Exciting Bhool Bhulaiyaa 3 Teaser : विद्या बालनच आहे मंजोलीका नेमकं काय आहे टिझरमध्ये वाचा..!

Bhool bhulaiyaa 3 teaser : प्रेक्षकांच्या मिश्र प्रत्रिक्रिया

२५ सेप्टेंबरला अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून भूल भुलैया ३ चित्रपटाचा पहिला पोस्टर लाँच केला आणि एवढ्या वर्षांपासूनची त्याच्या चाहत्यांची प्रतीक्षा त्याने संपवली. २००७ साली आलेला अक्षय कुमार आणि विद्या बालन यांची मुख्य भूमिका असललेला भूल भुलैया लोकांच्या जबरदस्त पसंतीस पडला त्यानंतर जवळपास १५ वर्षानंतर म्हणजेच २०२२ ला चित्रपटाच्या निर्मात्यांनी भूल भुलैया चा दुसरा भाग भूल भुलैया २ आणला आणि तोही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता.

आश्चर्य म्हणजे चित्रपटाच्या पहिल्या भागातले एकही कलाकार दुसऱ्या भागात नव्हते तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला त्यामुळे चित्रपटाच्या तिसऱ्या भागाला प्रेक्षक उत्सुस्क असणार हे माहिती होतं. आज भूल भुलैया ३ चित्रपटाचा टिझर रिलीज झालाय त्यामुळे प्रेक्षकांच्या मिश्र प्रत्रिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळतायतकाही बोलतायत कि चित्रपटाचा तिसरा भाग पहिल्या दोन भागांपेक्षा सुपरहिट होणार तर काही बोलतायत ती तीच तीच कथा दाखवून लोकांना किती वेळा मूर्ख बनवणार.. आता हा चित्रपट लोकांना मूर्ख बनवेल कि खरंच सुपरहिट ठरेल हे चित्रपट रिलीज झाल्यावरच समजेल..

Bhool bhulaiyaa 3 teaser
Bhool bhulaiyaa 3 teaser

Bhool bhulaiyaa 3 teaser : चित्रपटात कोण-कोणते नवीन चेहरे पाहायला मिळणार ?

२००७ मध्ये आलेल्या भूल भुलैयाच्या पहिल्या भागात अभिनेता अक्षय कुमार, शायनी अहुजा, राजपाल यादव, मनोज जोशी, ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी, दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्या रसिका जोशी, अभिनेत्री विद्या बालन, अमिषा पटेल यांसारख्या दिग्गज कलाकारांनी चित्रपटाला अजरामर केलेलं. त्यामध्ये विद्या बालन यांनी साकारलेली मंजोलीका आजही कित्येकांच्या स्वप्नात येत असेल.

10 cR in 5-days “Navra Maza Navsacha 2 collection day 6” : ५ दिवसात १० करोडचा गल्ला..!

प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे जवळपास १५ वर्षानंतर २०२२ ला त्याचा दुसरा भाग म्हणजेच भूल भुलैया २ प्रेक्षकांसमोर आला चित्रपटात अक्षय कुमारची जागा घेतली कार्तिक आर्यनने आणि विद्या बालनची जागा घेतली तब्बूने सगळे नवीन चेहरे असूनपण चित्रपटाला प्रेक्षकांची जबरदस्त पसंती होती. त्यामुळे भूल भुलैयाच्या तिसऱ्या भागात प्रेक्षकांना अक्षय कुमार आणि विद्या बालन कोणत्या मोठ्या भूमिकेत पाहायला मिळणार का ? याबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. सध्या तरी चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी असणार याबद्दल काही शंका नाही पण त्यांच्यासोबत अजून कोण-कोण असणार हे अजूनही सांगण्यात आलं नाहीय.

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)

Bhool bhulaiyaa 3 teaser : नेमकं काय आहे चित्रपटाच्या टिझरमध्ये जाणून घ्या

भूल भुलैया ३ चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आणि सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु झाली. चित्रपटाच्या पहिल्या भागत विद्या बालन हिने साकारलेल्या मोंजोलिकामुळेच चित्रपट सुपरहिट झाला होता त्यामुळे भूलभुलैया ३ च्या टिझरमध्ये तिला पाहून प्रेक्षकवर्ग सुखावला. तुम्हाला सगळ्यांना माहितीय की मोंजोलीकाची आत्मा एका वाड्याच्या खोलीमध्ये बंद केली असते टिझरमध्ये दाखवलंय की त्या बंद खोलीचा दरवाजा कोणीतरी उघडतो आणि त्यातून मंजोलीका पुन्हा आजाद होते.

टीझरमध्ये मंजोलिकाचं सिंहासन दुसऱ्या कोणालातरी दिल्याचं ऐकू येत आणि या वेळी तिचा बंदोबस्त करण्यासाठी रुह बाबा म्हणजेच कार्तिक आर्यन आपल्याला टिझरमध्ये दिसतो. टिझरमध्ये कार्तिक एक वाक्य म्हणतो की “क्या लगा..? कहानी खतम हुई..? दरवाजा तो बंद होते ही हे ताकी वो फीरसे खुल सके.. भुल भुलैया २ मध्येपण आपल्याला कार्तिक आर्यन रुह बाबाच्या भूमिकेत दिसला होता. त्यामुळे या भागात तो मोंजोलीकाला सावरु शकेल का हे बघणं महत्वाचं ठरेल..

Bhool bhulaiyaa 3 teaser : भूल भुलैया ३ प्रेक्षकांनी का बघावा जाणून घ्या ?

२००७ मध्ये आलेल्या भूल भुलैया चित्रपटाने लोकांच्या मनात घर केलेलं अक्षय कुमार विद्या बालन आणि राजपाल यादव यांची एक्टिंग लोकांच्या अजून लक्षात आहे. खास करुन “आमी जे तोमर” गाण्यामधलं विद्या बालन यांचा डान्स लोकांच्या अजूनही लक्षात आहे भूल भुलैया ३ मध्ये देखील आपल्याला विद्या बालन यांचा त्याच गाण्यावरील डान्स पाहायला मिळणार आहे पण यावेळी त्या एकट्या नसून खुद्द माधुरी दीक्षित आपल्याला तिच्यासोबत डान्स करताना दिसणार आहेत. त्यामुळे या दिवाळीत आपल्याला कॉमेडी, हॉरर आणि त्याचबरोबर विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांची डान्समधली जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक अजूनच या चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत. भूल भुलैया ३ चित्रपटाचं दिग्दर्शन केलय अनीस बाझमी यांनी तर चित्रपटाचे निर्माते आहेत टी-सिरीज चे प्रमुख भूषण कुमार.

तुम्ही भूल भुलैया ३ चित्रपटाचं टिझर पाहिलं का ? जर पाहिलं असेल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका आणी अशाच नवीन नवीन अपडेट साठी चित्रपट चर्चा ला फॉलो करा !