“Bai Ga Movie” :- Chand Thambla Song चित्रपटातलं चांद थांबला गाण्याला मिळतेय प्रेक्षकांची पसंती
Swapnil joshi आणि Prarthana behere हे दोघे जर एकत्र एका चित्रपटात असले म्हणजे तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर कल्ला करणार हे समीकरण फिक्स झालाय त्यात swapnil joshi ने अलीकडच्या काळात त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे त्या चित्रपटाचे नाव आहे Bai ga आहे त्यात swapnil joshi 6 अभिनेत्रीसोबत झळकणार आहे.
अलीकडेच swapnil joshi ने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं होतं आणि एक निर्माता म्हणून त्याच्या “नाच गं घुमा” चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. प्रेक्षकांनी “नाच गं घुमा” चित्रपटाला अगदी डोक्यावर घेतलं होतं आणि तेवढ्यातच त्याने त्याच्या आगामी “Bai ga movie” ची घोषणा केली. या चित्रपटात swapnil joshi सोबत सुकन्या मोने , प्रार्थना बेहेरे, अदिती सारंगधर, दीप्ती देवी , नम्रता गायकवाड आणि नेहा खान या अभिनेत्रीचा समावेश असणार आहे. 6 अभिनेत्रींसोबत swapnil joshi या चित्रपटातून कोणता विषय घेऊन येणार आहे याची उत्सुकता तर सगळ्या प्रेक्षकांना आहेच पण नुकतंच “चांद थांबला” हे या चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय…
“मितवा” चित्रपटानंतर swapnil joshi आणि prarthana behere ह्यांची जोडी bai ga movie मध्ये झळकणार आहे त्यामुळे तब्बल 9 वर्षानंतर सुपरहिट जोडीचं कमबॅक मोठया पडद्यावर होत असल्यामुळे प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. Bai Ga movie मधलं “Chand Thambla” हे गाणं swapnil joshi आणि prarthana behere या दोघांवर चित्रित झालेलं आहे. या गाण्यातली दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना भावते आहे त्यामुळे या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.हे एक लव्ह सॉंग असून कमी वेळातच प्रेक्षक या गाण्याच्या प्रेमात पडलेत
हेपण वाचा :- MUNJYA BOX OFFICE COLLECTION: अवघ्या 3 दिवसात कोटींमध्ये कमाई
Bai ga Movie बद्दल थोडी अधिक माहिती घेऊया :-
ए बी सी क्रिएशन , नितीन वैद्य प्रॉडक्टशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग जाधव यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती डॉ. आशिष अग्रवाल , नितीन प्रकाश वैद्य आणि ओ. एम, जी. मिडिया व्हेंचर्स यांनी केलं आहे. “Bai ga movie” चे संकलन निलेश गावडे यांनी केले असून छायांकन नागराज एम.डी दिवाकर यांनी केले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, आणि संवाद लेखन पांडुरंग कृष्ण जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहे. चित्रपटाची गाणी जय अत्रे, मंदार चोळकर आणि समीर सावंत यांनी लिहिली आहेत तर वरूण लिखते यांनी या गाण्यांना स्वरबध्द केले आहेत.
Bai ga चित्रपटातलं “चांद थांबला” गाणं ऐकलंय का ? नसेल तर इथेच ऐका
Bai ga movie ची स्टारकास्ट कोण आहे जाणून घ्या :-
Bai ga movie चित्रपटाला स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, सुकन्या कुलकर्णी मोने, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, समीर धर्माधिकारी आणि सागर कारंडे यासारख्या दिग्गज कलाकारांची जोड मिळाली आहे. चित्रपट एकंदरीत खूप मनोरंजक असणार आहे यात वादच नाही. अवधूत गुप्ते, कविता राम, मुग्धा कऱ्हाडे , शरयू दाते , श्वेता दांडेकर , सुस्मिरता डावलकर आणि संचित मोरजकर ह्यांनी या संपूर्ण चित्रपटाला स्वरबद्ध केलं आहे.
Swapnil joshi आणि Prarthana behere ह्यांनी एकत्र केलेले सिनेमे किती ?
2015 ला प्रदर्शित झालेल्या “मितवा” चित्रपटातून घराघरात पोहोचलेल्या महाराष्ट्राच्या या सुपरहिट जोडीने bai ga movie आधी “फुगे” (2017) आणि “रणांगण” (2018) अशा दोन चित्रपटामध्ये एकत्र काम केलं होतं. तब्बल 9 वर्षांनी हे दोघे bai ga movie मध्ये दिसणार असल्याने एक वेगळीच उत्सुकता आहे
Bai ga Movie ची स्टोरी काय असेल ?
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो पण जर त्याच पुरुषामागे 6 स्त्रीयांचा हात असेल तर केवढी गम्मत होईल नाही का ? असं म्हणतात कि पुरुषाला बाईच्या मनातलं सगळं समजतं पण खरंच तसं आहे का ? या चित्रपटात बाईच्या मनात नेमकं काय काय चालू असतं आणि ते समजण्यासाठी पुरुषाची कशी तारांबळ उडते याचं विनोदी समीकरण म्हणजेच हा चित्रपट आहे. तुम्हालापण वाटतं का कि तुम्ही बाईच्या मनातलं ओळखू शकता तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे.
Bai ga Movie नक्की येतोय तरी कधी ?
Bai ga movie तुमच्या सर्वांच्या भेटीला येतोय येत्या 12 जुलै ला सिनेमागृहात तर पाहायला विसरू नका Baii ga movie तुमच्या मित्र आणि परिवारासोबत आणि चित्रपट चर्चला फॉलो करायला विसरू नका.