Navra Maza Navsacha 2 Box Office Collection day 3 : चित्रपटाने ओपनिंग चांगली केली पण तशीच पुढेही करता येईल का ?
मराठी सिनेमा सृष्टीला एक वेगळाच कल निर्माण करणारा एक आगळावेगळा आणि भन्नाट असा चित्रपट म्हणजेच नवरा माझा नवसाचा. 200४ मधील प्रेक्षकांना आपलंसं करणारा सचिन पिळगावकर यांनी प्रकाशित केलेला चित्रपट प्रेक्षकांच्या आजही आठवणीत आहे त्यातील घटना, गाणी आणि भन्नाट विनोद प्रेक्षकांच्या आजही डोळ्यासमोर आहेत कितीही वेळा पाहून हसवणारा चित्रपट आता नव्याने आपल्या भेटीला आला आहे प्रेक्षकांना आपलंसं करणारा हा नवरा माझा नवसाचा टू चित्रपट कमी वेळात फार मोठ्या उंचीला पोहोचणार अशी अशा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चालू आहे. शुक्रवारी चित्रपटाने जबरदस्त अशी ओपनिंग करून चांगला श्री गणेशा केला आहे. चित्रपटाचे सर्व अभिनेते चित्रपटाबद्दल खूपच अशा अपेक्षा आणि पॉसिटीव्ह आहेत. २००४ मध्ये नवरा माझा नवसाचा चित्रपटाने जी जादू प्रेक्षकांवर केली तीच जादू नवरा माझा नवसाचा २ करेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय..
Navra Maza Navsacha 2 Box Office Collection day 3 : नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटातील स्टार कास्ट
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, प्रदीप पटवर्धन ,अली अजगर ,अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, निर्मिती सावंत तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील विनोदी कलाकार जॉनी लिव्हर हे आपल्याला नवरा माझा नवसाचा भाग एक मध्ये पाहायला मिळाले. आता अनेक नवीन कलाकार नवरा माझा नवसाचा २ यातून आपल्या भेटीला आले अभिनेत्री हेमल इंगळे, निवेदिता सराफ अभिनेता सिद्धार्थ जाधव ,स्वप्निल जोशी, संतोष पवार या कलाकारांनी या चित्रपटात आपली उत्तम अशी भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते. नवरा माझा नवसाचा भाग एक जसा प्रेक्षकांच्या आवडीचा ठरला तसंच त्याच्या सिक्वेलही लोकांचं मन जिंकेल असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही..
चित्रपटाचे अभिनेते स्वप्नील जोशी, सचिन पिळगांवकर अभिनेत्री हेमल इंगळे आणि सुप्रिया पिळगांकर थिएटर मध्ये जाऊन प्रेक्षकांना धन्यवाद देतानाचे विडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहेत.
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)
Navra Maza Navsacha 2 Box Office Collection day 3 : नवरा माझा नवसाचा २ चं बॉक्स ऑफिस कलेक्शन नक्की झालं तरी किती ?
नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सर्व प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता हा बहू प्रतिष्ठित चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या तीन दिवसात चित्रपटाने किती कमाई केली याची आकडेवारी आपल्यासमोर आलेली आहे. 20 सप्टेंबर रोजी चित्रपट दिनाच्या निमित्ताने नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट दिन असल्याने प्रेक्षकांना कोणताही सिनेमा हा फक्त ९९ रुपयांमध्ये पाहायला मिळण्याची संधी होती. याच संधीचा फायदा घेत सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला.
२० सप्टेंबरला प्रदर्शित झालेले सर्व शो हाउसफुल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात प्रचंड गर्दी केली होती. चित्रपटातून आपल्या भेटीला आला नवा नवस आणि एस.टी.ऐवजी रेल्वेचा प्रवास. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.८२ कोटी रुपयांची कमाई केली तसेच दुसऱ्या दिवशी तो आकडा २.५० कोटी पर्यंत पोहचला आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ३.७६ कोटी रुपयांचा भरगोस गल्ला जमवला आहे. चित्रपटाने अजून काही फारसा खुलासा केला नाही परंतु मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर ,नाशिक, सांगली या जिल्ह्यामध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाची जबरदस्त ओपनिंग आणि प्रेक्षकांनी आतापर्यंत दिलेल्या भरभरून प्रतिसाद आता या चित्रपटाला कुठवर पोहोचवतोय हे पाहणं उत्सुकतेच ठरलंय.
Navra Maza Navsacha 2 Box Office Collection day 3 : नवरा माझा नवसाचा २ चे बजेट किती आहे ?
आपल्या सर्वांच्या नुकताच भेटीला आलेला नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट सर्वांचं मन आपलसं करत आहे. या चित्रपटाची कमाई पाहता चित्रपटाचे बजेट जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट एकूण आठ कोटीच्या घरात बनवल्याची माहिती एका वृत्तानुसार समजते. नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट हजार शो सह सुमारे 250 स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. नवरा माझा नवसाचा चित्रपटाप्रमाणे प्रेक्षक आता या सिक्वेल ला कितपत प्रतिसाद देतात हे पाहणं मजेशीर ठरलं आहे.
टॉप ओपनिंग day सर्व मराठी चित्रपट :
नवरा माझा नवसाचा २ हा नुकताच आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला चित्रपट उत्तम भरारी मारत मोठया उंचीवर पोहोचत आहे. आतापर्यंत आपल्या भेटीला आलेले सर्व मराठी चित्रपटांपैकी कोणते चित्रपट हे टॉप ओपनिंग चे ठरले याची माहिती घेऊया..
१. सैराट – 2016 मध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला सैराट चित्रपट हा टॉप ओपनिंग चित्रपट म्हणून ओळखला जातो. ३.६ कोटी नेट (४.७५ कोटी एकूण)
2. लय भारी -2014 मध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला लय भारी हा चित्रपट हा दुसऱ्या क्रमांकावर येतो.३.१ कोटी नेट (४.१कोटी एकूण )
3. टाईमपास २ – टाईमपास टू हा तिसऱ्या क्रमांकावर येतो. ३.७५ कोटी एकूण.
4. नटसम्राट – 2016 मध्ये प्रदर्शित झालेला नटसम्राट हा चित्रपट चौथ्या क्रमांकावर येतो.३.५ कोटी एकूण
5. वेड – 2022 मध्ये प्रदर्शित झालेला वेड हा चित्रपट पाचव्या क्रमांकावर येतो.२.७५ कोटी
6. नवरा माझा नवसाचा २ -नुकताच प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट सहाव्या क्रमांकावर आहे. २कोटी नेट
7. पावनखिंड – 2022 मध्ये प्रदर्शित झालेला पावनखिंड हा चित्रपट सातव्या क्रमांकावर आहे.१.२५ कोटी नेट ( १.५ कोटी एकूण)
नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट कितपत भरारी घेतोय आणि प्रेक्षकांचं मन जिंकतोय हे पाहणं उत्सुकतेच ठरलं आहे. तुम्ही नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट पाहिलात का? जर पहिला असेल तर तुमच्या प्रत्रिक्रिया आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.
Table of Contents
अर्पिता पाटील या रुईया महाविद्यालयात बॅचलर इन मास मीडियामध्ये पहिल्या वर्गात शिकत असून त्या मनोरंजन आर्टिकल विषयावर लिहितात.