Deepika & Ranveer will raise baby themselves
बॉलीवूडमधलं सगळ्यात चर्चेत राहणारं जोडपं म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. काही महिन्यांपूर्वी दीपिका पदुकोण गरोदर असल्याची चर्चा सगळीकडे चालू होती आणि जवळपास ८ सप्टेंबर ला या जोडप्याला एक गोंडस कन्या रत्न प्राप्त झालं. सध्या दोघेही या चिमुकलीच्या सेवेत व्यस्त आहेत चला तर जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती…
Deepika & Ranveer will raise baby themselves : दीपिका सुद्धा वापरणार का अनुष्काची ट्रिक
नुकतंच रणवीर आणि दीपिका यांनी लहान चिमुकलीला जन्म देऊन त्यांच्या चाहात्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दीपिका आणि रणवीर सध्या आपल्या लाडक्या लेकीच्या संगोपनात व्यस्त असून त्यांनी सुद्धा अनुष्काप्रमाणे नो फोटो पॉलिसी स्वीकारल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे ही रणवीर आणि दीपिका या दोघांची आपल्या मुली विषयी काळजी असू शकते.
रणवीर आणि दीपिकाच्या लेकीबद्दल चाहात्यांना अनेक प्रश्न आहेत पण सध्या चाहात्यांची निराशा होऊ शकते कारण मीडिया रिपोर्टनुसार सध्या तरी रणवीर आणि दीपिका आपल्या मुलीला कुणासमोरही आणणार नाहीत म्हणजेच विराट आणि अनुष्काप्रमाणे नो फोटो पॉलिसी स्वीकारतील असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कदाचित दीपिका आणि रणवीर आलिया प्रमाणे योग्य वेळ आल्यावरच आपल्या मुलीला सर्वांसमोर आणतील अशा चर्चासुद्धा प्रेक्षकांमध्ये सुरू आहेत. आता रणवीर आणि दीपिका आपल्या लेकीचा चेहरा सर्वांसमोर आणतात तरी केव्हा ? हे पाहणं उत्सुकतेच ठरलेल आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की कळवा.
Deepika & Ranveer will raise baby themselves : दीपवीर “ने 2018 मध्ये केले डेस्टिनेशन वेडिंग
सर्वांची लाडकी व प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण व सर्वांचा लाडका अभिनेता रणवीर सिंग यांनी २०१८ मध्ये लग्न केले. दोघांची एकमेकांशी पहिली भेट ही “गोलीयों की रासलीला रामलीला” या चित्रपटामध्ये काम करण्याच्या निमित्ताने चित्रपटाच्या सेटवर झाली. एकत्र काम करताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले व दोघे पाच वर्ष एकमेकांसोबत रिलेशन मध्ये राहिले. या पाच वर्षाच्या रिलेशनशिप नंतर दोघांनी एकमेकांशी लग्न करायचा निर्णय घेतला व २०१८ मध्ये दोघे लग्न बंधनात अडकले.
दीपिका आणि रणवीर यांची जोडी खूप फेमस असून चाहात्यांना दीपिका आणि रणवीर चे सर्व चित्रपट खूप आवडतात व प्रेक्षक त्यांना भरभरून प्रतिसाद देतात. “गोलियों की रासलीला रामलीला”, “बाजीराव मस्तानी”, “पद्मावत”, “83” अशा सिनेमांमध्ये रणवीर आणि दीपिका यांनी एकत्र काम केले असून आता ते दोघेही “सिंगम अगेन” या चित्रपटात आपल्याला पुन्हा एकदा दिसणार आहेत. आता ही जोडी नव्या चित्रपटात पाहायला मिळणार म्हणून प्रेक्षकांची काय उत्सुकता आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेलं आहे.
Phullwanti Movie :- दागिन्यांसाठी माझ्या टीमने केला खूप रीसर्च प्राजक्ताचा मोठा खुलासा
Deepika & Ranveer will raise baby themselves : दीपिका ने ८ सप्टेंबरला दिला चिमुलीला जन्म..!
दीपिका आणि रणवीर नुकतेच आपल्या कुटुंबासह सिद्धिविनायकाच्या दर्शनास जाऊन आल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे सर्व चाहात्यांना मिळाली. आपल्या बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी दीपिका आणि रणवीर संपूर्ण कुटुंबासह सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले होते. सुरुवातीला दीपिकाच्या प्रेग्नेंसीवर अनेकांनी शंका घेतल्याच्या चर्चा सुद्धा सुरू होत्या.
दीपिका ने सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट मधून तिने आपल्या प्रेग्नेंसी ची न्यूज सर्व चहात्यांना दिली होती. ७ सप्टेंबर रोजी दीपिकाला एच. एन.रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले व ८ सप्टेंबर रोजी दीपिका ने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला त्याबद्दल माहिती रणवीर व दीपिका यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे चाहात्यांना दिली. आपल्याला मुलगी झाल्याची आनंदाची बातमी पोस्टद्वारे शेअर करत वेलकम बेबी गर्ल असं टायटल देऊन त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवले. आई झाल्यानंतर दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटचे बायो चेंज करून Feed.Burp.Sleep.Repeat असे ठेवले म्हणजेच भरवा.ढेकर काढा.झोपा.तेच रिपीट करा.
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)
Deepika & Ranveer will raise baby themselves : दीपिकाही ठेवणार का ऐश्वर्याच्या पावलावर पाऊल..!
दीपिका पादुकोण हिने नुकताच लहान चिमुरडीला जन्म दिला आहे. लहान बाळाला जन्म देणं म्हटलं तर त्याचं संगोपन करणं ही तितकच महत्वाचं असतं. आता दीपिकाच्या लेकीचं संगोपन कोण करणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. अशातच मी माझ्या लेकीचं स्वतः संगोपन करेन असं दीपिका ने सर्व चाहात्यांना सांगितलं आहे. ऐश्वर्याने ज्याप्रमाणे आपली मुलगी आराध्याचं संगोपन केलं त्याचप्रमाणे दीपिकाही नॅनी चा वापर न करता स्वतः आपल्या लेकीला सांभाळणार आहे. आता दीपिका स्वतः आपल्या लेकीचं संगोपन करू शकेल का?? आपल्या लेकीचं संगोपन करण्यासाठी ती कशाप्रकारे स्वतःची भूमिका बजावेल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच आपल्याला मिळतील.
दीपिका रणवीरला मुलगी झाल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हला जरुर कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.
Table of Contents
अर्पिता पाटील या रुईया महाविद्यालयात बॅचलर इन मास मीडियामध्ये पहिल्या वर्गात शिकत असून त्या मनोरंजन आर्टिकल विषयावर लिहितात.