Munjya box office collection: अवघ्या 3 दिवसात कोटींमध्ये कमाई

Munjya box office collection: ‘Mr and Mrs Mahi’ लापण टाकले मागे

Munjya box office collection

अवघ्या 3 दिवसात कोटींमध्ये कमाई लापण टाकले मागे अभिनेत्री शर्वरी वाघ, अभय वर्मा, आणि मोना सिंग यांचा हॉरर कॉमेडी “Munjya” गेल्या 7 जूनला थेटरमध्ये रिलीज झाला. रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना या चित्रपटाने आकर्षित केलं आहे. शुक्रवार आणि शनिवारी बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी केल्यानंतर, रविवार, 9 जून रोजी चित्रपट स्थिर राहिला.

बॉलीवूड इंडस्ट्री ट्रॅकर Sacnilk च्या मते “Munjya” ने शुक्रवारी 4 कोटींची कमाई केली, त्यानंतर शनिवारी 7.25 कोटींची कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी (रविवार, 9 जून) 7.75 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन नोंदवले आणि तीन दिवसांची एकूण कमाई 19 कोटी रुपये झाली. रविवारी, संध्याकाळच्या कार्यक्रमांना सर्वाधिक प्रेक्षकसंख्येसह, हिंदी भाषिक पट्ट्यात एकूण 36.64 टक्के वाढ दिसली गेली. एवढाच नाही तर राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या ‘Mr and Mrs Mahi’ या स्पोर्ट्सवर आधारित चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये 16.85 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि तेच “Munjya” ने रिलीजच्या तिसऱ्या दिवसांतच 19 कोटींची कमाई करून ‘Mr and Mrs Mahi’ ला मागे पडलं. ‘Munjya’ box office collection

Munjya box office collection
Munjya box office collection

Munjya म्हणजे नक्की कोण ?

लोककथेनुसार मुंज्या हा एक असा प्राणी मानला जातो जो लहान वयात मरण पावल्यामुळे राक्षसी आणि लहान मुलांसारखा असतो. मुंज्या लोकांना त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्रास देतो, बहुतेकदा लग्न ठरवतो. मुंज्या सहसा द्वेषपूर्ण नसतात पण जर एखादा माणूस त्याच्या मुंजाच्या समारंभानंतर लग्न न करता परंतु त्याच्या सोड मुंजाच्या आधी मरण पावला, तर त्याचे रूपांतर मुंज्यात होते – पिंपळाच्या झाडांमध्ये किंवा विहिरीजवळ राहणारा आत्मा अशीदेखील त्याची ओळख आहे.

MUNJYA MOVIE REVIEW :- मुंज्या मूवी रेव्हीव :- मुंज्या खरंच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय का मुव्ही पुरा गंडलाय ?

Munjya चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्माते कोण आहेत :-

Munjya मूवी दिग्दर्शित केलीय आदित्य सारपोतदार यांनी हे तेच आदित्य सारपोतदार आहेत ज्यांनी याआधी फास्टर फेणे , नारबाची वाडी , कलासमेट्स या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाची निर्मिती केलीय दिनेश विजन आणि अमर कौशिक यांनी म्याडोक फिल्म प्रोडक्शन च्या अंतर्गत. या चित्रपटाची सर्व शूटिंग कोंकणात झालेली असून यामध्ये काही सीनमध्ये व्ही. एफ. एक्स चा वापर केला आहे.

Munjya box office collection day 3: Sharvari Wagh, Mona Singh’s film registers 95 per cent jump despite India vs Pakistan T20 World Cup 2024 match

Munjya चित्रपटाला प्रेक्षकांची एवढी पसंती का ?


Munjya चित्रपटाचे लेखन नीरेश भट्ट आणि योगेश चांदेकर या जोडगोळीनें केले आहे. हा चित्रपट मराठी लोककथेचा एक भाग आहे ज्यामध्ये उत्तम पद्धतीने CGI आणि VFX चा वापर करून एक हॉरर मूवी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जो लोकांनी बर्यापैकी स्वीकारलाय. बराचश्या लोकांना अशा लोककथेमध्ये रस असतो आणि वरून जर ती लोककथा भुतांवर आधारित असेल तर कोणाला आवडणार नाही ? त्यामुळे माझ्यासारख्या बराचश्या लोकांना हा चित्रपट एक आकर्षणाचा भाग बनला आहे आणि तसही चित्रपटाची स्टोरी इतकी सोपी आहे कि चित्रपट समजायला काही रॉकेट सायन्स लागत नाही. चित्रपटाच्या सुरवातीपासून तुम्ही त्याचा भाग व्हायला लागतात. CGI निर्मित Munjya हा या चित्रपटाचा मेन हिरो किंवा पात्रं असल्यामुळे ते चित्रपटाच्या आकर्षणाचं कारण बनतय.

जर चित्रपटाच्या एकंदरीत कथेबद्दल बोलायचं झाल तर या आधी खूप चित्रपट अश्या ओसाड कोंकणातल्या लोकेशनवर बनलेत पण एका साध्या सरळ कथेला डायरेक्टर आदित्य सारपोतदार यांनी चांगल्या पद्धतीने मांडलेत. कथेनुसार योग्य जागेवर कॉमेडी आणि हॉरर यांची बरोबर सांगड घातली गेलीय ज्यामुळे चित्रपट बघताना तुम्ही कंटाळून जात नाही. चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा पहिला तेव्हा मला वाटलं चित्रपटामध्ये हॉरर सीन जास्त असतील पण जर तुम्ही अशी अपेक्षा ठेऊन जात असाल तर तुम्ही निराश व्हाल कारण चित्रपटात थोडे हॉरर सीन कमी आहेत. चित्रपटाच्या अखेरीस काही सीन उगाचच दाखवले गेलेत असा तुम्हाला दिसेल ते नाही दाखवले असते तर चित्रपट अजून चांगला झाला असता. Munjya box office collection

'Munjya' box office collection
‘Munjya’ box office collection

तुम्ही मुंज्या चित्रपट का बघावा ?

एकंदरीत, मुंज्या चित्रपट नीटनेटका, फॅमिलीसोबत नक्की बघावा असा वन टाइम हॉरर कॉमेडी चित्रपट असून त्यात उत्कृष्ट कामगिरी CGI आणि VFX चा वापर केला आहे. मॅडॉक फिल्म्स स्त्री, भेडिया आणि आता मुंज्यासारख्या हॉरर जॉनरच्या चाहत्यांना जबरदस्त कथांनी लुटत आहेत. गेल्या काही वर्षात हॉरर कॉमेडी जॉनरच्या चित्रपटांची संख्या वाढत चाललीय आणि मला कधी कधी भीती वाटते कि जर अश्या हॉरर कॉमेडी जॉनरचे चित्रपट यायचे बंद झाले तर आमच्यासारख्या हॉरर कॉमेडी आवडणाऱ्यांनी करावे तरी काय ?

तुम्ही Munjya चित्रपट पाहिलात का ? पहिला असेल तर कंमेंट करून तुमच्या प्रत्रिक्रिया आम्हाला कळवा. Munjya box office collection

Leave a Comment