच्या रोलसाठी मी पकवाज वादनाचं प्रशिक्षणं घेतलाय जेणेकरून त्या रोलमध्ये एक जिवंतपणा येईल.
तुमचं फुलवंती चित्रपटाबद्दल काय मत आहे आम्हला जरुर कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.