Sara kahi Tichyasathi off air soon : सारं काही तिच्यासाठी मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप.. !
झी मराठी वाहिनीवरील मालिका म्हणजे महाराष्ट्रातल्या महिला वर्गासाठी एक पर्वणीच असते त्यामध्ये जर एखाद्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं तर ती मालिका जास्तीत जास्त वर्ष दाखवली जाते. जवळजवळ वर्षभर चालू असलेली आपल्या सर्वांच्या घराघरात पाहिली जाणारी अशी झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका “सारं काही तिच्यासाठी” ( Sara kahi Tichyasathi )हिने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. नुकताच काल म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी मालिकेचा शेवट चा एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळाला. जवळपास एक वर्षांपासून चालू असलेली सर्वांची आवडती मालिका संपल्या मुळे प्रेक्षकांनाही थोडंसं चुकचुल्या सारखं होतंय.
Sara kahi Tichyasathi off air soon : सारं काही तिच्यासाठी मालिकेत कोणी कोणी साकारली भूमिका ?
झी मराठी वाहिनीवरील सर्वांची आवडती आणि सर्वांचं मन वेधून घेणारी मालिका म्हणजे “सारं काही तिच्यासाठी” मालिकेत अनेक कलाकार आपापली भूमिका चोख पणे बजावून महाराष्ट्राच्या मनामनात पोहोचले होते. जवळजवळ वर्षभर सुरू असलेल्या ह्या मालिकेने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवून तिने आता प्रेक्षकांचा नुकताच निरोप घेतला आहे. ह्या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे, दक्षता जोईल, पालवी कदम, रुची कदम, नीरज गोस्वामी यांनी मुख्य भूमिका बजावली. या आधी खुशबू तावडे ह्या देखील प्रमुख भूमिका बजावत होत्या पण मध्यंतरी काही कारणामुळे त्यांनी मालिकेतून ब्रेक घेऊन पल्लवी वैद्य यांनी त्यांची भूमिका पार पाडली. उत्तम अभिनय आणि आपल्या कलेचे सादरीकरण करून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी आणि प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेली ही अशी सर्वांची आवडती मालिका नुकतीच संपली आहे.
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.) Sara Kahi tichyasathi off air soon
Sara kahi Tichyasathi off air soon : का घेतला मालिकेने निरोप ?
२१ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू झालेली “सारं काही तिच्यासाठी” ह्या मालिकेने नुकताच काल प्रेक्षकांचा निरोप घेतला. झी मराठी वाहिनीवर “सावळ्याची जणू सावली” ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मध्यंतरी झी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसमोर त्याचा प्रोमो सादर करत मालिकेची ओळख करून दिली होती. आता ही मालिका “सारं काही तिच्यासाठी” या मालिकेची जागा घेत आहे.
गेल्या काही दिवसापासून मलिकेबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू होती. कमेंट्स द्वारे प्रेक्षक आपली मते मांडत होते. सारं काही तिच्यासाठी मालिका आपला निरोप घेण्याच्या चर्चा सुध्दा सोशल मीडिया वर सुरू होत्या. अशातच नवी मालिका “सावळ्याची जणू सावली” प्रोमो द्वारा प्रेक्षकांच्या भेटीला आली. जसं कि तुम्हाला माहितीय कि एखादी नवी मालिका आली कि जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते त्यामुळे आता ही नवीन मालिका प्रेक्षकांची मनं जिंकणार का ? ह्या व ह्यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच आपल्याला मिळतील
Sara kahi Tichyasathi off air soon : अभिनेत्यांनी केला पोस्ट द्वारे खुलासा
वर्षभर सुरू असलेली सारं काही तिच्यासाठी मालिकेमध्ये प्रमुख भूमिका बजावणारे अभिषेक गावकर यांनी सुरुवातीला आपल्या पोस्ट द्वारे मालिका एक्झिट घेत असल्याचं कळवलं. या मुळे सर्व प्रेक्षक वर्ग चर्चेत असल्याचं दिसून आलं. झी मराठी वाहिनीने मालिका संपणार असे सांगितल्यावर श्रीनुची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक गावकर याने यावर दुजोरा दिला. त्या नंतर १४ सप्टेंबर ला “सारं काही तिच्यासाठी” मालिकेचा शेवटचा एपिसोड आहे तर तो नक्की पाहा अशी पोस्ट करून माहिती देण्यात आली.
Sara kahi Tichyasathi off air soon : अभिनेत्री पालवी कदम ने पोस्ट द्वारा दिली माहिती
“सारं काही तिच्यासाठी” मालिकेत चारूची भूमिका साकारून आपली भूमिका चोख पार पाडणारी अभिनेत्री पालवी कदम हिने आपल्या सोशल मीडिया द्वारा शेवटचा एपिसोड चुकवू नका नक्की पाहा असे प्रेक्षकांना सांगितले. या वर सर्व प्रेक्षकांनी आपली मते देखील कमेंट्स मधून मांडली. अभिनेत्री पालवी कदम यांनी शेवटच्या एपिसोड मध्ये आपले व्यक्तिमत्त्व उत्तम रित्या अभिनयाद्वारे साकारून मालिकेचा शेवट उत्तम आणि मनाला भावेल असा केला. “सारं काही तिच्यासाठी” मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन सर्व प्रेक्षक वर्गाचे आभार मानले. सर्व कलाकारांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी चित्रपट चर्चकडून खूप खूप शुभेच्छा.
तुम्ही “सारं काही तिच्यासाठी” मालिकेचा शेवटचा भाग पाहिलात का ? जर पहिला असेल तर तुमच्या प्रत्रिक्रिया आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका
Table of Contents
अर्पिता पाटील या रुईया महाविद्यालयात बॅचलर इन मास मीडियामध्ये पहिल्या वर्गात शिकत असून त्या मनोरंजन आर्टिकल विषयावर लिहितात.