New Marathi serial Savalyachi janu savali : झी मराठी वाहिनीवर नवी मालिका येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला
झी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला नवनवीन मालिका घेऊन येत आहे. अनेक मालिकांच्या प्रोमो मधून झी मराठी वाहिनी प्रेक्षकांना मालिकेची ओळख करून देत असता नुकतेच झी मराठी वाहिनीवर “सावळ्याची जणू सावली ” या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवर टीआरपीच्या दृष्टिकोनाने मालिका मालिकांमध्ये स्पर्धा सुरू असलेल्या दिसून येतात. आता या स्पर्धेमध्ये ही नवी मालिका “सावळ्याची जणू सावली “आपली कशी भूमिका बजावते आणि कितपत टिकते हे बघणं महत्त्वाचं ठरलं आहे.
New Marathi serial Savalyachi janu savali : अभिनेत्री मेघा धाडे बजावणार प्रमुख भूमिका
झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी “सावळ्याची जणू सावली” या मालिकेत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री मेघा धाडे आपल्याला दिसणार आहेत. बिग बॉस या रियालिटी शो मुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मेघा धाडे आता आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत इतर अनेक कलाकार आपल्याला त्यांची भूमिका बजावताना दिसून येतील. परंतु प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते ती म्हणजे मालिकेतील प्रमुख आणि ठोस अशी भूमिका बजावणारा कलाकार. आता सावळ्याची जणू सावली या मालिकेत मुख्य भूमिका मेघा धाडे बजावणार असून त्यांची भूमिका त्या कशा प्रकारे बजावतील आणि मालिकेला कसे वळण निर्माण करून देतील हे आपल्याला लवकरच समजेल.
( Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)
New Marathi serial Savalyachi janu savali : तिच्या भूमिकेबद्दल काय म्हणाली मेघा धाडे ?
झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या सावळ्याची जणू सावली ही मालिका आता कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. अशातच या मालिकेतील मुख्य भूमिका बजावणारी अभिनेत्री मेघा धाडे हिने आपल्या भूमिकेवर सोशल मीडियाद्वारे आपली काही मते मांडली. या मालिकेबाबत थोडक्यात स्पष्टीकरण देत मेघा म्हणाली, माझं मालिकेमधील नाव भैरवी वझे आहे. शास्त्रीय संगीतात मोठे नाव कमावलेली सुप्रसिद्ध संगीतकार असणारी महत्त्वकांक्षी व्यक्तीची भूमिका मी या मालिकेत बजावत आहे. संगीतासाठी वाटेल ते करायला तयार असणारी आणि संगीतासाठी कोणत्याही थराला जाणारी आणि शास्त्रीय संगीताची परंपरा जपणारं असे हे पात्र मी निभावत आहे. असं म्हणत मालिकेतील आपल्या पात्राची अभिनेत्री मेघा धाडेने ओळख करून दिली. आता हे पात्र ती चोखपणे कसे बजावते हे पाहण्याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना लागून आहे.
New Marathi serial Savalyachi janu savali : मालिकेसाठी कशी निवड झाली मेघा धाडे ची ?
झी मराठीवरील प्रदर्शित होणाऱ्या “सावळ्याची जणू सावली” मालिकेतील प्रमुख भूमिकेत आपल्याला अभिनेत्री मेघा धाडे दिसणार आहे. या मालिकेसाठी अभिनेत्री मेगा धाडेची निवड झाली तरी कशी असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात होता. अभिनेत्री मेघा धाडे ने सोशल मीडियाद्वारे सर्व प्रेक्षकांना या प्रश्नाचे उत्तर दिले. या मालिकेतील एक अनोखं पात्र बजावणारी आणि मुख्य भूमिका पार पाडणारी अभिनेत्री मेघा धाडे हिने या मालिकेसाठी तिची निवड कशा प्रकारे झाली हे सर्वांसमोर मांडलं. ” इतक्या लवकर कास्टिंग प्रक्रिया कुणाचीच झाली नसेल जितक्या लवकर माझी या मालिकेसाठी निवड झाली ” असं म्हणत अभिनेत्री मेघा धाडे हिने मालिकेसाठी निवड झाल्याचा आपला किस्सा सर्वांसमोर मांडला.
