Gharat ganpati movie review :- ‘घरात गणपती’ म्हणजे प्रत्येक घराघरातील गोष्ट !

Gharat ganpati movie review :-

२६ जुलैला प्रदर्शित झालेल्या घरत गणपती या चित्रपटाने सर्वांचीच मन जिंकली आहेत.चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हांच खरं तर सर्वांचे लक्ष या चित्रपटाने वेधून घेतलं होतं. तसं तर आज पर्यंत मराठी चित्रपटांमध्ये  कुटुंबातल्या लहान लहान गोष्टी जिव्हाळा,प्रेम,नातीगोती, आपुलकी यांसारख्या विषयांना रुपेरी पडद्यावर खूप वेळा दाखवलंय पण या चित्रपटात कुटुंबाचा विषय थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याबद्दलचं आपण आज जाणून घेणार आहोत. दरवर्षी गणेशोत्सवामध्ये अगदी आनंदाने घरी येणाऱ्या गपणती बाप्पांमुळे घराघरात काय काय गोष्टी घडतात ते अगदी सहजपणे या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केलाय.

Gharat ganpati movie review :- घरात गणपती चित्रपटाबद्दल थोडी माहिती घेऊ

चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी केलं असून चित्रपटात निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव,संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम या कलाकारांचा अगदी जिवंत वाटणारा आणि जिव्हाळ्याचा अभिनय या आपल्याला पाहायला मिळतो,त्यात एक विशेष बाब अगदी आवर्जून सांगावी वाटते ती म्हणजे निकिता दत्त ही हिंदीमधली कलाकार असून पण अतिशय सुंदर अभिनय तिने या चित्रपटात केलाय. घरात गणपती चित्रपटासाठी तिने मराठीचे विशेष क्लास लावले होते अस एका वृत्तातून समजतय.

या चित्रपटात साजेशी चार गाणी आहेत पण ‘माझा कोकण भारी’ आणि ‘नवसाची गौराई माझी’ या गाण्यांना सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळतोय. श्रद्धा दळवी, समीर सामंत,अलोक सुतार यांनी लिहिलेल्या गीतांना जावेद अली, विशाल ददलानी, अभय जोधपूरकर, आणि ‘द कोकण कलेक्टिव्ह’ गर्ल्स’ या म्युझिक बँडमधली सायली खरे यांनी स्वरबद्ध केली आहे.

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.) Gharat Ganpati Movie Review

saddened Actor Vijay Kadam passes away at 67 :- मराठी चित्रपटसृष्ठीला बसला मोठा धक्का !

Gharat ganpati movie review :- एक कुटुंबवत्सल चित्रपट

मंडळी आता कोकणवासीय आणि कोकणातील गणेशोत्सव यांचं एक वेगळचं नातं आहे, कोकणातल्या याच गणेशोत्सवाची प्रत्येकाच्या घराघरातली आणि मनामनातली  गोष्ट सहजपणे मांडणारा म्हणजे घरात गणपती चित्रपट. हा चित्रपट बघताना तुम्हाला तुमच्या कुटुंबातल्या अंतरमनात डोकवायला भाग पाडले हे नक्की, कोकणात अगदी आनंदात,उत्साहात, जल्लोषात साजरा होणारा आपल्या लाडक्या बाप्पाचा सण आपण साजरा करायला आनंदाने एकत्र तर जमतो पण त्यानंतर होणाऱ्या कुटुंबातील छोटी छोटी कुजबुज वादाचं कारण कसं बनतं हे अगदी स्पष्टपणे चित्रपटामध्ये पाहायला मिळतं.

कोकणातील सात दिवसाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरत कुटुंबाची मजेशीर गोष्ट तर आपण ‘घरत गणपती’ या चित्रपटातून पाहुच पण त्याच बरोबर  त्यातून नात्यांची गंमत कशी उलगडते ते देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल.घरत गणपती चित्रपट अगदी योग्य वेळेवर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय त्यामुळे हा कुटूंबाने एकत्र मिळून येत्या गणेश चतुर्थी आधी नक्की पहावा हा चित्रपटामुळे अनेकांचे गणपती यंदा आनंदात ,उत्साहात आणि महत्वाचं म्हणजे समाधानात साजरे होतील असं वाटतयं….

Gharat ganpati movie review
Gharat ganpati movie review Credit :- Google

कोकणी सौंदर्य आणि कोकणातला गणेशोत्सवाबद्दल अनेकांनी ऐकलं असेल पण या चित्रपटात ते नक्की तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे त्यात गौरी-गणपती म्हणजे कोकणातील सर्वात मोठा सण आहे आणि कोकणवासीयांच्या याच सणाचा प्रत्यक्ष अनुभव या चित्रपटात तुम्ही अनुभवाल. आता कुटुंब म्हटलं की नातीगोती आणि त्या नात्यांमध्ये असलेली आपुलकी,जिव्हाळा येतोच पण त्यासोबत होणारी लहान मोठी भांडण सुद्धा येतात पण ते होऊन पण कुटुंब कशी एकत्र असतात,एकमेकांना कसं प्रेम देतात हे या चित्रपटात नक्की पाहायला मिळतं.

घरत गणपती चित्रपट पाहताना आपण तो जगायला लागतो. आणि समोर पडद्यावर आपलचं कुटुंब असल्याचा भास होतो. कारण हा चित्रपट प्रत्येकाच्याच मनाला भावणारा आहे. त्यामुळे यावर्षी कदाचित हा चित्रपट बरीच कुटुंब लांब होण्यापासून थांबवेल आणि गौरी-गणपतीचा सण पुर्वी सारखाच एकत्र कुटुंब मिळून आनंदाने साजरे करतील. हा चित्रपट हसवतो आणि अलगद डोळ्यांत पाणी देखील आणतो त्यामुळे सर्वांनी एकदा नक्की पहा ‘घरत गणपती’ प्रत्येकाच्याच घरातल्या गणपती ची गोष्ट. !

२५ वर्षानंतर चित्रपटात एकत्र येतेय ही सुपरहीट जोडी :-

मंडळी अभिनेता अजिंक्य देव आणि अश्विनी भावे या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर एकेकाळी अधिराज्य गाजवलय आणि ही जोडी पुन्हा एकदा २५ वर्षांनी ‘घरत गणपती’ चित्रपटामध्ये एकत्र पाहायला मिळणार आहे. या आधी ‘शाब्बास सूनबाई’,‘मायेची सावली’,‘चल गंमत करू’, ‘सरकारनामा’ या चित्रपटांद्वारे या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.आणि त्यानंतर २५ वर्षांनी  या जोडीला रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना पाहताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतोय.

Gharat Ganpati Movie Review
Gharat Ganpati Movie Review Credit :- Google

तुम्ही घरात गणपती चित्रपट कुटुंबासोबत पाहिलात का ?

घरात गणपती चित्रपट पाहिल्यानंतर आम्हाला तुमच्या प्रत्रिक्रिया कळवायला विसरू नका आणि चित्रपटसृष्टीच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.