Pooja Sawant shared emotional post :- अभिनेत्री पूजा सावंत का सापडली दुःखाच्या खाईत?
मराठी सिनेमा सृष्टीतील सर्वांची लाडकी, आणि आघाडीची अभिनेत्री म्हणजेच पूजा सावंत. अभिनेत्री पूजा सावंत यांनी सिनेमासृष्टीमध्ये आपला चांगला जम बसवला आहे. तिच्या उत्तम अभिनयामुळे अनेक प्रेक्षकांची ती चहाती झाली आहे. अशा सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री पूजा सावंतचं सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणं सर्वांनाच माहित आहे. तिच्या सोशल मीडियाच्या अपडेट नुसार एक नवीन माहिती चहात्यांना मिळाली. नुकताच पूजा सावंत हिने एक दुःखद पोस्टद्वारे आपले दुःख चाहत्यांसमोर मांडले. का बरं आलं पूजा सावंतच्या डोळ्यात पाणी असा प्रश्न चाहत्यांसमोर निर्माण झाला !
अशातच अभिनेत्री पूजा सावंत हिने आपल्या लाडक्या मांजरीचं ‘ bella mumma ‘ हीच निधन झाल्याची बातमी समोर मांडली.
आपल्या लाडक्या मांजरीच्या निधनाने पूजा दुःखाच्या खाईत कोसळल्या आहेत.. आपल्या लाडक्या मांजरीच्या निधनाची दुःखद पोस्ट चहात्यांसोबत शेअर करून अभिनेत्री पूजा सावंत हिने आपले दुःख व्यक्त केले आहे. आपल्या मांजरीच्या निधनाची भावुक पोस्ट शेअर करत अभिनेत्री पूजा सावंत म्हणते,” bella mumma तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही.., मला प्रत्यक्ष आणि तुझी आठवण येईल. तू माझं आयुष्य प्रकाशित केलं होतं. आता मला सगळीकडे अंधार दिसत आहे. मी तुला पुन्हा भेटेन.Rest In Peace Mumma.” असं पूजाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तिच्या भावुक पोस्टला अनेक चाहत्यांनी कमेंट द्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपल्या भावुक पोस्ट द्वारे पूजा आपले दुःख चाहत्यांसमोर मांडत आहे. सध्यां पूजाची ही पोस्ट खूपचं व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे. चाहात्यांनी देखील कमेंट द्वारे पूजाचे सांत्वन केले आहे. सर्वांची मने जिंकणारी अभिनेत्री पूजा सावंत हिच्यावर कोसळलेले दुःख पाहून चहात्यांना सुद्धा वाईट वाटले आहे. अभिनेत्री पूजा सावंत हिला आपली मांजर किती प्रिय होती हे तिने आपल्या आधीच्या मुलाखतीतून देखील सर्व प्रेक्षकांना सांगितले होते. तिचे प्राणी प्रेम सर्वांनाच ठाऊक होते. अशातच तिची लाडकी मांजर तिला सोडून गेल्यामुळे तिला दुःखहोणे साहजिकच आहे. आपल्या भावुक पोस्टद्वारे ती सर्व चहात्यांना आपले दुःख कळवत आहे.
हेपण वाचा :- Brand New Upcoming Marathi movies 2025 : पुढच्या वर्षी येतायत नवनवीन मराठी चित्रपट आपल्या भेटीला वाचा कोणते ते..!
अभिनेत्री पूजा सावंत हिने ‘क्षणभर विश्रांती ‘ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. प्रत्येक चित्रपटामध्ये उत्तम भूमिका साकारून आणि आपले काम चोखपणे पार पाडून आपल्या अभिनयातून तिने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. अभिनेत्री पूजा सावंत हिला खऱ्या अर्थाने ‘दगडी चाळ’ या चित्रपटाने लोकप्रियता मिळवून दिली या चित्रपटा द्वारे तीने घरोघरी प्रत्येकाच्या मनात घर केले. अभिनेत्री पूजा सावंतने मराठी बरोबरच हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. असे मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये नाव असणारी सर्वांची लाडकी आणि बहुप्रतिष्ठित अभिनेत्री पूजा सावंत हिने फेब्रुवारी महिन्यात सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्यात पदार्पण केले आहे.
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.) Pooja Sawant shared emotional post
(Pooja Sawant shared emotional post ) :- नुकतेच नाचगो बया या गाण्यातून सर्वांच्या भेटीला आली होती अभिनेत्री पूजा सावंत
सुप्रसिद्ध आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत ही मध्यंतरीच निक शिंदे यांच्या “नाच गो बया” या गाण्यामधून आपल्या सर्वांच्या भेटीला आली होती. टिक टॉक द्वारे फेमस झालेला नीट शिंदे आणि त्याची भन्नाट गाणी आपल्या सर्वांनाच आवडीची वाटतात. त्याच्याच मध्यंतरी आलेल्या नाच गो बया या गाण्यात आपल्याला अभिनेत्री पूजा सावंत दिसून आली या गाण्यात आपल्याला पूजा सावंत बरोबर अक्षय नाईक,आकांशा गाडे,आयुष, निक हे पाहायला मिळाले होते. या गाण्यातून अभिनेत्री पूजा सावंत चा सुंदर नाच आपल्याला पाहायला मिळाला पूजा तिच्या मुलाखतीत म्हणाली, “नृत्य ही मला दिवाने दिलेली एक कला आहे जी मी जपते. आणि या गाण्याची निमित्ताने मला ती जोपासता आली.
मला या गाण्यामध्ये काम करताना खूप धमाल आली खूप छान वाटलं. कारण या गाण्याची कॉन्सेप्टच इतकी भन्नाट होती की कुणालाही सहज आणि चटकन आवडेल. असं म्हणत तिने गाण्या बद्दल काही गोष्टी स्पष्ट केल्या.” मझ्या नाच्ण्याच श्रेय मी मझ्या आईला देते कारण मी नृत्याचं असं काही प्रशिक्षण वगरे घेतलं नाही लहानपणापासूनची आवड म्हणून मी नाचते आणि माझी आई नेहमी माझ्या सोबत असते. असं पूजाने सांगून आपल्या आई बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
तिने या गाण्यात नाचण्याच श्रेय आशय पाटील ला दिलं त्याच बरोबर त्यांच्या मैत्रीचा खुलासाही करताना आपल्याला पूजा दिसून आली.अशातच गाण्याच्या कॉन्सेप्ट बद्दल पूजा सांगते,” आपल्या कोणालाही आठवत नाही की आपली आई,आजी,मावशी शेवटच्या केव्हा नाचल्या आहेत ? पण ह्या गाण्यामुळे माझ्या घरच्या बायकाही नचल्या…गाण्याची संकल्पना सुध्दा हीच होती असं म्हणत गाण्याबाबत आपलं मत पूजाने सर्वांसमोर मांडलं. प्रत्येकाच्या मनात घर करून राहणारे पूजा सावंतचं भन्नाट गाणं सर्वांच्या आवडीचं बनलं.
अशी सर्वांची लाडकी अभिनेत्री सध्या दुःखाच्या काळातून प्रवास करत आहे. अशा आहे कि ती लवकर या दुःखातून स्वतःला सावरेल. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की कळवा. अशाच नवीन नवीन अपडेट साठी चित्रपट चर्चा ला फॉलो करा !
Table of Contents
अर्पिता पाटील या रुईया महाविद्यालयात बॅचलर इन मास मीडियामध्ये पहिल्या वर्गात शिकत असून त्या मनोरंजन आर्टिकल विषयावर लिहितात.