आज लुक टेस्ट तर दुसऱ्या दिवशी चित्रकरण सुरू इतक्या लवकर सगळे जुळून आल्याचं मेघा धाडेने सांगितलं. सर्वात आधी कलाकाराला भूमिका आवडली पाहिजे, प्रोडक्शन आवडलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाहिनीने आपली निवड झाल्याचे कळवलं पाहिजे पण मी खूप नशीबवान समजते स्वतःला आणि मला सांगताना देखील आनंद होतो की माझी या मालिकेसाठी एकदम चटकन निवड झाली. असं म्हणत अभिनेत्री मेघा धाडे हिने आपला आनंद सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला. “मधल्या काळात जेव्हा मी रियालिटी शो करत होते तेव्हा मला असं कुठेतरी वाटत होतं की चांगली भूमिका करायची मग मी निश्चय केला की जिथून माझं मनोरंजन विश्वात पदार्पण झालं तिथेच आता परतायचं म्हणजेच मालिका विश्वात जायचं.”
आता अभिनेत्री मेघा धाडेचीही नवी भूमिका प्रेक्षकांसमोर कशी येते आणि प्रेक्षक त्याला कितीसा प्रतिसाद देतात हे लवकरच आपल्याला समजेल.
New Marathi serial Savalyachi janu savali : मालिकेने केलं जोरदार प्रमोशन
मालिका म्हटलं की प्रमोशन आलंच!! झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या सावळ्याची जणू सावली या मालिकेने जोरदार प्रमोशन केलेलं आपल्याला सोशल मीडियाद्वारे दिसून आलं. सावळ्याची जणू सावली मालिकेची संपूर्ण टीम जोरदार प्रमोशन करताना आपल्याला दिसून आली. मध्यंतरी सावळ्याची जणू सावली टीम पंढरपूर मध्ये होती. त्यावेळी त्यांचा अनोखा रेकॉर्ड आपल्या सर्वांनाच पाहायला मिळाला. संपूर्ण टीम नं पंढरपूरच्या आध्यात्मिक वातावरणात सामील होऊन आसपासच्या भजनी मंडळाद्वारे अखंड 25 तास विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन अखंड भजन सेवा विठ्ठल चरणी अर्पण केली. असा या टीमने तयार केलेला रेकॉर्ड सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळाला. याची दखल “वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया” ने देखील घेतली.
New Marathi serial Savalyachi janu savali : या मालिकेतील लोकप्रिय कलाकार येणार लवकरच आपल्या भेटीला
झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या सावळ्याची जणू सावली या मालिकेत मुख्य भूमिकेत आपल्याला मेघा धाडे दिसणार असून त्यांच्यासोबत अनेक कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत. नक्की या मालिकेतून कोण कोण आपल्या भेटीला येणार असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात होते. झी मराठी वाहिनीने याबाबत खुलासा करत कलाकारांची ओळख करून दिली. या मालिकेत एक दोन नव्हे तर अनेक सुप्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. प्राप्ती आणि साईंकीत यांच्यासह मालिकेत सुलेखा तळवलकर, विणा जगताप, गौरी किरण, भाग्यश्री दळवी असे कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत.
महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे या मालिकेचे निर्माते असून ही मालिका 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता झी मराठी वाहिनीवर आपल्याला पाहायला मिळेल. आता लवकरच ही मालिका आपल्या भेटीला येत आहे. कशी असेल ही मालिका ? प्रेक्षक या मालिकेला कितपत प्रतिसाद देतील या प्रश्नांची उत्तर येणारा काळच देईल !
तुम्ही या मालिकेचा प्रोमो पाहिलात का जर पाहिला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका आणी अशाच नवीन नवीन अपडेट साठी चित्रपट चर्चा ला फॉलो करा !
Table of Contents
अर्पिता पाटील या रुईया महाविद्यालयात बॅचलर इन मास मीडियामध्ये पहिल्या वर्गात शिकत असून त्या मनोरंजन आर्टिकल विषयावर लिहितात.