Pill Review :-
बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh ) सध्या चर्चेत आहे ते त्याच्या नुकत्याच झालेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या पदार्पणामुळे. काल जिओ सिनेमा वर रिलीज झालेल्या “Pill” या मेडिकल ड्रामा सीरिजमध्ये रितेश देशमुख याने मुख्य भूमिका साकारलीय. फार्मास्युटिकल उद्योगातल्या चालू असणाऱ्या घोटाळ्यांवर हि सीरिज एक सणसणीत चपराख आहे. रितेश देशमुखच्या चाहत्यांनी ह्या सीरिजबद्दल त्याचं भरभरून कौतुक केलेलं आहे. आतापर्यंतच्या रितेशच्या एकंदरीत कारकिर्दीत रितेशने असं कामं पहिल्यांदाच केलय आणि म्हणूनच प्रेक्षक त्याची प्रशंसा करतायत. ( Pill Review )
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)
“Pill” या सीरिजमध्ये गोळी बनण्याच्या प्रक्रियेपासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या वेगवेगळ्या स्तरात होणाऱ्या घोटाळ्यांवर भाष्य करते. या घोटाळ्यांमध्ये असलेले मोठे मोठे उद्योगपती, भ्रष्ट डॉक्टर, औषध विक्रेते, औषध पुरवणारे, देशातील मोठे नेते, पत्रकार या सगळ्यांचा कशा प्रकारे सहभाग असतो ते सर्व तुम्हाला या सिरीजमधून पाहायला मिळेल. माझ्या माहितीनुसार मेडिकल क्षेत्रात होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल उघडपणे दाखवणारी कदाचित भारतातील हि पहिली वेब सिरीज आहे. त्यामुळेच प्रेक्षकांमध्ये या वेब सिरीजबद्दल उत्सूकता आहे. (Pill Review)
Pill Review :- प्रेक्षकांना “पिल” एवढी का आवडली कारण जाणून घ्या
बॉलीवूडमध्ये रितेश देशमुखचा खूप मोठा चाहतावर्ग आहे आतापर्यंत त्याने जेवढेपण कॉमेडी रोल्स केले ते प्रेक्षकांना खूप आवडले. “पिल” या वेब सीरिजमध्ये त्याने डॉक्टर प्रकाश चौहाण ची भूमिका साकारलीय जी थोडी वेगळी आहे. फार्मासिटिकल उद्योगातील होणाऱ्या भराष्टाचाराला वाचा फोडणारी कामगिरी तो या वेब सीरिजमध्ये करणार आहे. या आधी रितेश देशमुखने “एक था व्हिल्लन” या चित्रपटात गंभीर भूमिका केली होती आणि “पिल” या वेब सिरीजमध्ये त्याची हीच गंभीर भूमिका लोकांना आवडतेय.
AMAZING KAKUDA MOVIE REVIEW ! “काकुडा” “मुंज्या”सारखी जादू करू शकेल का ?
काही औषधं आपल्या शरिरासाठी हानीकारक असतात पण तरीही ती बाजारात अगदी सहजरित्या मिळतात आणि डॉक्टरांकडून ती आपल्याला घेण्यासाठी सांगितलीपण जातात. यामध्ये मोठ्या औषध कंपन्या, भ्रष्ट डॉक्टर, औषध विक्रेते, सप्लायर आणि भ्रष्ट नेते या सगळ्यांचा सहभाग असतो आणि त्याविरुध्द आवाज उठवण्याचं काम डॉक्टर प्रकाश चौहाण म्हणजेच (Riteish Deshmukh ) याने केलय. नुकतीच झी 5 या ओटीटीवर रितेश देशमुखची “काकुडा” हि हॉरर कॉमेडी मूवी रिलीज झाली आणि आता जिओ सिनेमावर “पिल” हि वेब सीरिज एकामध्ये पोट धरून हसवणारी रितेशची कॉमेडी तर एकामध्ये फार्मा उद्योगात होणाऱ्या भ्रष्टाचारवर तुम्हाला विचार करायला लावेल एवढा गंभीर रोल रितेशने केला त्यामुळे प्रेक्षकांकडून त्याचं खूप कौतुक होतंय.
“पिल”या सीरिजचं दिग्दर्शन नक्की केलंय तरी कोणी ? Pill Review
“रेड” , “नो वन किल जेसिका”, “आमिर” यांसारख्या एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपटांचं दिग्दर्शन ज्यांनी केलंय त्याचं अफलातून दिग्दर्शकाने म्हणजेच “राज कुमार गुप्ता” यांनी “पिल” सारखी जबरदस्त वेब सीरिज दिग्दर्शित केलीय ज्यामध्ये रितेश देशमुख, पवन मल्होत्रा, अंशूल चौहान आणि आकाश चौहान हे मुख्य भूमिकेत आहेत. या आधी वेगवेगळ्या उद्योगातील भ्रष्टाचाराबद्दल खूप सीरिज आल्यात आणि त्या प्रसिद्ध देखील झाल्या जसं कि “कोटा फॅक्टरी” , “इन्साईड एज”, “असुर” त्यामुळे “पिल” कशाप्रकारे लोकांच्या मानत घर करेल याबद्दल उत्सुकता आहे शिवाय रितेश देशमुखचं ओटीटीवरील पदार्पण हेदेखील तेवढंच उत्सुकता वाढवणारं आहे.
Pill Review प्रेक्षकांनी ट्विटरवर नेमक्या काय प्रतिक्रीया दिल्या :-
अभिनेत्या रितेश देशमुखच्या जबरदस्त अभिनयामुळे ट्विटरवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रीया वाचण्यासारख्या आहेत. एकाने लिहिलंय ” रितेश देशमुख का क्या परफॉर्मन्स हे यार “. तर दुसरा म्हणतॊ ” रितेश देशमुखला गंभीर रोलमध्ये बघायला मज्जा येते”. तिसरा फॅन रितेशबद्दल ट्विटरवर लिहितो कि ” खूप वर्षानंतर रितेश देशमुखला गंभीर रोलमध्ये बघायला मिळालं”. तर एका चाहत्याने ट्विटरवर लिहिलंय कि ” रितेश देशमुखची ओटीटी वरील एन्ट्री म्हणजे गेम चेंजर आहे”. एकाने म्हटले आहे कि “रितेशने असे रोल खूप केले पाहिजेतआम्हाला बघायला आवडेल”.
तर तुम्हाला रितेश देशमुखची “पिल” ही वेब सिरीज कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.