Ganesh Chaturthi 2024 : झी मराठी वाहिनीवरील ‘या’ मालिकांमध्ये होणार गणेशोत्सव साजरा..

Ganesh Chaturthi 2024 :

गणपती बाप्पा..मोरया…


गणेशाचे रूप म्हणजे मनाला सुखावणारा आणि मोहून टाकणारा क्षण ! झी मराठी वाहिनीवर देखील आता हा सुखद क्षण आला आहे.
गणपती बाप्पा घरी विराजमान होणार ही कल्पनाच मुळात सुखावणारी असते. त्याच्या सेवेत १० दिवस कसे निघून जातात काही कळतच नाही. बाप्पांमुळे कसं घरात एक मंगलमय वातावरण पसरलेलं असतं. कलाकार मंडळींसाठी शूटिंग सेट म्हणजे त्यांचं दुसरं घर ! म्हणूनच सेट वरच्या त्यांच्या ह्या घरात बाप्पाच अगदी जल्लोषात आगमन केलं आहे. कलाकारांनी आपल्या स्वतःच्या घराप्रमाणे सेट वर गणपती बाप्पाचं पूजन करून बाप्पाचे स्वागत केले आहे.गणेशाचे सुंदर दर्शन झाल्याने मालिकेला एक सुंदर वळण निर्माण झाले आहे. बाप्पाचे आगमन पाहून प्रेक्षकवर्गही सुखावला आहे. बाप्पाच्या येण्याने संपूर्ण सेट प्रसन्न झाले आहे.कलाकार देखील बाप्पाच्या आगमनात अगदी रंगून गेले आहेत.

Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024

तर चला पाहुयात कोण कोणत्या मालिकेत आपल्या लाडक्या बाप्पांचं स्वागत अगदी धूम धडाक्यात झालंय ते

१. आप्पी आमची कलेक्टर या मालिकेत गणपती बाप्पाचे आगमन: Ganesh Chaturthi 2024

झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका आप्पी आमची कलेक्टर या मालिकेत बाप्पाचं पारंपरिकरित्या आगमन झालेलं आहे. गोड धोडाच्या नैवेद्या पासून सजावटी पर्यंत एकदम जबरदस्त तयारी झाली आहे.अर्जुनने गणपती बाप्पाला थाटात घरात आणून अगदी दणक्यात बाप्पाचं स्वागत केलं आहे.अर्जुन आणि अपर्णासह सर्व कुटुंबीयांनी बाप्पाची आरती सुध्धा केली. सरकारसह सर्व कुटुंब अगदी आनंदात असताना आता घरात बाप्पांमुळे सुखद वातावरण निर्माण झालेलं बघायला मिळतंय. अश्यातच आता पुढे काय काय होणार ह्या कडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.आता बाप्पाचे आशीर्वाद कदम कुटुंबींयांवर असताना निर्विघ्नपणे सर्व पार पडते की नाही हे लवकरच प्रेक्षकांना समजेल.

Appi Amchi Collector Ganesh Chaturthi 2024 Credit :- Youtube

२. तू चाल पुढं मालिकेत गणेशाचे थाटात आगमन : Ganesh Chaturthi 2024

“गणपती बाप्पा मोरया” या घोषणेच्या जल्लोषात ‘तु चाल पुढं’ मालिकेच्या सेटवर गणपती बाप्पांचं विराजमान झालं. ‘तु चाल पुढं’ मालिकेत सुरू असलेल्या मसाल्यात आता वेगळाच तडका आलेला आहे. मालिकेत श्रेयश व अश्विनीसोबत बाप्पाचे देखील आगमन झाले. आपल्या घरातील गणपती प्रमाणेच सेटवर देखील लाडक्या गणपतीची मखर सजवली आहे. मालिकेतील बच्चा कंपनी सुद्धा बाप्पामुळे आनंदात आहेत. बाप्पाचे आगमन होताच श्रेयसच्या व्यवहाराची नवी सुरुवात होऊन बाप्पाने एक प्रकारे आशीर्वाद दिला आहे. आता ही सुखाची नवी सुरुवात पुढे कसे वळण घेते याकडे प्रेक्षक वर्ग डोळे लावून बसला आहे.या आनंदात आता मिठाचा खडा तर पडणार का ? श्रेयस च्या व्यवहाराची सुरुवात योग्य होणार ना ? ह्या सारख्या प्रश्नांची उत्तर आता आपल्याला पुढील भागातच समजतीलच.

Navra maza navsacha 2 Teaser आता कोणता नवस फेडायला गणपतीपुळ्याला जाणार ? चाहत्यांच्या प्रतिक्षेत वाढ !

Tu Chal Pudha Ganesh Chaturthi 2024 Credit :- Youtube

३. सारं काही तिच्यासाठी मालिकेत विघ्नहर्ता ची स्थापना: Ganesh Chaturthi 2024

झी मराठी वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत आता गणेशाचे आगमन झाले आहे.अगदी पारंपारिक पद्धतीने गणेशाची म्हणजेच विघ्नहर्ता ची स्थापना मालिकेतील सेटवर झाली आहे. प्रत्येक वस्तूमध्ये देव असतो या प्रमाणे प्रत्येक माणसात देव दाखवणाऱ्या ह्या मालिकेत आता गणेशाचे आगमन झाल्यामुळे सेटवर अगदी प्रसन्न वातावरण झालेय. अगदी पारंपारिक पद्धतीने हाताने मातीचा गणपती घडवून प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली.सर्वांनी मिळून अगदी मातीचा गणपती घडवण्या पासून सजावटी पर्यंत एकत्र केले त्यामुळे बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता सर्व कलाकारांमध्ये होती हे दिसले. ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतील हा विघ्नहर्ता आता सर्व विघ्न दूर करतो की नाही याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

Sara kahi tichyasathi Ganesh Chaturthi 2024 Credit :- Youtube
४. ए.जे साकारणार का बाप्पांची मूर्ती ‘नवरी मिळे हिटलरला’ : Ganesh Chaturthi 2024

झी मराठीवरील आणखी एक सुप्रसिद्ध मालिका ‘नवरी मिळे हिटरला’ मालिकेत गणपती बाप्पांच्या आगमनाची लगबग पाहायला मिळतेय त्यात लीलाने अट्टाहास धरलाय कि बाप्पांची मूर्ती ए. जे म्हणजेच अभिराम साकारणार आहेत. नुकत्याच गणपती बाप्पा विशेष भागाचं प्रोमो झी मराठीने सोशल मीडियावर लाँच केला त्यात ए. जे आणि लीलामधला रुसवा फुगवा सपशेल दिसतोय. गणपती बाप्पांची मूर्ती बुक करूनसुद्धा काय ए.जे घरातल्या बाप्पांची मूर्ती घडवायला लीला ला मदत करेल का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटतं ?

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)

झी मराठी वाहिनीवरील या सर्व मालिका आता गणेश उत्सवाच्या तयारीत आहेत.ही गणेश चतुर्थी मालकांना कस वळण देते हे लवकरच आपल्याला समजेल. तुमच्या प्रत्रिक्रिया आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.