Phullwanti Teaser : प्राजक्ताच्या दिलखेच अदांनी वेधलं लक्ष..!
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांचा बहुचर्चित “फुलवंती” चित्रपटाचा टिझर आज प्रेक्षकांसमोर आला. एवढ्या दिवसापासून प्रेक्षकांची आतुरता शिगेला पोहोचली होती ती आज टिझरच्या रूपाने पाहायला मिळाली. चित्रपटाच्या टिझरबद्दल बोलायचं झालं तर टीझरमध्ये आपल्याला “फुलवंती” नावाच्या एका पेशवेकालीन सुप्रसिद्ध नर्तिकेचं आयुष्य बघायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध नर्तिका “फुलवंती” आणि तत्कालीन प्रकांडपंडित व्येंकटशास्त्री यांची जबरदस्त कथा आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये शृंगारामध्ये सजलेली फुलवंती, भव्यदिव्य आणि उच्च प्रतीचे सेट्स, दमदार ऐतिहासिक कथा आणि तत्कालीन सुप्रसिद्ध नर्तिका “फुलवंती” च्या अदा आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे प्रकांडपंडित व्येंकटशास्त्री आणि दुसरीकडे “फुलवंती” नर्तिका यांची कथा कशाप्रकारे प्रेक्षकांच्या मनात घर करेल आणि चित्रपट लोकांना किती आवडेल आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Phullwanti Teaser :- फुलवंती चा टिझर पाहिलात का ? नसेल पाहिलात तर पहा
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)
Phullwanti Teaser :- फुलवंती चित्रपटाचं नेमकं आकर्षण काय आहे ?
मराठीमध्ये हल्ली ऐतिहासिक चित्रपटांची सरबत्ती सुरु आहे हंबीरराव, फत्तेशिखस्त, राव-रंभा, वीर मुरारबाजी आणि असे असंख्य चित्रपट आतापर्यंत येऊन गेले आणि त्यांना प्रेक्षकांनी तसा चांगला प्रतिसादही दिला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेते गश्मीर महाजनी यांचा फुलवंती हा चित्रपटपण अशाच एका ऐतिहासिक नर्तकी वर आधारित आहे जिच्या सौंदर्याने अक्खी पेशवेशाही उजळून निघाली होती.
एक अशी नर्तिका जी अत्यंत अभिमानी, स्वाभिमानी अशी आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात तिची शास्त्रीबुवांशी ओळख होते. शास्त्रीबुवांना भेटल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये एक छानसं वळण येतं. फुलवंतीला परीरस्पर्श करणारे शास्त्रीबुवा आहेत त्यांच्या शिवाय फुलवंती अपूर्ण आहे तर अशी फुलवंतीची कहाणी येत्या ११ ऑक्टोबरला आपल्याला पाहायला मिळेल. स्नेहल तरडे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून चित्रपटाचे संवादलेखन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना किती भुरळ पडतोय त्याकडे लक्ष लागलाय.
Phullwanti Teaser :- चित्रपटासाठी लागणाऱ्या दागिनंसाठी माझ्या टीमने खूप रीसर्च केला
“फुलवंती” चित्रपटामध्ये वापरण्यात आलेले सर्व दाग-दागिने प्राजक्ता माळी हिच्या प्राजक्तराज या ब्रँड चे आहेत. चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान न्युज 18 लोकमतशी बोलताना प्राजक्ता माळी म्हणते की चित्रपटाची कथा ऐतिहासिक असल्यामुळे माझ्या प्राजक्तराज टीमने पेशवेकालीन भारतभर नर्तन केलेली नर्तिकेच्या गळ्यातील हार, बांगड्या, कानातले दागिने आणि त्याकाळात वापरण्यात येणाऱ्या शाली आणि साड्या कशा असतील त्याबद्दल रीसर्च केले. प्राजक्ता सांगते की फुलवंतीला बडोद्याच्या राजांनी दागिने भेट म्हणून दिले शाहू महाराजांनी दागिने भेट केले तर ते कसे असतील याबद्दल प्रेजक्तराज ब्रँडच्या टीमने खूप रीसर्च केला. त्याचबरोबर फुलवंतीचा रोल करताना मी तिच्या दिसण्यावर, चालण्यावर नाचण्यावर, मुरडण्यावर विशेष लक्ष दिलं जेणेकरून माझा रोल फुलवंतीसाठी साजेसा होईल.
पुढे ती म्हणते की या चित्रपटासाठी प्रवीण तरडे यांचं संवादलेखन लाभलं आहे त्यामुळे ऐतिहासिक चित्रपट आणि त्यावर प्रवीण तरडे यांचं संवादलेखन त्यामुळे चित्रपटाचा एक एक डायलॉग बोलताना वेगळीच मज्जा होती. गश्मीरने देखील मला खूप मदत केली चित्रपटाचं शूटिंग जेव्हा सुरु होतं तेव्हा मला एकदाही कधी त्याने पैशाबद्दल विचारलं नाही की माझे ऍडव्हान्स बाकी आहेत किंवा पैसे कधी मिळतील पूर्ण शूटिंग दरम्यान तो शांत राहिला.
गश्मीर म्हणाला की मी काहीतरी वेगळा करण्याच्या तयारीत होतो तेव्हाच मला नरसिंह शास्त्रींचा रोल करायला मिळाला. या चित्रपटासाठी मी व्हॉइस मोडूलेशन केलंय आतापर्यंत मी माझा बेस आवाज वापरात होतो पण शास्त्रींच्या रोलसाठी मी थोडा बारीक आवाज वापरला आहे जो कि त्यांना साजेसा वाटतो. शास्त्रींच्या रोलसाठी मी पकवाज वादनाचं प्रशिक्षणं घेतलाय जेणेकरून त्या रोलमध्ये एक जिवंतपणा येईल.
तुम्ही फुलवंती चा टिझर पाहिलात का ? पहिला असेल तर तुमचं फुलवंती चित्रपटाबद्दल काय मत आहे आम्हला जरुर कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.