saddened Actor Vijay Kadam passes away at 67 :- मराठी चित्रपटसृष्ठीला बसला मोठा धक्का !

Actor Vijay Kadam passes away

मराठी चित्रपटसृष्टीतले जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज सकाळी निधन झाले. अंधेरीमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असं वृत्तावरून समजतंय ते ६७ वर्षाचे होते. Actor Vijay Kadam विजय कदम हे गेल्या दीड वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते मध्यन्तरी त्यांची तब्येत सुधारली होती. विजय कदम यांच्या पच्छात त्यांची पत्नी पद्मश्री आणि मुलगा गंधार कदम आहे. मुंबईतील ओशिवरा येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलं गेलं.

Actor Vijay Kadam passes away
Actor Vijay Kadam passes away Credit :- Google

विजय कदम यांनी १९८० ते १९९० च्या दहा वर्षात त्यांच्या एक्टिंग कौशल्याचं दर्शन मराठी बरोबरचं हिंदी चित्रपटात दाखवलं. त्यांनी मराठी चित्रपट मालिका, नाटकं आणि मालिकांमधून खूप कामे केली. खुमखुमी, टुरटुर, पोलीस नामा यांसारख्या नाटकात त्यांचं काम उल्लेखनीय होतं पण इच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यामध्ये केलेलं विजय कदमांचं काम प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहील. तसेच मालिकांबद्दल बोलायचं झालं तर चष्मे बहादूर, लावू का लाथ, हळद रुसली कुंकू हसलं यांसारख्या अनेक मालिकांमधून त्यांनी आपला अभिनयाचा ठसा उमटवला.

विजय कदम यांनी १९८० ते १९९० या काळात अनेक विनोदी भूमिका केल्या. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांची ऑनस्क्रीन केमिस्त्री प्रेक्षकांना आवडायला लागली त्यामुळेच त्यांच्या सिनेकारकिर्दीला सुरवात झाली. रथचक्र, टुरटुर अशा नाटकांमधून त्यांनी आपली एक वेगळीच ओळख प्रेक्षकांसमोर उभी केलेली. त्यांनी जेवढ्यापण नाटकात काम केलंय ती सर्व नाटके गाजली होती त्यामध्यली इच्छा माझी पूर्ण करा, आणि टुरटुर हि नाटके तर प्रचंड गाजली होती. नाटकांप्रमाणे त्यांची ‘पोलीसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘आम्ही दोघे राजा राणी’, हे चित्रपटही खूप गाजले.

big boss marathi season 5 : ‘तुझं तोंड शिवलं होतं का ? छोटा पुढारी आणि धनंजय पोवारमध्ये झाली बाचाबाची

त्यांचे शालेय शिक्षण डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले होते आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून झाले पुढे “तत्वज्ञान” या विषयावर त्यांनी पदवीदेखील मिळवली होती. आंतरशालेय आणि एकांकिका स्पर्धेत ते सतत भाग घेत असत. त्यांचे पहिले व्यवसायिक नाटक ‘अपराध कुणाचा’ हे होते त्याचबरोबर ‘खंडोबाचं लगीन’, ‘स्वप्न गाणे संपले’, हि त्यांची काही गाजलेली नाटके आहेत. विजय कदम यांनी ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बालनाट्यामध्ये हवालदाराची भूमिका साकारली होती पुढे ‘जागरण विधी’, या नाटकाने विजय कदम यांना नाट्य दर्पणाचा सर्वोत्कृष्ट लोकनाट्य अभिनेता हा पुरस्कार मिळवून दिला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.) Actor Vijay Kadam passes away

विजय कदम यांनी लोकनाट्याचे ७५० हुन अधिक प्रयोग केले आहे. वासुदेव बळवंत फडके, आनंदी आनंद, रेवती, वाजवला बाजा, देखणी बायको नाम्याची, मेनका उर्वशी, इरसाल कार्टी, लावू का लाथ, गोळाबेरीज, ऑन ड्युटी २४ तास, कोकणस्थ असे एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट त्यांनी आपल्याला दिलेत त्याबरोबरच इंद्रधनुष्य, सोंगाड्या, बाज्या, घडलय बिघडलंय, पार्टनर, दामिनी, गोट्या अश्या मराठी मालिका आणि श्रीमान श्रीमती, मिसेस माधुरी दीक्षित, अफलातून, घर एक मंदिर यांसारख्या हिंदी मालिका केल्या.

आज कर्करोगाशी झुंज देताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप मोठं नुकसान झालंय त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीमधे पोकळी निर्माण झालीय ती कधीच भरून काढता येणार नाही. एक जबरदस्त विनोदवीर, हरहुन्नरी कलाकार आज आपल्यातून गेला याची खंत साऱ्या सिनेसृष्टीला वाटेल. त्यांच्या कुटुंबीयांना कठीण काळात बळ देवो आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो फक्त एवढंच ईश्वर चरणी प्रार्थना चित्रपट चर्चा टीमच्या वतीने करतो.

मराठी ऍक्टर प्रशांत दामले यांनी आपल्या प्रत्रिक्रिया व्यक्त करताना म्हटलंय कि “परवापर्यंत आम्ही भेटत होतो माझ्यासाठी हे खूपच धक्कादायक आहे विजय तू खूपच लवकर गेलास”. प्रशांत दामले यांनी पहिल्यांदाच १९८३ मध्ये टुरटुर नाटकामध्ये विजय कदम यांच्याबरोबर काम केलं. लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम यांची जोडी जबरदस्त होती त्यांना बघत बघत आम्ही शिकलो मी, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर, विजय पाटकर नेहमी त्यांना बघायचो त्यांच्याकडून शिकायचो. विजय कदम आऊटस्टँडिंग होते मुख्य म्हणजे सहकलाकाराला पाठिंबा देणारे होते. त्यांची रिएक्शनची स्टाईल वेगळी होती असे प्रशांत दामले म्हणाले.

सिनेसृष्टीतल्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका. (Actor Vijay Kadam passed away)