big boss marathi season 5
टेलिव्हिजन विश्वात जर सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला कोणता शो असेल तर तो आहे big boss शो सध्या big boss marathi season 5 जोरदार चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात प्रत्येक सदस्यांमध्ये सतत भांडण आणि वादावादी चालू आहेत. घरातील सदस्यांमधली भांडणं आणि बिग बॉसच्या चाहत्यांसाठी काही नवीन राहिली नाहीयत मग ते निकी तांबोळी आणि अंकिता वालावलकरचं भांडण असो किंवा निकी तांबोळी आणि वर्षा उसगावणकरांच प्रेक्षक या सगळ्या भांडणाला ओळखून आहेत. पण पहिल्यांदाच छोटा पुढारी घनश्याम दरवडे आणि दनंजय पोवार यांच्यामध्ये जोरदार वाद झाला.
big boss marathi season 5 : वादाचं नक्की कारण काय जाणून घेऊया
कलर्स मराठीवर शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये धनंजय पोवार आणि घनश्याम दरवडेमध्ये घरातील कामावरून जोरदार भांडण झालं. प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय कि धनंजय घनश्यामला त्याच्याकडे किती ड्युटी आहे असं विचारतात त्यावर घनश्याम त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. धनंजय पुन्हा एकदा घनश्यामला विचारतो तेव्हा घनश्याम त्याला त्याच्याकडे एक काम आहे असं उत्तर देतो त्यावर धनंजय “मगाशी तोंड शिवलं होतं का ?” असं घनश्यामला विचारतात. त्यानंतर घनश्याम बाहेर येतो आणि धनंजयला ड्युटी विचारायची हि कोणती पद्धत आहे म्हणून जाब विचारतो आणि त्यावरूनच त्यांचं जोरदार भांडण सुरु होतं. धनंजय पोवार त्यावर घनश्यामला उत्तर देताना म्हणतो की “माझं तोंड आहे मला वाटेल ते मी बोलेल” आणि मग त्यांच्या वादच रूपांतर जोरदार भांडणात होतं.
कलर्स मराठीची पोस्ट
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)
कलर्स मराठीचा हा प्रोमो चर्चेत आल्यानंतर अक्ख्या महाराष्ट्रातून या प्रोमोवर कंमेंट करत धनंजय पोवारला सपोर्ट केला आहे. लोकांच्या या प्रोमोबद्दल मिश्र प्रत्रिक्रिया आल्यात काही जण म्हणतायत कोल्हापूरच्या लोकांची बोलण्याची पद्धतच अशी आहे तर एकाने कंमेंट केलीय “पुढारी जास्त फड फडू नकोस… बॅग भरायला चालू कर”. “या छोट्याला अजून कोल्हापूर दणका काय असतो ते माहित नाही वाटतं” अश्या धनंजयच्या एका चाहत्यांनी कंमेंट केली. एका रिपोर्टनुसार लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये घनश्याम दरवडे आणि निखिल दामले यांना कमी वोट्स मिळाले असल्याचे समजलेत. त्यामुळे घनश्याम दरवडे या आठवड्यात घराबाहेर जाईल अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये पसरली आहे. त्यावर भर म्हणजे धनंजय आणि घनश्याम मधलं भांडण त्यामुळे धनंजय आणि घनश्याम मधला वाद मिटणार का ? घरात आता पुढे काय होणार ? याची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
यंदाच्या big boss marathi season 5 मध्ये कोण कोण कन्टेस्टंट आहेत
१. निक्की तांबोळी
२. पंढरीनाथ कांबळे
३. सुरज चव्हाण
४. अभिजीत सावंत
५. इरिना रुडकोवा
६. अरबाज पटेल
७. वर्षा उसगावकर
८. वैभव चव्हाण
९. अंकिता प्रभू वालावलकर
१०. धनंजय पोवार
११. जान्हवी किल्लेकर
१२. निखिल दामले
१३. योगिता चव्हाण
१४. आर्या जाधव
१५.. घनश्याम दरवळे
१६. पुरुषोत्तम पाटील
जाणून घेऊया सर्व big boss marathi season चे विजेते
Big boss marathi season १ चे विजेते :- मेघा धाडे
Big boss marathi season २ चे विजेते :- शिव ठाकरे
Big boss marathi season ३ चे विजेते :- विशाल निकम
Big boss marathi season ४ चे विजेते :- अक्षय केळकर
Big boss marathi season 5 :- TRP मध्ये कितव्या स्थानी जाणून घेऊया
Big boss marathi हा असा टेलिव्हिजन शो आहे जो कुठल्याही भाषेत असला तरी त्याला प्रसिद्धी मिळते. त्याची कारणेही तितकीच जास्त आहेत पण एक दोन बोलायची झाली तर ती म्हणजे सेलिब्रिटी शो आणि त्याचं सोशल कंपॅरिजन शोची असलेली विशिष्ट प्रकारची बांधणी ज्यामुळे लोक त्यामध्ये गुंतून जातात. सिरीयल, वेब सिरीजमध्ये खच्चून एंटरटेनमेंट असला तरी सेलिब्रिटी एकाच घरात एकत्र राहतात मग त्यांच्यात वाद होतात प्रेक्षकांना हे वाद जणू आपल्याच आयुष्याचा भाग आहे असं वाटायला लागतं आणि लोकांची गुंतवणूक या शोसाठी वाढत जाते. म्हणूनच भाषा कोणतीही असो बिग बॉसचा होस्ट कोणीही असो बिग बॉस हिट हा नेहमी हिट होणारच. त्यामुळे यंदाच्या big boss marathi season 5 ने टॉप २० मध्ये आपलं स्थान पक्कं केलंय.
तुम्ही big boss marathi season 5 बघता का ? जर बघत असाल तर तुमचा आवडता कन्टेस्टंट कोणता आहे आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरु नका.