Dharmaveer 2 review : जाणून घ्या कसा आहे प्रसाद ओक यांचा धर्मवीर २ वाचा संपूर्ण माहिती..!

Dharmaveer 2 review : धर्मवीर चा आढावा घेताना..!

गेल्या काही दिवसंपासून कधी एकदा धर्मवीर २ आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय अशी उत्सुकता सर्व प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती आणि अखेर धर्मवीर २ नुकताच आपल्या सर्वांच्या भेटीला आला. धर्मवीर २ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले असून साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगताना या मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा आढावा पाहायला मिळतोय. धर्मवीर हा चित्रपट संपूर्णपणे आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित होता परंतु धर्मवीर २ मध्ये ४० % दिघे साहेब तर ६० % एकनाथ शिंदे साहेब असे विभाजन पाहायला मिळते आता शिंदे व दिघेंचे हे कॉम्बिनेशन कितपत लोकांना आवडतं हे बघण मजेशीर ठरेल…

Dharmaveer 2 review
Dharmaveer 2 review

Dharmaveer 2 review : नक्की कथा काय या चित्रपटाची ? जाणून घ्या

धर्मवीर २ हा चित्रपट नुकताच आपल्या सर्वांच्या भेटीला आला. धर्मवीर या चित्रपटामध्ये आपल्याला आनंद दिघे साहेबांचे कार्य पाहायला मिळाले.आनंद दिघे साहेबांचे त्यावेळेच्या शिवसेनेसाठी केलेलं काम आपल्या सर्वांनाच आहे. ठाण्यामध्ये शिवसेना रुजवण्याचे व वाढवण्याचे शिवधनुष्य जर कोणी पेललं असेल तर ते म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब. धर्मवीर या चित्रपटातून आनंद दिघे साहेब घरोघरी पोहोचले असे म्हणायला हरकत नाही. धर्मवीर या चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी आनंद दिघे यांचे कार्य उत्तमपणे चित्रित केले होते.

आनंद दिघे साहेबांचे कार्य त्यांची हिंदुत्वाची गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न प्रवीण तरडे यांनी धर्मवीर २ चित्रपटातून केला आहे आणि त्याच बरोबर आनंद दिघे साहेबांचे कार्य दाखवताना एकनाथ शिंदे साहेबांच्या बंडा विषयीची माहिती जास्त आपल्यासमोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि ते पाहण्याची उत्सुकता काही औरच होती. बिग बजेट अशा हिंदी सिनेमांनाही लाजवणारा असा हा धर्मवीर २ हा चित्रपट खरंच खूप उत्सुकता निर्माण करणार आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच कोरोना काळात जमावाने पालघर मध्ये भगवी वस्त्र धारण केलेल्या दोन साधूंची हत्या दाखवली आहे. तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे या घटनेने अस्वस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या घटनेने अस्वस्थ झालेल्या एकनाथ शिंदे यांना अचानकपणे आनंद दिघेंचा यांचा साक्षात्कार होतो आणि मग आनंद दिघे साहेब एकनाथ शिंदे यांना भगव्याचे महत्त्व पटवून देतात.

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.) Dharmaveer 2 Review

त्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक घटना आपल्याला पाहायला मिळाल्या. एका मागोमाग एक घटना घडताना दाखवून त्यानंतर काँग्रेसच्या आघाडीत शिवसेनेची कशा पद्धतीने घुसमट होते हे समोर येते. शिवसेनेच्या नेत्यांची होणारी घुसमट आणि त्यातूनच निर्माण झालेली बंडाची पार्श्वभूमी ही चित्रपटाला एक वेगळेच वळण प्राप्त करून देते. एक उत्सुकतेच वातावरण निर्माण करणारा हा चित्रपट अनेक प्रकारे प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करून देणारा ठरला आहे.

Dharmaveer 2 review : धर्मवीर २ चे लेखन आणि दिग्दर्शन कोणी केलं ?

आनंद दिघे यांच्या आयुष्यातील घडामोडी व एकनाथ शिंदे यांच्या कार्याची सांगड घालणारा धर्मवीर २ हा चित्रपट आहे. “धर्मवीर २” या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलेले आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या धर्मवीर या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती चित्रपट लोकांना खूप आवडला होता. अशातच धर्मवीर या चित्रपटाचा सिक्वेल सर्वांच्या भेटीला आला. परंतु धर्मवीर च्या तुलनेत धर्मवीर २ चित्रपटाचे संवाद कमी प्रभावी वाटतात हा केवळ चित्रपट नसून यात अनेक प्रश्नांची उत्तर आहेत असं चित्रपट निर्माते म्हणतात.

