Mr. & Mrs. Mahi :- त्याला भारतासाठी क्रिकेट खेळायचं होतं पण ते स्वप्नचं राहिलं
बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून एकापेक्षा एक असे जबरदस्त सिनेमा आपल्याला बघायला मिळतायत. मग तो Pathaan सिनेमा असो किंवा Shaitaan , The Kerala story सिनेमा असो किंवा Article 370 एकापेक्षा एक सिनेमे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करून गेले आणि त्यात भरीसभर म्हणजे 31 मे ला प्रदर्शित झालेला Mr. & Mrs. Mahi चित्रपट. अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टाररर Mr. & Mrs. Mahi चित्रपट लोकांच्या पसंतीत उतरत आहे. सिनेमा लव्हर्स डे च निमित्त साधून रिलीस करण्यात आलेला Mr. & Mrs. Mahi ला फर्स्ट डे फर्स्ट शो पासून लोकं गर्दी करतायत.
बॉलीवूडमधला राजकुमार म्हणजेच राजकुमार राव नेहमीच त्याच्या फॅन्ससाठी वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे घेऊन येत असतो. अभिनयाची सहजशीलता आणि योग्य ठिकाणी कथेनुसार पाहिजे तसे एक्स्प्रेशन देण्यात अभिनेता राजकुमार रावचा हात बॉलीवूडमध्ये कोणीच पकडू शकत नाही. त्यात भर पडली ती जान्हवी कपूरच्या सुंदर रूपाने राजकुमार राव आणि जान्हवी कपूर ची रोमँटिक केमिस्टरी तुम्हाला या मूवीमध्ये बघायला मिळणार आहे. नुकताच राजकुमार रावचा श्रीकांत मूवी सिल्वर स्क्रीनवर ब्लॉकबस्टर ठरत असतानाच त्याच्या अजून एका मूवीमुळे त्याचे चाहते खूपच खुश आहेत आणि ते का होणार नाहीत कारण नेहमीप्रमाणे आताही हा सिनेमा तो ब्लॉकबस्टर ठरेल यात काही वादच नाही.
चला तर जाणून घेऊया Mr. & Mrs. Mahi ची स्टारकास्ट :- राजकुमार राव , जान्हवी कपूर , झरीना वहाब , अभिषेक बॅनर्जी , राजेश शर्मा , कुमुद मिश्रा , पूर्णेन्दू भट्टाचार्य अशी जबरदस्त स्टारकास्ट चित्रपटात आहे .
Mr. & Mrs. Mahi चा ट्रेलर :-
Mr. & Mrs. Mahi ची नेमकी स्टोरी आहे तरी काय ?
Mr. & Mrs. Mahi हा एक रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा मूवी असून त्याचे दिग्दर्शन शरण शर्मा तर निर्मिती झी स्टुडिओस आणि धर्मा प्रोडकशन यांनी केले आहे. मित्रानो एके दिवशी मीपण क्रिकेटर होणार आणि आपल्या देशासाठी खेळणार हे स्वप्न तर आपण सगळ्यांनी पहिलच असेल आणि तसंच काही स्वप्नं या चित्रपटात राजकुमार राव उर्फ महेंद्रने पहिला होतं पण एका सिलेकशन मॅचमध्ये झालेल्या गडबडीमुळे त्यांच कोचसोबत भांडण होत आणि त्याच स्वप्न स्वप्नंच राहतं. नंतर त्याचं लग्नं महिमा ( जान्हवी कपूर ) नावाच्या पेश्याने डॉक्टर असलेल्या मुलीसोबत होतं. कालांतराने त्याला समजतं कि दोघांची स्वप्नं मात्र एकचं आहेत आणि ते स्वप्नं म्हणजे क्रिकेट.
या एकाच क्रिकेट प्रेमामुळे महेंद्र त्याच्या बायकोला म्हणजेच महिमाला क्रिकेटचे धडे द्यायला सुरवात करतो, जेणेकरून जर महिमा सिलेकशन मॅचमध्ये चांगली खेळली आणि तिचे इंडिया टीमसाठी सिलेकशन झाले तर तिच्यासोबतच महेंद्रचेपण नाव मोठं होईल आणि त्याचपण स्वप्न पूर्ण होईल.
पण जसं टीपीकल बॉलीवूड मसाला मूवीमध्ये दाखवतात तसाच ट्वीस्ट यातपण आहे जेव्हा माहीमला समजत कि महेंद्र स्वतःच्या स्वप्नांसाठी माझा वापर करून घेतोय तेव्हा त्यांच्यामध्ये भांडण, रुसवे सुरु होतात ते तुम्हाला मूवी च्या क्लायमॅक्समध्ये बघायला मिळेल. ओव्हरल म्हणायचं झालं तर Mr. & Mrs. Mahi एक फॅमिली एंटरटेनमेंट मूवी आहे जो तुम्ही मस्त मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत बघू शकता .
जाणून घ्या राजकुमार रावचे आगामी चित्रपट
राजकुमार रावचे चित्रपट :- स्त्री 2 , विकी विद्या का वो वॉल विडिओ ,
जाणून घ्या जान्हवी कपूरचे आगामी चित्रपट
जान्हवी कपूरचे चित्रपट :- सनी संस्कारी कि तुलसी कुमारी , तक्त ,तेलुगू , उलझ .
सिनेमाचं संगीत :-
या सिनेमाला संगीत दिलंय आदेश श्रीवास्तव , तनिष्क बागची , विशाल मिश्रा आणि जानी यांनी. या सिनेमांमधलं ” देखा तेनुं ” हे गाणं शाहरुख खान च्या सुपररहित सिनेमा ” कभी खुशी कभी गम ” चं रेमॅक असून त्याला मोहम्मद फैझ यांनी गायले आहे सध्या हे गाणं प्रचंड वायरल होत असून युट्युबवर त्याला 3 मिलिअन पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.
एकंदरीत सिनेमा जवळपास 2 तास 19 मिनिटाचा आहे ज्यामध्ये तुम्हाला क्रिकेटप्रेम , फॅमिली एंटरटेनमेंट आणि सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये मसाला एंटरटेनमेंट बघायला मिळेल . हा एक वन टाइम फॅमिली एंटरटेनमेंट मूवी असून मूवी क्रिटिकसने या मूवीला 5 पैकी 3. 8 रेटिंग दिली आहे .
तर मग तुम्हाला Mr. & Mrs. Mahi सिनेमा कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा