Auron Mein Kahan Dum Tha :- म्हणत अजय देवगणने केला धमाकेदार टिझर लाँच या अभिनेत्रीसोबत करतोय स्क्रीन शेअर

Auron Mein Kahan Dum Tha :- अजय देवगण आणि तब्बू मधलं प्रेम या चित्रपटातून खरंच जगासमोर येईल का ? जाणून घ्या काय खरं ते

बॉलीवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगण त्याच्या फॅन्ससाठी नेमहीच नवनवीन चित्रपट घेऊन येत असतो. यावर्षी अजय देवगण 55 झाला आहे तरीही बॉलीवूडमध्ये जर कोणी धाकड ऍकशन करत असेल तर त्यात अजय देवगण पहिल्या नंबरवर असेल आणि त्याच उत्तम उदाहरण म्हणजे सिंघम. तसेच या वर्षाची सुरवात अजय देवगणसाठी खूप चांगली झाली ती अशी कि फक्त 65 करोडमध्ये बनलेल्या र. माधवन आणि अजय देवगणच्या चित्रपटाने जगभरात तब्बल 211 करोडची कमाई केली आणि OTT प्लॅटफॉर्मवरपण शैतानला लोकांची चांगली पसंती मिळतेय.

Auron Mein Kahan Dum Tha

तर विषय असा आहे कि गेल्या शुक्रवारी त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून “Auron Mein Kahan DumTha” या नवीन चित्रपटाचा टिझर लाँच केला आणि काही मिनिटातच त्याच्या फॅन्सनी टिझरला चांगला प्रतिसाद दिला . टीझरमध्ये तुम्हाला अजय देवगणसोबत आतापर्यंत खूप चित्रपटातून झळकलेली त्याची मैत्रीण म्हणजेच बॉलीवूडची अभिनेत्री तब्बू बघायला मिळेल .

Auron Mein Kaha Dum Tha हा चित्रपट डायरेक्ट केलाय नीरज पांडे यांनी आणि तो येत्या 5 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. होय ! हे तेच नीरज पांडे आहेत ज्यांनी आपल्या सर्वाना 2008 सालचा ” वेनसडे ” सारखा क्लासिक थ्रिलर चित्रपट दिला जो प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. खरंतर नीरज पांडे यांच्या कामाची लिस्ट खूप मोठी आहे ती आपण सविस्तर जाणून घेऊया

Auron Mein Kahan Dum Tha – Official Teaser

नीरज पांडे यांनी डायरेक्ट केलेले चित्रपट :- वेनसडे , अईयारी , एम एस धोनी द अंटोल्ड स्टोरी, स्पेशल 26 , आणि Auron Mein Kaha Dum Tha.

MR. AND MRS. MAHI :- एका अयशस्वी क्रिकेटरची रोमँटिक लव्ह स्टोरी

Auron Mein Kahan Dum Tha
Auron Mein Kahan Dum Tha :- म्हणत अजय देवगणने केला धमाकेदार टिझर लाँच या अभिनेत्रीसोबत करतोय स्क्रीन शेअर

Auron Mein Kahan DumTha च्या टिझरमध्ये नेमकं काय आहे ?
Auron Mein Kahan DumTha च्या टिझरमध्ये आपल्याला होळीचा एक सीन दाखवलाय ज्यामध्ये अभिनेता अजय देवगण आणि तब्बू एकमेकांना गुलाल लावतात आणि अजय देवगण च्या आवाजात एक डायलॉग आहे ज्यावरून अस समजतंय कि Auron Mein Kahan DumTha ha चित्रपट एका अशा लव्ह स्टोरी बद्दल आहे जी कधीच पूर्ण होऊ शकली नाही काही कारणामुळे ते दोघे वेगळे झाले आणि ते कारण काय असणार हे आपल्याला येत्या 5 जुलैला समजेल . या आधीही अजय देवगण आणि तब्बू यांची ऑन स्क्रीन रोमँटिक लव्हस्टोरी आपण कित्येक चित्रपटातून [पाहिलीय पण हा चित्रपट प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येईल हीच एक आशा प्रेक्षकांच्या मनात आहे

Auron Mein Kahan DumTha चित्रपटाची स्टारकास्ट काय आहे ?

अजय देवगण , तब्बू जिमी शेरगिल, शंतनू माहेश्वरी , पुष्पेंद्र सिंग आणि आपल्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजेच सई मांजरेकर सुध्या या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

तुम्ही Auron Mein Kahan DumTha चित्रपटाचा टीझर पाहिलात का ? नसेल तर हा बघा

मराठमोळी अभिनेत्री आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले सुप्रसिद्ध अभिनेते आणि डायरेक्टर महेश मांजरेकर यांची लाडकी कन्या म्हणजेच सई मांजरेकर आपल्याला या चित्रपट पाहायला मिळेल पण सध्या टीझरमध्ये ती दिसत नसली तरी चित्रपटात तिची भूमिका मोठी असेल यात काही शंका नाही.

Auron Mein Kaha Dum Tha चित्रपटत नेमकं काय पाहायला मिळेल ?
एकंदरीत चित्रपटाच्या टीझरवरून लक्षात येतंय कि हा चित्रपट एक म्युझिकल लव्ह स्टोरी असेल ज्याची स्टोरी 2002 ते 2023 अश्या 20 वर्षांमधली असणार आहे . या चित्रपटाला संगीतबद्द केलंय फेमस म्युझिक डायरेक्टर मम करीम ज्यांना गेल्या वर्षी आर.आर .आर चित्रपतील लोकप्रिय गाणं ” नाठु नाठु ” साठी ऑस्कर पुरस्कार मिळालं होतं .अजय देवगण आणि तब्बू यांनी बॉलीवूड ला एकापेक्षा एक असे चित्रपट दिलेय ते या आधी विजयपथ , हकीकत , थक्षक , द्रिश्यम , गोलमाल अगेन , दे दे प्यार दे , द्रियम 2, आणि भोला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

Auron Mein Kahan Dum Tha :- म्हणत अजय देवगणने केला धमाकेदार टिझर लाँच या अभिनेत्रीसोबत करतोय स्क्रीन शेअर
Auron Mein Kahan Dum Tha :- म्हणत अजय देवगणने केला धमाकेदार टिझर लाँच या अभिनेत्रीसोबत करतोय स्क्रीन शेअर

अजय देवगणचे आगामी चित्रपट :- Auron Mein Kaha Dum Tha चित्रपटाशिवाय अजय देवगण आपल्याला सिंघम 2, रेड 2, आणि नुकताच येऊन गेलेला शैतानचा रिमेक म्हणजेच शैतान 2 मध्ये दिसणार आहे.

तब्बूचे आगामी चित्रपट :- सध्या तब्बूचा क्रिव ( crew )हा चित्रपट रिलीझ होऊन गेला आणि Auron Mein Kahan Dum Tha चित्रपट येऊ घातलाय

तर मित्रांनो तुम्ही जर Auron Mein Kaha Dum Tha चित्रपटाचा टिझर पहिला असेल तर आम्हांला तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू बॉलीवूड आणि मराठी चित्रपतील नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.

Leave a Comment