New Serial on Star Pravah “Aai baba Retire Hot Ahet” : स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या मालिकेत निवेदिता सराफ यांची मुख्य भूमिका..!

Aai baba Retire Hot Ahet : नवी मालिका येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला

“घरोघरी मातीच्या चुली”, “येड लागलं प्रेमाचं”, “थोडं तुझं थोडं माझं” या लोकप्रिय मालिकां नंतर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनेक प्रोमों मधून स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांना नवनवीन मालिकांची ओळख करून देत आहे. नुकताच “उदे ग अंबे” मालिकेचा प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांसमोर आणला. आता याच बरोबर आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या मालिकेचे नाव आहे “आई आणि बाबा रिटायर होत आहेत.” ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच या मालिकेचा प्रोमो सर्वांसमोर आणून मालिकेची ओळख सर्वांना करून दिली. या मालिकेमध्ये निवेदिता सराफ आपल्याला प्रमुख भूमिकेमध्ये दिसतील . घरातील सर्व जबाबदाऱ्या चोख पणे पार पाडणारी गृहिणीची भूमिका निवेदिता सराफ बजावताना आपल्याला दिसतील . या पहिल्या प्रोमो मधून स्टार प्रवाह वाहिनीने अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम यांच्या प्रमुख भूमिकांची ओळख आपल्या सर्वांना करून दिली. आता यांच्याच बरोबर आणखी कोण कोण कलाकार या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आणि मालिका कशाप्रकारे लोकांना आवडणार हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

Aai baba Retire Hot Ahet
Aai baba Retire Hot Ahet Credit :- Google

Aai baba Retire Hot Ahet : नक्की काय असेल या नव्या मालिकेत ?

“आई आणि बाबा रिटायर होत आहेत” या मालिकेचा नुकताच प्रोमो आपल्या सर्वांसमोर आला आहे. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम मुख्य भूमिकेत आपल्याला दिसून येतात. स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेत नक्की काय आहे हे थोडक्यात पहिल्या प्रोमो मधून आपल्याला दाखवले. प्रोमोमध्ये निवेदिता सराफ घरातली सर्व कामे सांभाळत आपली जबाबदारी पार पाडताना दाखवले आहे. घरातल्या सर्वांची सेवा करून नातवंडांना सांभाळणं ही भूमिका बजावणारे पात्र म्हणजे निवेदिता सराफ.

प्रोमो मध्ये अभिनेते मंगेश कदम यांचा रिटायरमेंट चा दिवस दाखवला आहे. रिटायरमेंटच्या दिवशी घाई घाई मध्ये ऑफिसला जाण्याची गडबड त्यामध्ये त्यांची पत्नी म्हणजेच निवेदिता सराफ यांची उडालेली तारांबळ व त्यातही त्यांनी उत्तमपणे निभावलेली त्यांची जबाबदारी यांचा सुरेख संगम पहिल्या प्रोमो मधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला गेला. “माझी रिटायरमेंट झाली की आपण दोघे गावाला जाऊ”, असं प्रोमो मध्ये अभिनेता मंगेश कदम आपल्या पत्नीला म्हणजेच निवेदिता सराफ यांना सांगतात. परंतु गावी गेल्यावर मुलांच्या आणि नातवंडांची काळजी कोण घेणार ? या विचारात निवेदिता सराफ असतात. आनंद आणि चिंता या दोघांचं एकत्र मिश्रण पहिल्याच प्रोमो मधून आपल्याला पाहायला मिळालं. आता स्वतःच्या आनंदासाठी दोघेही गावी जाणार की मुलांच्या काळजीपोटी आपली स्वप्न आणि आपला आनंद विसरणार ? हे आपल्याला मालिका पाहिल्यावरच समजेल..

Deepika & Ranveer will raise baby themselves : लेकीच संगोपन स्वतः करणार दीपिका आणि रणवीर..!

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.) Aai baba Retire Hot Ahet

Aai baba Retire Hot Ahet : या नव्या मालिकेत आपल्याला कोण कोण पाहायला मिळणार ?

या मालिकेत मुख्य भूमिकेत आपल्याला निवेदिता सराफ व अभिनेता मंगेश कदम ही पात्र दिसली. आता यांच्यासोबत आणखी कोण कोण या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार हे अद्याप तरी समोर आलेले नाही. या मालिकेत कोण कोण आपली भूमिका बजावून ही मालिका रंजक व सर्वांच्या आवडीची बनवणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलंय. नक्की कोण कोण असणार या मालिकेत अशी चर्चा सर्व प्रेक्षकांमध्ये सध्या सुरू आहे. लवकरच स्टार प्रवाह वाहिनी दुसऱ्या प्रोमो मधून आपल्याला या मालिकेतील पात्रांची सुद्धा ओळख करून देईल.

Aai baba Retire Hot Ahet
Aai baba Retire Hot Ahet Credit :- Google

सध्या तरी स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेची वेळ व दिनांक प्रेक्षकांसमोर आणली नाही परंतु लवकरच स्टार प्रवाह वाहिनी या मालिकेची वेळ व दिनांक प्रेक्षकांसमोर आणणार आहे. आता नवीन मालिका येणार म्हणजे जुनी कोणतीतरी मालिका आपल्याला निरोप तर देणारच.. मग आता कोणती मालिका आपल्याला निरोप देणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ही नवी मालिका प्रेक्षकांना आपलंसं करेल का ? प्रेक्षक या मालिकेला कितपत प्रतिसाद देतील ? टीआरपीच्या दृष्टिकोनाने मालिकांमध्ये सुरू असलेली स्पर्धा पाहता ही मालिका आपले अस्तित्व कशाप्रकारे टिकवेल ? हे पाहणं आता जास्त महत्त्वाचं ठरलंय..

Aai baba Retire Hot Ahet : प्रोमोला चहात्यांनी दिला भरभरून प्रतिसाद

“आई आणि बाबा रिटायर होत आहेत” या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर नुकताच आलेला पाहायला मिळतोय. समोर आलेल्या प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सोशल मीडिया द्वारे प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे व्यक्त केलेल्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर अभिनेता चेतन वडनेरे यांनी अभिनेता मंगेश कदम यांचे अभिनंदन व शुभेच्छा देणारी कमेंट केलेली सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतेय.

मंगेश सरांसोबत सर्व टीमला शुभेच्छा देत त्यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. मालिकेच्या पहिल्या प्रोमो मधून आपल्याला फक्त निवेदिता सराफ व मंगेश कदम यांची जोडी पाहायला मिळाली. त्यांच्याबरोबरच अजून कोण कोण या मालिकेत काम करणार अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू आहे. नक्की कोण कोण या मालिकेत आपली भूमिका बजावणार व मालिका कशाप्रकारे प्रेक्षकांचे मन जिंकणार याकडे सध्या सर्वांचे डोळे लागले आहेत.

तुम्ही या नव्या मालिकेचा प्रोमो पाहिलात का ? जर पहिला असेल तर तुमच्या प्रत्रिक्रिया आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.