Kushal Badrike चे कोंकणातील निसर्गाचा आनंद घेतानाचे हे फोटो एकदा पहाच
झी मराठीवरील “चला हवा येऊ द्या” या लोकप्रिय कॉमेडी शोच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला आपल्या सगळ्यांचा लाडका विनोदी अभिनेता कुश्या म्हणजेच kushal Badrike नेहमची इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह असतो. त्याच्या कॉमेडी टाईमिंग आणि त्याच्या ऍक्टिंग चे चाहते अक्ख्या महाराष्ट्रात आपल्याला सापडतील. गेल्या दशकाभरापासून झी मराठीवरील लोकप्रिय शो चला हवा येऊ द्यामधून kushal badrike ने अक्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवले आणि काही वर्षातच लोकांनीही कुशलला आपलंसं केलं. त्याबरोबरच तो संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण आणि विजू माने दिग्दर्शित struggler Sala या Youtube चॅनेलवरून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता
हेपण वाचा :- ALYAD PALYAD चा ट्रेलर आला आणि काही मिनिटातच नेटकाऱ्यानी दिल्या अशा प्रतिक्रिया
पण गेल्या काही दिवसापुर्वी चला हवा येऊ द्या या लोकप्रिय शोने काही कारणांस्तव प्रेक्षकांची रजा घेतली आणि struggler Sala चा सीझनदेखील Youtube खूप दिवसापासून येत नव्हता. सगळ्याना वाटले kushal Badrike आता कॉमेडी करताना छोट्या पडद्यावर दिसणार नाही. तेवढ्यात मॅडनेस मचायेंगे इंडियाको हसायेंगे या सोनी टीव्हीवरील शोमध्ये kushal Badrike ला बघून त्याच्या चाहत्यांच्या जीवात जीव आला.
सध्या सोनी टीव्हीवरील मॅडनेस मचायेंगे शो लोकांच्या पसंतीला उतरताना दिसतोय कारण त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके तीन कलाकार kushal badrike, Gaurav More आणि hemangi kavi यांची पर्वणी आहे.
नुकतंच Kushal Badrike ने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचे बायकोसोबतचे कोंकणातील व्हॅकेशन चे फोटोस शेर केले आणि काही मिनिटातच नेटकऱ्यानी त्यावर लाईक्स आणि कंमेंट्सचा पाऊस पाडला.
होय तुम्ही बरोबर वाचलंतसध्या kushal badrike त्याच्या बायकोसोबत दोघांच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून कोंकणातील निसर्गाचा आस्वाद घेताना आपल्याला त्याच्या इंस्टाग्राम फोटोसमधून दिसत आहेत. तुम्हाला माहितेय का ? Kushal Badrike ची बायको म्हणजेच सुनैना बद्रिके या kushal Badrike यांच्यापेक्षाही खूप टॅलेंटेड आहेत . एवढचं नाही सुनैना बद्रिके या एक कथ्थक नृत्यांगना आहेत. चला हवा येऊ द्याच्या एका एपिसोड मध्ये त्यांची हजेरी आपण सर्वांनी पहिली होती.
तर तुम्ही पाहिलेत का Kushal Badrike चे फोटोस ? पाहिले असतील तर तुमच्या प्रत्रिक्रिया जरूर कळवा.