Mayuri deshmukh says i don’t like these things in ganeshotsav :
घरोघरी पाहिली जाणारी सर्वांची लोकप्रिय मालिका म्हणजेच “मन धागा धागा जोडते नवा”. या मालिकेतील अभिनेत्री मयुरी देशमुख हिने गणेशोत्सवाबाबत आपली मते सोशल मीडिया वरती मांडलेली दिसून येतात. नुकतेच “मन धागा धागा जोडते नवा” या मालिकेमध्ये मयुरी देशमुख या अभिनेत्री ची एन्ट्री झालेली आहे. या मालिकेत प्रवेश करून तिने या मालिकेला वेगळेच वळण दिले आहे. ह्या अभिनेत्रीने एका सोशल मीडिया वाहिनीवर गणेशोत्सवाबाबत न पटलेल्या काही गोष्टी आपल्या मुलाखती द्वारा प्रेक्षकांसमोर मांडल्या. गणेशोत्सव म्हटलं तर साजेशी गाणी लावली पाहिजेत असं म्हणत वेड्यावाकड्या गाण्यावर नाचणाऱ्या प्रेक्षकांना तिने विरोध केला. गणेशोत्सवा बाबत आपली काही परखड मत मांडत गणेशोत्सव कसा साजरा केला पाहिजे याबाबत तिने संवाद साधला. तर जाणून घेऊया नक्की मयुरी देशमुख काय बोलली ते.
I don’t like these things in ganeshotsav का लावतात मोठ्याने गाणी ?असं म्हणाली मयुरी
नुकताच पार पडलेला आणि सर्वांच्या आवडीचा असा लाडका सण म्हणजे गणेशोत्सव. या गणेशोत्सवामध्ये मला काही गोष्टी अजिबात पडल्या नाही असं म्हणत काही गोष्टींना मयुरी देशमुख यांनी विरोध असल्याचे दर्शवलं. गणेशाची आराधना करणारा हा सण आहे तर तो आनंदाने साजराही केलाच पाहिजे आणि मलाही तो साजरा करायला आवडतो पण त्याच्याही काही मर्यादा आहे असं मयुरीने आपल्या भाषेत प्रेक्षकांना सांगितलं. नुकताच तारांगण या यूट्यूब चैनल ची संवाद साधताना मयुरी म्हणाली गणपती उत्सव म्हटला तर एन्जॉयमेंट ही झालीच पाहिजे आणि ती मलाही करायला आवडते पण मोठ्याने गाणी लावून नाचणं हे काही योग्य नाही.
त्याची काही कारणे आहेत ती मांडत असताना मयुरी म्हणाली माझ्याही घरी माझी आजी माझी आई बाबा आहेत त्यांच्यावरून मी हे पाहिलं की मोठ्या माणसांना मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्यांचा त्रास होतो. आपल्या आजूबाजूला लहान मुले असतात त्यांनाही या मोठ्या गाण्यांचा त्रास होतो त्यामुळे गणपती उत्सवामध्ये हळू आवाजात गाणी लावून त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे आणि गणेशोत्सव म्हटलं तर गणेशाचीच गाणी लावली पाहिजेत.
इतर समारंभात अथवा लग्न समारंभामध्ये इतर गाणी लावून नाचण्यात माझा काही विरोध नाही पण आपण कोणता सण साजरा करत आहोत याचं भान ठेवून आपण गाणी हळू आवाजात लावली पाहिजेत इतकच माझं मत आहे असं म्हणत मयुरी देशमुख हिने गणेशोत्सवाच्या नावाखाली सध्या चालू असलेल्या शो बाजीवर आपलं परखडपणे मत मांडलं. आनंद घेण्यात माझा काही विरोध नाही पण आपली आनंद साजरा करण्याची जी काही पद्धत आहे ती कुठेतरी चुकत आहे आणि ती आपण बदलायला हवी असं मयुरीच मत आहे. आता तिच्या या मताला प्रेक्षक काय उत्तर देतात ही गोष्ट पाहण्यासारखी आहे.
I don’t like these things in ganeshotsav :- मयुरी देशमुख यांची मुलाखत बघा
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.) I don’t like these things in ganeshotsav
I don’t like these things in ganeshotsav :- एका नव्या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार मयुरी देशमुख.
सर्वांची लाडकी अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा कामाबद्दल बोलायचं झालं तर खुलता कळी खुलेना या सर्वांच्या आवडीच्या मालिके नंतर मयुरी आपल्याला काही हिंदी चित्रपटांमध्ये दिसली. काहीच महिन्यापूर्वी लग्न कल्लोळ या चित्रपटातून ती आपल्या सर्वांच्या भेटीला आली. नुकतीच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत तिची इंट्री झालेली आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत प्रवेश घेऊन तिने या मालिकेला एक वेगळेच वळण निर्माण करून दिले आहे.
मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये मयुरी देशमुख यांनी सुखदाची भूमिका साकारली ही भूमीका साकारून तिने घराघरांमध्ये प्रत्येकाची मन जिंकली आहेत.आता मन धागा धागा जोडते नवा या मालिके नंतर मयुरी देशमुख आपल्याला पुन्हा एकदा नव्याने वेगळ्या चित्रपटात पाहायला मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष वेधले असता एक नवी माहिती तिच्याकडून आपल्याला मिळालेली आहे. एक डाव भुताचा या दोन ऑक्टोबरला रिलीज होणाऱ्या चित्रपटात आपल्या मयुरी देशमुख एक उत्तम अशा भूमिकेत दिसून येणार आहे. आता चित्रपटामधील तिची भूमिका काय असणार नक्की काय असणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.) I don’t like these things in ganeshotsav
तुम्हाला मयुरी देशमुख यांनी गणेशोत्सवाबद्दल आपलं मत मांडलं त्याबद्दल काय वाटतं आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.
Table of Contents
अर्पिता पाटील या रुईया महाविद्यालयात बॅचलर इन मास मीडियामध्ये पहिल्या वर्गात शिकत असून त्या मनोरंजन आर्टिकल विषयावर लिहितात.