Munjya Box Office Collection Day 13: १३ व्या दिवशीपण “मुंज्या” चा बॉक्स ऑफिसवर धमाका कायम

गेल्या ७ जूनला “मुंज्या” हा हॉरर कॉमेडी चित्रपट सिनेमागृहात रिलीझ झालेला. चित्रपटाला ओपनिंग दमदार मिळाली होती आणि चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात त्याचा पूर्ण बजेट वसूल केल.

Munjya Box Office Collection Day 13
Munjya Box Office Collection Day 13

Munjya Box Office Collection Day 13 :-

अवघ्या ३० कोटींमध्ये बनलेला चित्रपट जेव्हा त्याच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाचा बजेट वसूल करतो म्हणजे “मूवी मे दम हे बॉस” म्हणायला हरकत नाही. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित “मुंज्या” चित्रपटात नाही कोणी तगडी स्टारकास्ट ना आहे हाय क्वालिटी VFX चा वापर पण तरीही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय यात काही शंका नाही. रिलीजच्या दुसऱ्या मंगळवारी चित्रपटाने चांगली कमाई केली होती आणि वीकेंडचं कलेक्शनपण दमदार झालं होतं.

हेपण वाचा :- ALYAD PALYAD MOVIE BOX OFFICE COLLECTION :- अल्याड पल्याड चित्रपट हिट कि फ्लॉप ? जाणून घ्या नक्की काय ते..

Munjya Box Office Collection Day 13 :- “मुंज्या”ने तेराव्या दिवशी नेमकी किती कमाई केली चला बघूया

“मुंज्या” रिलीजपासून बॉक्स ऑफिसवर कमाल कमाई करतोय जसं मी आधी म्हटलं कि ना कोणी तगडी स्टारकास्ट ना अप्रतिम VFX पण तरीही “मुंज्या” प्रेक्षकांना बॉक्स ऑफिसवर खेचण्यात यशस्वी झालाय. चित्रपटाचे कथानक, कलाकारांचे अभिनय, मोजक्या VFX इफेक्ट यामुळे प्रेक्षकवर्ग चित्रपटाला पसंत करतायत याचं पुरावा म्हणजे पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमावलेले ४ कोटी रुपये.

“मुंज्या” चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ७.२५ कोटींची कमाई केली, तिसऱ्या दिवशी ८ कोटी, चौथ्या दिवशी चित्रपटाने कमी म्हणजेच ४ कोटी रुपये कमावले त्यानंतर पाचव्या दिवशी तोआकडा ४.१५ कोटींवर पोचला. सहाव्या दिवशी ४ कोटी, सातव्या दिवशी ३.९ कोटींचा गल्ला जमावाला आणि ओव्हरऑल पहिल्या वीकचं टोटल कलेक्शन ३५.३ कोटींचं जमलं. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातपण प्रत्येक दिवशी कोटींच्या घरातंच कमाई केलीय.

Munjya Box office Collection Day 13
Munjya box office collection

आठव्या दिवसामध्ये ३.५ कोटी, नवव्या दिवशी चक्क ६.५ कोटी आणि दहाव्या दिवशी आतापर्यंत सगळ्यात जास्त ८.५ कोटींचा गल्ला जमवला. अकराव्या दिवशी ५.२५ कोटी, बाराव्या दिवशी तो आकडा ३.४ कोटी आणि तेराव्या दिवशी .२.९ कोटींपर्यंत पोहचून आतापर्यंत पूर्ण भारतामध्ये चित्रपटाने ६४.५४ कोटींची बंपर कमाई केली असून जागतिक पातळीवर हा आकडा ७५.४३ कोटींपर्यंत गेला आहे. चित्रपटाची एकंदरीत बॉक्स ऑफीसवरील कामगिरी बघून चित्रपट १५० कोटींचा आकडा पार करेल अशी अपेक्षा चित्रपटाचे निर्माते दीपेश विजन आणि अमर कौशिक यांनी वर्तवला आहे.

Munjya चित्रपटाला प्रेक्षकांची एवढी पसंती का ?

