या दिग्गज अभिनेत्यानं साकारलंय Manoj Jarange यांचं पात्रं… हुबेहूब दिसतात Manoj jarange यांच्यासारखे !
महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी ज्यांनी अनेक आंदोलने केली आणि अक्ख्या मराठा बांधवांना आरक्षण मिळण्यासाठी ज्यांनी नेतृत्व केले त्या मनोज जरांगे पाटील यांना कोण ओळखत नाही, एका हाकेमध्ये अक्खा महाराष्ट्रातील मराठा बांधवाना एकत्र करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. बीडमधील मंटोरी गावात जन्मलेल्या आणि पुढे अक्ख्या महाराष्ट्राच्या मराठा बांधवांचे आरक्षणासाठी नेतृत्व करणाऱ्या Manoj Jarange Patil यांची प्रेरणादायी कथा लवकरच आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Manoj Jarange Patil यांच्या आयुष्यावर सिनेमा येणार आहे याची घोषणा काही वर्षांपूर्वीच झाली होती आणि आता या सिनेमाचा ट्रेलर लाँच झालाय. काही दिवसांपूर्वीच “संघर्षयोद्धा मनोज जरंगे पाटील ” या सिनेमाची चर्चा सुरु होती आणि त्यात आणखी एका सिनेमाची घोषणा करण्यात आली .
Manoj Jarange Patil नक्की कोण आहेत ?
गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी मराठा समाज एकत्र येऊन आंदोलन करणे गरजेचे आहे हे ज्यांनी ओळखले त्यात सगळ्यात अग्रेसर Manoj Jarange patil होते आणि म्हणून मराठा समाजाला नेतृत्व म्हणून ते गेले 10 ते 15 वर्षांपासून काम करत आहेत . मूळच्या बीडमधल्या मातोरी गावात त्यांचा जन्म झाला पुढे ते जालन्यातल्या अंबाडमधील अंकुशनगरात स्थायिक झाले. घराची परिस्थिती हलाकीची होती तरीपण स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षणाच्या चळवळीला बळ दिलं आणि मराठा समाजाची ताकद अक्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिली.
KUSHAL BADRIKE चे हे जबरदस्त फोटोस तुम्ही पहिले का ? पाहिले नसतील तर हे वाचा
मराठा समाजातल्या मुलांना सरकारने न्याय द्यावा त्यांच्या मागणीचा पुरावा करावा फक्त एवढीच त्यांची सरकारकडे मागणी होती आणी त्यांची राष्ट्रीय पातळीवर दाखल देखील घेतली गेली
Manoj Jarange Patil यांच्या आयुष्यावर आधारित ” आम्ही जरांगे ” हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला रुपेरी पडद्यावर येणार आहे आणि सिनेमाचं विशेष म्हणजे बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे दिसणार आहेत त्यांच्या लोकसह पोस्टर प्रदर्शित करण्यात आला असून आता ट्रेलरसुद्धा लाँच करण्यात आला आहे .
जाणून घ्या सिनेमाची स्टारकास्ट :- मुख्य भूमिका ( मकरंद देशपांडे ) , दिग्दर्शक ( योगेश भोसले ), लेखक ( सुरेश पंडित )
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये विशेष काय ?
आम्ही जरांगे हा सिनेमा येत्या १४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा बांधवांचे संघर्ष आणि त्यांची भावनिक बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे . या सिनेमाची निर्मिती नारायण प्रॉडकशन करत असून योगेश पांडुरंग भोसले यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
सिनेमामध्ये काय चर्चेत आहे ?
जर तुम्ही सिनेमाचा ट्रेलर पहिला तर पाहताक्षणी तुम्हाला जरांगे पाटील यांची भूमिका नक्की कोणी केली असेल याबद्दल थोडं विचार करावा लागला असेल कारण सिनेमामध्ये जरांगे पाटीलांचा लुक सध्या चर्चेचा विषय बनला आहे . ट्रेलर पाहिल्यावर काळतच नाही कि मुख्य भूमिकेत मकरंद देशपांडे आहेत इतके ते हुबेहूब Manoj Jarange Patil यांच्या सारखे दिसतायत.
मग तुम्ही पाहिलात का “आम्ही जरांगे ” चा ट्रेलर ? पहिला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि चित्रपट चर्चला फॉलो करायला विसरू नका.