पालघर मधील साधून वर केला गेलेला हल्ला, कोरोना मध्ये ऑक्सिजन साठी एकनाथ शिंदे यांनी केलेली मदत, दिघेंनी सुरू केलेल्या सराव परीक्षांचा होणारा फायदा, बहीणींच्या रक्षणासाठी उचललेला हात, हू इज एकनाथ शिंदे ? अशा विचारल्या गेलेल्या प्रश्नामुळे निर्माण झालेले रामायण अशी अनेक पार्श्वभूमी यात आपल्याला पाहायला मिळाली. शिवसेनेमध्ये बंडाची ठिणगी का पडली ? या प्रश्नाचे उत्तर सुद्धा धर्मवीर २ चित्रपटात देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलायचं तर अजून उत्तम प्रकारचं संगीत चित्रपटाला देऊ शकले असते.

धर्मवीर २ चित्रपटामध्ये आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता प्रसाद ओक यांनी उत्तम पद्धतीने आनंद दिघे साहेबांची भूमिका बजावली हे आपल्याला पाहायला मिळालं. प्रसाद ओक यांचे अभिनय क्षेत्रातील कार्य आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. एक भन्नाट अप्रतिम नट अशी ओळख चित्रपटसृष्टीत जर कोणाची असेल तर ते म्हणजे प्रसाद ओक. मोठ्या पडद्यावर आनंद दिघे साहेबांना पाहायचं आहे ? प्रसाद ओक ला विसरून डोळ्यासमोर आनंद दिघे साहेबांचे चित्र उभे राहिल्याचा अनुभव घ्यायचा आहे ? तर धर्मवीर २ साहेबांच्या हिंदूत्वाची गोष्ट नक्की पाहायला जा खऱ्या अर्थाने एखाद्या अभिनेत्याने एक व्यक्तिरेखा चोखपणे कशी वठवावी हे जाणून घ्यायचं असेल तर धर्मवीर २ नक्की पहा !

Exciting Bhool Bhulaiyaa 3 Teaser : विद्या बालनच आहे मंजोलीका नेमकं काय आहे टिझरमध्ये वाचा..!

खरंच एखादी व्यक्तीरेखा जिवंत करणे खूप कठीण असतं. जे प्रसाद ओक यांनी उत्तमपणे पार पाडलं. धर्मवीर २ या चित्रपटामध्ये सर्व बाजूंनी प्रसाद ओक यांनी आपली आनंद दिघे साहेबांची भूमिका चोखपणे पार पडली. परंतु काही भागांमध्ये मेकअप मध्ये फरक जाणवतो. धर्मवीर एकच्या तुलनेने धर्मवीर दोन मध्ये प्रसाद ओक यांची भूमिका कमी प्रमाणात पाहायला मिळते. या चित्रपटामध्ये क्षितिज दाते यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका बजावली. त्यांची चित्रपटातील ही भूमिका मोठी असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिला. क्षितिज दाते यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका अत्यंत उत्तम पार पाडून एकनाथ शिंदे यांचे हातवारे ,त्यांचे बोलणे, आणि प्रत्येक गोष्ट योग्यपणे अभ्यासून त्याचे जशास तसे अनुकरण आपल्या अभिनयातून साकारत क्षितिज दाते यांनी आपली भूमिका चोखपणे पार पडली.

यांच्यासोबत अजून अनेक कलाकारांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडून आपल्या तुफान अभिनयातून चित्रपट उत्तमपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर अनेक कलाकार या चित्रपटात काम करत होते अनेक कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम करून आपली भूमिका पार पडली. भरत गोगावले यांच्या भूमिकेमध्ये धर्मवीर २ या चित्रपटात आपल्याला सुनील तावडे पाहायला मिळाले. त्याचबरोबर शहाजी बापूंच्या भूमिकेत आपल्याला आनंद इंगळे पाहायला मिळाले ते देखील त्यांच्या भूमिकेत आपल्याला शोभून दिसले. अभिजीत खांडकेकर यांनी दादा भुसे यांची भूमिका चोखपणे पार पडली. पत्रकाराच्या भूमिकेतील मंगेश देसाई यांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळाला.

तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणी अशाच नवीन नवीन अपडेट साठी चित्रपट चर्चा ला फॉलो करा !