Munjya चित्रपटाचे लेखन नीरेश भट्ट आणि योगेश चांदेकर या जोडगोळीनें केले आहे. हा चित्रपट मराठी लोककथेचा एक भाग आहे ज्यामध्ये उत्तम पद्धतीने CGI आणि VFX चा वापर करून एक हॉरर कॉमेडी मूवी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जो लोकांनी बर्यापैकी स्वीकारलाय. बराचश्या लोकांना अशा लोककथेमध्ये रस असतो आणि वरून जर ती लोककथा भुतांवर आधारित असेल तर कोणाला आवडणार नाही ? त्यामुळे माझ्यासारख्या बराचश्या लोकांना हा चित्रपट एक आकर्षणाचा भाग बनला आहे आणि तसही चित्रपटाची स्टोरी इतकी सोपी आहे कि चित्रपट समजायला काही रॉकेट सायन्स लागत नाही. चित्रपटाच्या सुरवातीपासून तुम्ही त्याचा भाग व्हायला लागतात. CGI निर्मित Munjya हा या चित्रपटाचा मेन हिरो किंवा पात्रं असल्यामुळे ते चित्रपटाच्या आकर्षणाचं कारण बनतय.

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)

जर चित्रपटाच्या एकंदरीत कथेबद्दल बोलायचं झाल तर या आधी खूप चित्रपट अश्या ओसाड कोंकणातल्या लोकेशनवर बनलेत पण एका साध्या सरळ कथेला डायरेक्टर आदित्य सारपोतदार यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलंय. कथेनुसार योग्य जागेवर कॉमेडी आणि हॉरर यांची बरोबर सांगड घातली गेलीय ज्यामुळे चित्रपट बघताना तुम्ही कंटाळून जात नाही. चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा पहिला तेव्हा मला वाटलं चित्रपटामध्ये हॉरर सीन जास्त असतील पण जर तुम्ही अशी अपेक्षा ठेऊन जात असाल तर तुम्ही निराश व्हाल कारण चित्रपटात थोडे हॉरर सीन कमी आहेत. चित्रपटाच्या अखेरीस काही सीन उगाचच दाखवले गेलेत असं तुम्हाला दिसेल ते नाही दाखवले नसते तर चित्रपट अजून चांगला झाला असता.

Munjya box office collection day 13
Munjya box office collection day 13

Munjya box office collection Day 13 :- तुम्ही मुंज्या चित्रपट का बघावा ?

एकंदरीत, मुंज्या चित्रपट नीटनेटका, फॅमिलीसोबत नक्की बघावा असा वन टाइम हॉरर कॉमेडी चित्रपट असून त्यात उत्कृष्ट कामगिरी CGI आणि VFX चा वापर केला आहे. मॅडॉक फिल्म्स हे स्त्री, भेडिया आणि आता “मुंज्या”सारख्या हॉरर जॉनरच्या चाहत्यांना जबरदस्त कथांनी लुटत आहेत. गेल्या काही वर्षात हॉरर कॉमेडी जॉनरच्या चित्रपटांची संख्या वाढत चाललीय आणि मला कधी कधी भीती वाटते कि जर अश्या हॉरर कॉमेडी जॉनरचे चित्रपट यायचे बंद झाले तर आमच्यासारख्या हॉरर कॉमेडी आवडणाऱ्यांनी करावे तरी काय ?

१३ व्या दिवशीपण कोटींमध्ये कमाई :-


“मुंज्या” चित्रपटाच्या आधी थेटरमध्ये अनेक दिग्गज स्टारचे चित्रपट आले होते पण एक सधी स्टोरीलाईन आणि हॉरर कॉमेडी प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून घेऊन येईल आणि तो चित्रपट ७५ कोटींचा आकडा पार करेल याचा विचार कोणीच केला नसेल. आदित्य सरपोतदारांसारख्या मराठमोळ्या दिग्दर्शकासाठी हि गोष्ट खूप अभिमानास्पद आहे कि थोड्याच दिवसात त्यांचा चित्रपट आता १०० कोटींचा आकडा पार करेल.

जर तुम्हीसुध्दा “मुंज्या” चित्रपट बघितला असेल तर तुमच्या प्रत्रिक्रिया आम्हाला नक्की सांगा आणि चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.

Leave a Comment