Navra maza navsacha 2 Teaser आता कोणता नवस फेडायला गणपतीपुळ्याला जाणार ? चाहत्यांच्या प्रतिक्षेत वाढ !

आजपर्यंत अनेक मराठी चित्रपटांनी चाहत्यांच्या मनावर आपला ठसा उमटवलाय आणि प्रेक्षकांच्या मनावर आपलं अधिराज्य गाजवलंय. त्यापैकीच एक म्हणजे navra maza navsacha हा चित्रपट. या चित्रपटाने प्रेक्षकांना अगदी भुरळ पाडली होती आणि म्हणूनच आज इतक्या वर्षानंतर सुद्धा या  चित्रपटाचा चाहता वर्ग  तितक्याच आवडीने तो चित्रपट पाहतोय. चित्रपटातील कलाकार त्यांचा अभिनय आणि त्यासोबतच चित्रपटातील गाणी या सगळ्याच गोष्टी अप्रतिम आहेत त्यामुळेचं या चित्रपटाने दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. 

आनंदाची बाब म्हणजे सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ या तिघांची मुख्य भूमिका असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा तब्बल १९ वर्षानंतर दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच २ दिवसाआधी स्वप्नील जोशी यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा टिझर लाँच करून प्रेक्षकांना हि खुशखबरी दिलीय. त्यामुळे चाहत्यांच्या मनात चांगलीच उत्सुकता वाढलीय. खरं सांगायचं तर ‘नवरा माझा नवसाचा 2’ येतोय हे ऐकल्यावरचं अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. नवरा माझा नवसाचा मध्ये पाहायला मिळालेल्या  मुंबई ते गणपतीमुळेच्या एस टी प्रवासाने आपल्याला खळखळून हसवलंय त्यामुळे आता  २० सप्टेंबर २०२४ ला प्रदर्शित होणाऱ्या ‘नवरा माझा नवसाचा 2’  चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार या संदर्भातले अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)

नवरा माझा नवसाचा चित्रपटातील कलाकार मंडळींनी तर प्रत्येक चाहत्यांच्या मनात आपलं घर केलं होत सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर अशा एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांनीआपल्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ पडली.

चित्रपटातील पहिल्या भागात असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्या रीमा लागू, अभिनेते सतिश तारे, अभिनेते प्रदीप पटवर्धन आणि अभिनेते आनंद अभ्यंकर हि दिग्गज मंडळी सध्या आपल्यासोबत नाहीयत त्यामुळे नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात आपण या सर्वांना नक्कीचं मिस करू तर नवरा माझा नवसाचा 2 मध्ये काही नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळणार असं टीझरवरून समजतंय. त्यात अभिनेत्री हेमल इंगळे, निर्मिती सावंत, अभिनेता स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाने आणि गणेश पवार यांची वर्णी लागलीय.

Gharat ganpati movie review :- ‘घरात गणपती’ म्हणजे प्रत्येक घराघरातील गोष्ट !

Navra maza navsacha 2 Teaser
Navra maza navsacha 2 Teaser Credit :- Google

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती,  कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे तर संवाद संतोष पवार यांचे आहेत. नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मुंबई गणपतीपुळे पर्यंतचा प्रवास लालपरीचा नाही तर  कोकण रेल्वेने होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतय. त्यामुळे जसं पहिल्या भागात सचिन पिळगांवकर म्हणजेच वक्रतुंडला त्याचा नवस पूर्ण करण्यासाठी एस. टीच्या प्रवासात जसे अडथळे आले तसे या भागात काय होईल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

“नवरा माझा नवसाचा चित्रपटात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता “नवरा माझा नवसाचा 2″मध्ये रेल्वेच्या टीसी च्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत तसेच पहिल्या भागातले ८० कोटीचे हिरे आता ८०० कोटीचे झाले आहेत. नवरा माझा नवसाचा मध्ये मुंबई ते गणपतीमुळे असा नवस फेडण्यासाठी केलेला प्रवास दुसऱ्या भागात कोणता नवस फेडण्यासाठी असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेत. त्यामुळे हा मनोरंजक धमाकेदार प्रवास कधी अनुभवायला मिळणार याकडेच सगळ्यांचे डोळे आहेत.

आजपर्यंतच्या नवरा माझा नवसाचा चित्रपटाने आपल्याला खूपदा खळखळून हसायला लावलंय, खूपदा डोळ्यांत पाणी देखील आणलंय पण कायम आपल्या मनावर अधिराज्य गाजवलंय त्यामुळेच नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे….हेच त्या चित्रपटाचं श्रेय आहे.

तुम्ही नवरा माझा नवसाचा २ चित्रपटाचा टीझर पाहिलात का ? जर पहिला असेल तर तुमच्या प्रत्रिक्रिया आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.

Table of Contents