Celebrity Bappa 2024 : ‘ओळख सेलिब्रिटी बाप्पाची’ कोण-कोणत्या कलाकारांकडे बाप्पांचं आगमन झालंय चला पाहुयात !

Celebrity Bappa 2024 :

आपण सगळेजण पूर्ण वर्षात ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो तो आपल्या लाडक्या गणरायांचा सण आला. सगळ्यांच्या घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले तर मुंबईचे चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पांसाठी गावी पोहचून त्यांची मनोभावे सेवा करतायत. याला आपली मराठी चित्रपटसृष्टी काही अपवाद नाहीय. चित्रपटसृष्टीतल्या आपल्या लाडक्या कलाकारांनीसुद्धा दरवर्षीप्रमाणे या वर्षीपण आपल्या घरी लाडक्या बाप्पांचं अगदी धुमधाक्यात स्वागत केलयं. चला तर या Celebrity Bappa 2024 च्या आपल्या आर्टिकल सिरीजमध्ये आपण बघुयात ते कोणते सेलिब्रिटी आहेत.

१. Celebrity Bappa 2024 : अभिनेता स्वप्निल जोशी यांच्या घरी झाले गणेशाचे आगमन

लहानपणापासूनच अभिनयाची कला रोमारोमात भरून सर्वांचे मन जिंकणारा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशी ( Swapnil Joshi ) यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पा घरी आल्याचा सुखद क्षण प्रेक्षकांसमोर व्यक्त करताना स्वप्निल जोशी आपल्याला सोशल मीडियावर दिसून येतात. गणपती बाप्पा आणण्याची दहा वर्षाची परंपरा असून दरवर्षी शाडूचा गणपती का आणावा ? बाप्पा 365 दिवस आपल्या सोबत राहू शकतो ना ? असे शब्द प्रयोग करून बाप्पाप्रती प्रेम व्यक्त करत आणि पर्यावरणाविषयी आपुलकी दाखवत आम्ही गॅलरीमध्येच गणपती विसर्जन करतो असे स्वप्निल जोशी म्हणतात.

गिरगाव ला जन्मलेले स्वप्निल जोशी गिरगावच्या गणपतीच्या आठवणी ताज्या करत त्या माझ्या कोर मेमरी आहेत असे प्रेक्षकांना सांगतात. अशा आठवणी ज्या कधीच लुप्त होऊ शकत नाही. बाप्पाची माझ्यावर सुरुवातीपासूनच कृपा आहे आणि नवरा माझा नवसाचा 2 प्रमाणे प्रत्येक चित्रपटात तो ती दाखवून देतो असं म्हणत बाप्पा प्रती आदर त्यांनी व्यक्त केला आहे.एका गिरगावच्या माध्यमवर्गीय मुलाला इथवर आणून ठेवण्याचं श्रेय बाप्पाला देऊन स्वप्निल जोशी बाप्पा चे आभार मानताना प्रेक्षकांना दिसून आले आहेत आता हा सेलिब्रिटी बाप्पा सर्वांवर त्याची कृपा असुदे हेच मागणं ! !

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)

२.Celebrity Bappa 2024 : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पा विराजमान

सर्वांची लाडकी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून चालू असलेल्या महिलांवरील अत्याचारासाठी महिलांवरील संकट दूर करण्याचं साकड बाप्पांसमोर घालताना सोनाली आपल्याला सोशल मीडियावर दिसून येते. गेल्या तीन वर्षा पासून इको फ्रेंडली गणपती बाप्पा बनवण्याची प्रथा सोनाली पुढे चालवत आसल्याच दिसून येतं. होय सोनाली कुलकर्णी स्वतः आपल्या हाताने गणेशाची मूर्ती बनवून प्राणप्रतिष्ठा करताना आपल्याला सोशल मीडियाद्वारा दिसली असेल. या मध्ये माझा भाऊ मला मदत करतो असं म्हणत सोनाली आपल्या कार्यात भावाचे योगदान असल्याचे प्रेक्षक वर्गाला सांगते. सामाजिक संकटांपासून सर्वाचे रक्षण कर असे मागणे देवाकडे मागून सोनाली कुलकर्णी सर्वांसाठी दिर्घाऊष्याची प्रार्थना बाप्पा कडे करते. आता आपणही सर्वांच्या सुखाची इच्छा आणि प्रार्थना बाप्पा कडे करुया.

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)

Ganesh Chaturthi 2024 : झी मराठी वाहिनीवरील ‘या’ मालिकांमध्ये होणार गणेशोत्सव साजरा..

३. Celebrity Bappa 2024 : दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होताना २ तास रडली ज्ञानदा

सर्वांची लाडकी अभिनेत्री अप्पू म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर हिच्या घरी दरवर्षीप्रमाणे बाप्पा विराजमान झाले आहेत. संपूर्ण सजावट बाबांसोबत करून कमीत कमी वेळात यंदा तिने सजावट केल्याचे ती प्रेक्षकांना सांगते. बाप्पा सोबतच्या जुन्या आठवणी ताज्या करत मी दर वर्षी बाप्पा जाताना खूप रडते असं ज्ञानदा म्हणते. गौरी पूजनाची तयारी आणि बाप्पाचे स्वागत ज्ञानादाने जोरात केली आहे मग यंदाही ज्ञानदा रडणार का ? तुम्हाला काय वाटत कमेंट मध्ये नक्की कळवा !

Celebrity Bappa 2024 Dnyanda Ramtirthkar
Celebrity Bappa 2024 Dnyanda Ramtirthkar Credit :- Instagram
४. Celebrity Bappa 2024 : बाप्पा with अभिनय आणि बेर्डे परिवार

महाराष्ट्राचे लाडके अभिनेते अभिनय बेर्डे यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. तब्बल ५ वर्षांनी त्यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. फिरत्या गणपतीची प्रथा असल्याने अभिनय बेर्डे यांच्या घरी ५ वर्षाने बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पाच्या आगमनाने घरात खूप प्रसन्न वातावरण आपल्याला दिसून येते. बाप्पाची कृपा अशीच सर्वांवर असुदे ! तुम्हा सर्वाना चित्रपट चर्चा कडून गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा