Munjya Movie Review :- मुंज्या मूवी रेव्हीव :- मुंज्या खरंच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय का मुव्ही पुरा गंडलाय ?

Munjya Movie Review :- मुंज्या मूवी रेव्हीव


बॉलीवूडमध्ये हल्लीच्या दोन दशकभरात हॉर्रोर कॉमेडी हा जॉनर प्रचंड प्रसिद्ध होत चाललाय आणि त्याची सुरवात होते 2007 च्या अक्षय कुमार, विद्या बालन आणि शायनी अहुजा असे कलाकार असलेल्या “भूल भुलैया” चित्रपटाने. या चित्रपटातील ” मेरे ढोलना ” हे गाणं खूप फेमस झालं होतं आणि त्यापेक्षाही आवडली होती ती विद्या बालनची एक्टिंग. मोंजलिकाच्या पात्राने तिला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्या नंतर बॉलीवूडमध्ये झोम्बीवली, स्त्री,भूत पोलीस, भूल भुलैया 2, भेडिया असे बरेच हॉर्रोर कॉमेडी जॉनरचे चित्रपट येऊन गेले त्यातले काही चित्रपट हवा करून गेले काही असेच हवेत विरून गेले. तश्याच धाटणीतला एक चित्रपटाबद्दल आपण आज बोलणार आहोत त्याचं नाव आहे Munjya ( मुंज्या ).

Munjya Movie Review

Munjya चित्रपटाबद्दल :-

तुम्ही कधी लहान असताना तुमची आजी तुम्ही झोपत नसल्यावर कधी अशी बोललीय का ? ” झोप लवकर नाहीतर मुंज्या येईल ” होय ही कथा त्याच मुंज्याची आहे जो लहानपणी नाही तर आपण सगळे मोठे झाल्यावर आलाय तेपण थेटरमध्ये. एक मुलगा जेव्हा खूप वर्षांनी त्याच्या गावी जातो आणि गावी असताना त्याला एका वेगळ्या वाईट शक्तीची अनुभूती होते आणि त्याच वाईटआत्मापासून त्याला त्याच्या कुटुंबाचे रक्षण करायचे असते असं एकंदरीत चित्रपाची कथा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून तर चित्रपटाची कथा नवीन आहे अस तुम्हांला समजलं असेल कारण याआधी अश्या लोकंकथेवर आधारित चित्रपट बनला नाही.

TOP 10 RICHEST ACTORS IN INDIA 2023 :- भारतातील टॉप 10 श्रीमंत ऍक्टर्स 2023

Munjya म्हणजे नक्की कोण ?

लोककथेनुसार मुंज्या हा एक असा प्राणी मानला जातो जो लहान वयात मरण पावल्यामुळे राक्षसी आणि लहान मुलांसारखा असतो. मुंज्या लोकांना त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्रास देतो, बहुतेकदा लग्न ठरवतो. मुंज्या सहसा द्वेषपूर्ण नसतात पण जर एखादा माणूस त्याच्या मुंजाच्या समारंभानंतर लग्न न करता परंतु त्याच्या सोड मुंजाच्या आधी मरण पावला, तर त्याचे रूपांतर मुंज्यात होते – पिंपळाच्या झाडांमध्ये किंवा विहिरीजवळ राहणारा आत्मा अशीदेखील त्याची ओळख आहे.

Munjya मूवीचा ट्रेलर पाहा :-

Munjya Movie Review | Munjya Movie Trailer

Munjya Movie review ( मूवी रेव्हिव ) :-

चित्रपटाची कथा आहे 1952 च्या कोकणातील चिपळूणमधली राहणाऱ्या गोट्याची, ज्याला त्याच्या वयापेक्षा सात वर्षे मोठ्या मुलीशी ( मुंनीशी ) लग्न करायचं असतं. गोट्याचं मुनींबद्दलचं प्रेम एवढं वाढतं कि तो तिला मिळवण्यासाठी तंत्र विद्या आणि काळी जादू शिकतो. एके रात्री जंगलामध्ये गोट्या तिच्या छोट्या बहिणीचा बळी देण्यासाठी तिच्यावर तंत्र मंत्र करत असताना त्यात तो स्वतःच मरण पावतो. चित्रपटाचा नायक बिट्टू ( अभय वर्मा ) हा त्याच फॅमिली मधला असल्यामुळे मुंज्याच्या त्रासापासून त्याला आपल्या परिवाराला मुक्त करायचे असते आणि त्याच्याभोवतीच फिरणारी हि कथा आहे. आदित्य सरपोतदारांची हि हॉरर कॉमेडी मूवी डायरेक्ट मुद्यापासून सुरु होते ती म्हणजे गोट्याच्या कथेपासून.

