bad newz box office collection day 13
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलच्या bad newz या चित्रपटाने काल म्हणजेच शनिवारी जवळपास २ कोटींचा गल्ला जमावलंय. सध्या चित्रपटाचं विशेष आकर्षण बनतेय ती म्हणजे सगळ्यांची आवडती आणि नॅशनल क्रश असलेली तृप्ती डिमरी जिला बघण्यासाठी लोकं थेटरमध्ये गर्दी करतायत. चित्रपटाच्या ओव्हरऑल बॉक्स ऑफिस कमाईचा जर आपण अंदाज घेतला तर विकी कौशलच्या चित्रपटाला थोडी जास्त गर्दी अपेक्षित होती. तरुणाईमध्ये तृप्ती डिमरीचे आणि विकी कौशलचे चाहतेही तसे बरेच आहेत.
बॅड न्यूझ चित्रपटाला रिलीज होऊन सहा दिवस झालेत पण ट्रेलरमध्ये दाखवलेली त्यांची केमिस्टरी आणि रोमान्स प्रेक्षकांना तितका आवडलेला दिसत नाहीय. या चित्रपटातील विकी कौशल याचं तौबा तौबा हे गाणं तरुणाईच्या आवडीचं झालंय. २७ डिसेंबर २०१९ मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमार करीना कपूर, कियारा अडवाणी यांच्या गुड न्यूझ चित्रपटाला जसा प्रेक्षकांचा प्रतिसाद होता तसा प्रतिसाद विकी आणि तृप्तीच्या बॅड न्यूझला मिळत नाहीय त्याबद्दल आश्चर्यच वाटतंय.
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)
bad newz box office collection day 13 :- बॅड न्यूझ चित्रपटाने नक्की केलेली कमाई किती जाणून घ्या इथे
बॅड न्यूझ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ८.३ करोड कमावले , दुसऱ्या दिवशी १०.२५ करोडची जबरदस्त उसळी मारली. चौथ्या आणि पाचव्या दिवशी चित्रपटाने थोडी निराशाजनक कमाई केली ती ३.५ करोड आणि ३.७५ करोडची. सहाव्या दिवशी चित्रपट ३.१५ करोड कमाऊ शकला मग सातव्या दिवशी तो आकडा २.७५ वर येऊन पोहोचला आणि अशी एका आठवड्यात चित्रपटाने ४२.८५ कोटींचा गल्ला जमावला.
much awaited Dharmveer 2 trailer launch :- धर्मवीर २ ट्रेलर लाँचला कोणी कोणी लावली हजेरी जाणून घ्या
दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीला म्हणजेच आठव्या दिवशी चित्रपटाने २.१५ करोड, नवव्या दिवशी ३.२५ करोड आणि दहाव्या दिवशी म्हणजेच काल चित्रपटाने १.५१ करोड कमावले, अकराव्या दिवशी फक्त १.२ करोडची कमाई केली बाराव्या दिवशी तेच त्याने १.४ करोड आणि तेराव्या दिवशी १.२५ करोड कमावून एकंदरीत आतापर्यंत जवळपास ६० करोडची कमाई केलीय. खरंतर विकी कौशलचा चित्रपट म्हटला तर चित्रपटाला थोडी जास्त गर्दी अपेक्षित होती पण चित्रपटाला गर्दी कमी दिसतेय असं एकंदरीत समजतय.
bad newz box office collection day 13 थोडं चित्रपटाबद्दल जाणून घेऊ :-
बॅड न्यूझचित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर इशिता मोईत्रा आणि तरुण दुडेजा यांनी चित्रपटाचं लेखन केलय. चित्रपटाचा पहिला भाग तुम्हाला चित्रपटामध्ये गुंतवून ठेवतो. चित्रपटामध्ये काही काही ठिकाणी असे जोक्स आहेत जे प्रेक्षकांना हसायला लावतात. विकी कौशल, तृप्ती डिमरी यांचे पात्रापण खूप चांगल्या प्रकारे खुलून येतात दोघांनीपण खूप मस्त एक्टिंग केलीय.
चित्रपटाच्या इंटर्वलनंतर चित्रपट काही ठिकाणी प्रेक्षकांना खिळवून ठेऊ शकला नाही. काही डिआलॉग्स परत परत आलेत असे वाटते. ओव्हरऑल चित्रपटाचा स्क्रीनप्लेय एकदम स्मूथ आहे एक फ्रेश रिफ्रेशिंग काहीतरी बघायचं असेल तर नक्कीच बॅड न्यूझ तुमच्यासाठी एक चांगला ऑपशन असेल.
bad newz box office collection day 13 :- जाणून घेऊया बॅड न्यूझ चित्रपटाबद्दल
अक्षय कुमार, दिलजीत डोसांज, करीन कपूर आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला २०१९ साली रिलीज झालेला गुड न्यूझ चित्रपटाचा हा पुढचा भाग बोलायला काही हरकत नाही. बॅड न्यूझ हा नेहमीच्या रॉम-कॉम चित्रपटापेक्षा थोडा वेगळा आहे यात फ्रेशनेस आहे जो हल्लीच्या टिपीकल रोमँटिक कॉमेडी चित्रपटात नसतो. विकी कौशल, तृप्ती डिमरी, नेहा धुपिया आणि अँम्यी विर्क यांच्या मुख्य भूमिकेमध्ये बनलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केलं आहे.
अनुराग बसूच्या “बर्फी” चित्रपटासाठी अनुराग बसूला आनंद तिवारी यांनी अस्सीस्ट केलं होतं. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी लव्ह पर स्क्वेर फूट नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला आणि आता बॅड न्यूझ दिग्दर्शित केला. एकाच वेळी दोन पुरुषाकडून ट्वीन प्रेग्नन्ट राहिलेल्या एका महिलेच्या आयुष्यात कशाप्रकारे घटना घडतात याचं विनोदी माध्यमातून वर्णन करायचं झालं तर बॅड न्यूझ हा चित्रपट आहे. बॅड न्यूझ चित्रपटाची निर्मिती अमरतीपाल सिंघ बिंद्रा, अपूर्वा मेहता आणि कारण जोहर या तिघांनी मिळून केलीय.
Bad Newz starcast :- बॅड न्यूझची स्टारकास्ट बघा :-
बॅड न्यूझ चित्रपटात मुख्य भूमिकेत विकी कौशल, तृप्ती डिमरी, आणि एमी विर्क आहेत. चित्रपटात विकी कौशल अखिल चड्डा, तृप्ती डिमरी सलोनी बग्गा आणि एमी विर्क गुरबीत सिंघ पन्नू अशे रोल करतायत. तिघांमधला लव्ह ट्रॅन्गल चित्रपटात दाखवला आहे आणि त्यातून घडणाऱ्या घटनांना विनोदी पद्धतीने दाखवायचा प्रयत्न दिग्दर्शक आनंद तिवारीने केला आहे. चित्रपटात अनन्या पांडे, गजराज राव आणि नेहा धुपिया यांचा गेस्ट अँपीअरन्स रोल आहे.
तुम्ही बॅड न्यूझ चित्रपट पाहिलात का ? जर पहिला असेल तर तुमच्या प्रत्रिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका आणि चित्रपटसृष्टीच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका. ( bad newz box office collection day 13 )