First Poster of Bhool Bhulaiya 3 Out :- या दिवाळीत दरवाजा उघडणार..!
शेवटी तो दिवस आलाच ज्या दिवसाची आपण सगळे एवढी वाट पाहत होतो..! होय २००७ चा सुपरहिट चित्रपट भूल भुलैया चा तिसरा भाग शेवटी लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि याची माहिती चित्रपटाच्या नायकाने म्हणजेच कार्तिक आर्यनने त्याच्या सोशल मीडियावरून चित्रपटाचा पहिला पोस्टर दाखवून दिली. “दरवाजा खुलेगा इस दिवाली” असं तो पोस्टर शेअर करत लिहितोय. भूल भुलैया च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता त्यामुळेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी भूल भुलैयाचा तिसरा भाग प्रेक्षकांसमोर येणार याची माहिती जवळपास २ वर्षाआधी दिली होती आणि आज प्रेक्षकांची प्रतिक्षा संपलीय. तर आता भूल भुलैया ३ त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाप्रमाणे प्रेक्षकांना आवडेल का ? याचं उत्तर आपल्याला थोड्याच दिवसात समजेल.
First Poster of Bhool Bhulaiya 3 Out :- चित्रपटात कोण-कोणते नवीन चेहरे पाहायला मिळणार ?
२००७ मध्ये आलेल्या भूल भुलैयाच्या पहिल्या भागात अभिनेता अक्षय कुमार, शायनी अहुजा, राजपाल यादव, मनोज जोशी, ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी, दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्या रसिका जोशी, अभिनेत्री विद्या बालन, अमिषा पटेल यांसारख्या दिग्गज कलाकारांनी चित्रपटाला अजरामर केलेलं. त्यामध्ये विद्या बालन यांनी साकारलेली मंजोलीका आजही कित्येकांच्या स्वप्नात येत असेल.
प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे जवळपास १५ वर्षानंतर २०२२ ला त्याचा दुसरा भाग म्हणजेच भूल भुलैया २ प्रेक्षकांसमोर आला चित्रपटात अक्षय कुमारची जागा घेतली कार्तिक आर्यनने आणि विद्या बालनची जागा घेतली तब्बूने सगळे नवीन चेहरे असूनपण चित्रपटाला प्रेक्षकांची जबरदस्त पसंती होती. त्यामुळे भूल भुलैयाच्या तिसऱ्या भागात प्रेक्षकांना अक्षय कुमार आणि विद्या बालन कोणत्या मोठ्या भूमिकेत पाहायला मिळणार का ? याबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. सध्या तरी चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी असणार याबद्दल काही शंका नाही पण त्यांच्यासोबत अजून कोण-कोण असणार हे अजूनही सांगण्यात आलं नाहीय.
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)
New Marathi serial Savalyachi janu savali : बिग बॉस विजेती असणार या मालिकेत..!
First Poster of Bhool Bhulaiya 3 Out :- अजय देवगणच्या सिंघम सोबत होऊ शकतो मुकाबला..!
नुकतंच अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या आगामी चित्रपट भूल भुलैया 3 चा फर्स्ट पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करून प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिलीय. त्याचा भूल भुलैया 3 चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपटाची तारीख अजून गुलदस्त्यात आहे पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार भूल भुलैया 3 आणि अजय देवगणचा सगळ्यात यशस्वी चित्रपट सिंघमचा तिसरा भाग सिंघम अगेन सुद्धा येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय त्यामुळे भूल भुलैया 3 आणि सिंघम अगेन यांची बॉक्स ऑफिसवर एकमेकांसोबत टक्कर होणार असल्याच्या बातम्या सध्या सगळीकडे चालू आहे. तुम्हाला काय वाटतं जर दोन्ही चित्रपटाची टक्कर झालीच तर सगळ्यात जास्त कोण कमावेल ?
First Poster of Bhool Bhulaiya 3 Out :- भूल भुलैया ३ प्रेक्षकांनी का बघावा जाणून घ्या ?
२००७ मध्ये आलेल्या भूल भुलैया चित्रपटाने लोकांच्या मनात घर केलेलं अक्षय कुमार विद्या बालन आणि राजपाल यादव यांची एक्टिंग लोकांच्या अजून लक्षात आहे. खास करुन “आमी जे तोमर” गाण्यामधलं विद्या बालन यांचा डान्स लोकांच्या अजूनही लक्षात आहे भूल भुलैया ३ मध्ये देखील आपल्याला विद्या बालन यांचा त्याच गाण्यावरील डान्स पाहायला मिळणार आहे पण यावेळी त्या एकट्या नसून खुद्द माधुरी दीक्षित आपल्याला तिच्यासोबत डान्स करताना दिसणार आहेत. त्यामुळे या दिवाळीत आपल्याला कॉमेडी, हॉरर आणि त्याचबरोबर विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांची डान्समधली जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक अजूनच या चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत. भूल भुलैया ३ चित्रपटाचं दिग्दर्शन केलय अनीस बाझमी यांनी तर चित्रपटाचे निर्माते आहेत टी-सिरीज चे प्रमुख भूषण कुमार.
तुम्ही भूल भुलैया ३ चित्रपटाचं फर्स्ट पोस्टर पाहिलं का ? जर पाहिलं असेल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका आणी अशाच नवीन नवीन अपडेट साठी चित्रपट चर्चा ला फॉलो करा !