मुंज्या फक्त भीतीदायक आणि धडकी भरवणारा नसून तो काही सीनमध्ये खेळकर आणि मजेशीरदेखील दाखवलाय. चित्रपटाची सगळी शूटिंग कोकणामध्ये झालेली असल्यामुळे तुम्हाला मुंज्या हा खूप जवळचा भासेल. हा चित्रपट एक एंटरटेनिंग आहेच त्याबरोबर प्रेम, जिव्हाळा, काळी विद्या, आणि सस्पेन्स या सगळ्या विषयावर लक्ष केंद्रित करायला लावतो. मुंज्याने बिट्टूच्या आयुष्यात प्रवेश केल्यावर त्याच्या आयुष्यात जशी उलथापालथ होते ते बघताना कधीकधी त्रास होईल. इंटरवल नंतर चित्रपटाची कथा आणि पात्रे सगळी एकमेकांशी जुळतात. आदित्यने हॉरर चित्रपटाला साजेश्या गोष्टी चित्रपटात केल्यात जसं की एक ओसाड जागा, मुंज्याला पकडायला एक म्हातारा माणूस, त्याला बळी म्हणून वापरण्यात येणारी बकरी अश्या छोट्या छोट्या गोष्टीं चित्रपटात बघायला मिळतील.

चित्रपटात अभय वर्मा उर्फ बिट्टू थोडासा भित्रा पण काही प्रसंगी तो धीट आहे जसा एका हॉरर मूवीमध्ये मेन हिरो असतो तसाच अभय वर्मा या चित्रपटात शोभून दिसतो आणि त्याला सूट होईल अशी साथ शर्वरी वाघाने दिलीय ती चित्रपटात बेलाची भूमिका करतेय. अभिनेत्री मोना सिंगला तुम्ही कोणतीही भूमिका द्या ती त्या भूमिकेमध्ये आपला जीव ओतून त्याला जिवंत करते आणि असाच काहीसा रोल तिने बिट्टूच्या आईचा केला आहे.

Munjya चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्माते कोण आहेत :-

Munjya मूवी दिग्दर्शित केलीय आदित्य सारपोतदार यांनी हे तेच आदित्य सारपोतदार आहेत ज्यांनी याआधी फास्टर फेणे , नारबाची वाडी , कलासमेट्स या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाची निर्मिती केलीय दिनेश विजन आणि अमर कौशिक यांनी म्याडोक फिल्म प्रोडक्शन च्या अंतर्गत. या चित्रपटाची सर्व शूटिंग कोंकणात झालेली असून यामध्ये काही सीनमध्ये व्ही. एफ. एक्स चा वापर केला आहे

Munjya Movie Review
Munjya Movie Review

Munjya Story :-

Munjya चित्रपटाचे स्टारकास्ट :-

या चित्रपटात शर्वरी वाघ,अभय वर्मा, मोना सिंग, सुहास जोशी, सत्यराज, रीमा चौधरी आणि अनय कामत यांसारखे अभिनेते आहेत. अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभय वर्मा हे या चित्रपटाचे लीड ऍक्टर्स आहेत.

तुम्ही मुंज्या चित्रपट का बघावा ?

एकंदरीत, मुंज्या चित्रपट नीटनेटका, फॅमिलीसोबत नक्की बघावा असा वन टाइम हॉरर कॉमेडी चित्रपट असून त्यात उत्कृष्ट कामगिरी CGI आणि VFX चा वापर केला आहे. मॅडॉक फिल्म्स स्त्री, भेडिया आणि आता मुंज्यासारख्या हॉरर जॉनरच्या चाहत्यांना जबरदस्त कथांनी लुटत आहेत. गेल्या काही वर्षात हॉरर कॉमेडी जॉनरच्या चित्रपटांची संख्या वाढत चाललीय आणि मला कधी कधी भीती वाटते कि जर अश्या हॉरर कॉमेडी जॉनरचे चित्रपट यायचे बंद झाले तर आमच्यासारख्या हॉरर कॉमेडी आवडणाऱ्यांनी करावे तरी काय ?

तुम्हाला हा चित्रपट कसा वाटलं मला कंमेंट करून नक्की सांगा आणि चित्रपटाच्या ताज्या अपडेट्स वाचण्यासाठी चित्रपट चर्चला फॉलोव करायला विसरू नका

Leave a Comment