Punha Ekda Sade Made Teen : सिनेमाचा पार पडला मुहूर्त
Punha Ekda Saade Maade Teen : सतरा वर्षांपूर्वी घराघरात मनोरंजन करणारा सर्वांच्या आवडीचा चित्रपट म्हणजेच “साडे माडे तीन” ज्यामध्ये मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि महाराष्ट्राचे महाराष्ट्र भूषण म्हणजेच ज्यांनी जवळपास तीन दशके मराठी चित्रपटसृष्टीचा भार आपल्या खांद्यावर यशस्वीपणें पेलला असे अभिनयाचे अशोक सम्राट सर्वांचे लाडके अशोक सराफ होते. त्याचाच दुसरा भाग म्हणजे पुन्हा साडे माडे तीन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. “साडे माडे तीन” चा पहिला भाग सर्व घरांमध्ये प्रत्येका ची मने जिंकणारा ठरला. या चित्रपटाने सर्व प्रेक्षकांना आपलसं करून घेतलं.
“साडे माडे तीन” या चित्रपटाच्या पहिल्या भागाचा दिग्दर्शन अंकुश चौधरी व सचित पाटील यांनी केले होते. अंकुश चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार “पुन्हा एकदा साडे माडे तीन” मध्येही दिग्दर्शन अंकुश चौधरी स्वतः करणार आहेत ही माहिती गेल्या महिन्यात अंकुश चौधरी यांनी सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. अनेक पोस्ट शेअर करत “साडे माडे तीन चा सिक्वेल येत आहे अशी माहिती सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली गेली. साडे माडे तीन” चा हा सिक्वेल प्रेक्षकांना ओरिजनल प्रमाणेच आवडेल का ? पहिल्या भागात जसं प्रेक्षकांना हसवलं, आपलंस केलं तसंच चित्रपटाचा दुसरा भाग करेल का ? असे प्रश्न सध्या चर्चेत आहेत. आता साडे माडे तीन चा सीक्वेल प्रेक्षकांना आवडतो की नाही आणि यावर प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया असतील हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरचं समजेल.
Punha Ekda Saade Maade Teen : असा होता १७ वर्षापूर्वीचा साडे माडे तीन
उत्तम अभिनेता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत नावाजलेले जाणकार कलाकार अंकुश चौधरी व सचित पाटील यांनी 17 वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला “साडे माडे तीन” हा चित्रपट घरोघरी गाजला. अंकुश चौधरी व सचित पाटील या जोडीने चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. सर्वांच्या आवडीच्या असलेल्या “साडे माडे तीन” या चित्रपटात महाराष्ट्राचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे या त्रिकूटांनी “कुरळे ब्रदर्स” ची भूमिका साकारून प्रत्येक प्रेक्षकांची मने जिंकली होती.
हिंदी चित्रपट सृष्टीतील “चलती का नाम गाडी” या अशोक कुमार ,अनुप कुमार आणि किशोर कुमार यांच्या हिंदी चित्रपटाचा “साडे माडे तीन” चा हा रिमेक होता. आता साडे माडे तीनच्या सिक्वेल च्या निमित्ताने पुन्हा एकदा हे ‘कुरळे ब्रदर्स’ प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. तीच धमाल तीच मजा पुन्हा प्रेक्षक अनुभवतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलं आहे.
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)
Punha Ekda Saade Maade Teen : साडे माडे तीन च्या सिक्वेल मधून कोण कोण येणार प्रेक्षकांच्या भेटीला ?
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे “पुन्हा एकदा साडे माडे तीन” या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. दिग्दर्शक अंकुश चौधरी पुन्हा एकदा या चित्रपटावर काम करणार आहेत अशी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली. आता या चित्रपटांमध्ये नक्की कोण कोण आपल्याला पाहायला मिळणार अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू असता प्रथमदर्शी अंकुश चौधरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, रिंकू राजगुरु हे कलाकार आपल्याला प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
यांच्याच बरोबर आणखी कोणते कलाकार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतील याबाबत काही ठोस माहिती अजून तरी मिळालेली नाही. आता “पुन्हा एकदा साडे माडे तीन” ची निर्मिती अमेय विनोद खोपकर पिक्चर्सच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन व सुधीर कोलते हे करणार आहेत. आता याचबरोबर आणखी कोणते कोणते कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आणि साडे माडे तीन चा सीक्वेल आता कशाप्रकारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे लवकरच आपल्याला समजेल.
Punha Ekda Saade Maade Teen : चित्रपटाबाबत अंकुश चौधरी ने प्रेक्षकांसमोर मांडल्या आपल्या भावना
कोणत्याही चित्रपटाचा सिक्वेल ही खरंच खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट असून ती जितकी मोठी आणि तितकीच अभिमानाची गोष्ट असते. आता साडे माडे तीन चा सिक्वेल नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामुळे दिग्दर्शक अंकुश चौधरी अत्यंत उत्साहात कामाला लागले आहेत. आपला आनंद व्यक्त करत ते म्हणाले एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग घेणे अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे आणि ती मला पार पाडायची आहे. यामध्ये नक्कीच मोठा वाटा प्रेक्षकांचा आहे आणि मला खात्री आहे जसा प्रेक्षकांनी साडे माडे तीन च्या पहिल्या भागाला भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद साडे माडे तीन च्या सिक्वेललाही दिला जाईल.
नक्कीच साडे माडे तीन चा पहिला भाग पाहता प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा साडे माडे तीन कडून अनेक अपेक्षा वाढल्या असतील आणि ते पूर्ण करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. मला खात्री आहे प्रेक्षकांनी जसं साडे माडे तीन वर प्रेम केलं तसंच त्याच्या सिक्वेलवरही ते प्रेम करतील आणि भरभरून प्रतिसाद देतील. असं म्हणत अंकुश चौधरी म्हणाले असून साडे माडे तीन च्या सिक्वेलमध्ये “कुरळे ब्रदर्स” ची धमाल डबल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं.
Punha Ekda Saade Maade Teen : अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी पोस्टद्वारे दिली माहिती
साडे माडे तीन च्या सिक्वेलबद्दल अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्ट द्वारा प्रेक्षकांना माहिती दिली. आपल्या पोस्ट मधून दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे असं म्हणत त्यांनी दिग्दर्शक अंकुश चौधरी यांचे आभार व्यक्त केले आहेत. साडे माडे तीन च्या सिक्वेल चे काम नुकतेच जोरात सुरू झाले आहे. पुन्हा एकदा मला घराघरात हश्या पिकवता येणार याचा मला आनंद आहे असे सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या पोस्टद्वारे सर्वांना सांगितलं.
आता साडे माडे तीन चा हा सिक्वेल पुन्हा घरोघरी हश्या पिकवणार का ?
सतरा वर्षांपूर्वीची हीच धमाल पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार का ? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळणार !
आता यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट द्वारा आम्हाला नक्की कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.
Table of Contents
अर्पिता पाटील या रुईया महाविद्यालयात बॅचलर इन मास मीडियामध्ये पहिल्या वर्गात शिकत असून त्या मनोरंजन आर्टिकल विषयावर लिहितात.