stree 2 movie box office collection :- स्त्री २ ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर !

Stree 2 movie box office collection

15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून प्रदर्शित झालेला स्त्री 2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस मोठे आकडे गाठताना दिसत आहे. हॉलिवूडच्या चित्रपटांमुळे किंवा दाक्षिणात्य चित्रपटांना हिंदी भाषेत भाषांतर करून पूर्ण भारतात रिलीज केले जात असल्यामुळे सध्या टिपिकल हिंदी भाषिक बॉलीवूड चित्रपट लोकांच्या फार पसंतीस उतरत  नाहीत त्यात ओटीटीने अजून लोकांना भरभरून चांगले काहीतरी बघायची संधी दिल्यामुळे लोकांचा बॉलीवूड चित्रपटाकडे दुर्लक्ष जाण्याकडे भर घातली आहे मात्र अशातही स्त्री 2 सारखा चित्रपट भक्कम कमाई करताना दिसतो आहे त्यामुळे बॉलीवूड आपली कात टाकतोय कि काय असंच काहीतरी सिनेप्रेमींना भासतंय.

Stree 2 movie box office collection :- चित्रपटाची नेमकी कथा काय आहे जाणून घेऊ !

२०१८ सालच्या मॅडॉक फिल्म स्टुडिओ निर्मित स्त्री या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आणि मॅडॉक फिल्म स्टुडिओच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्स मधील स्त्री, रूही, भेडिया आणि मुंजा नंतर स्त्री 2 हा पाचवा चित्रपट आहे. स्त्री चित्रपटात स्त्रीच्या भयानक घटनांवर आळा घातल्यानंतर पुन्हा एकदा चंदेरी गावात नवीन रहस्यमय भूत फिरू लागले आहे यावेळी ते पुरुषांना नाही तर स्त्रियांना उचलून नेते त्याचं नाव सरकटा. हे भूत चंदेरी गावात धुमाकूळ घालते आणि पुन्हा एकदा त्यावर आळा घालण्याची जबाबदारी येते विकी आणि त्यांच्या मित्रांवर.

स्त्री वर आळा घातल्यानंतर काही वर्षांनी पुन्हा एकदा स्त्रीच्या कथेतील गहाळ झालेल्या पुस्तकांची पाने सापडतात आणि तिथून समोर येतो तो म्हणजे सरकटा. संपूर्ण चित्रपटात सरकटा नावाच्या भुताचे रहस्य शोधून पुन्हा एकदा स्त्रीला आवाहन करून तिच्या मदतीने सरकटा नामक भूतावर विजय मिळवण्याचा प्रवास या चित्रपटात दाखवला आहे. जसा स्त्री चित्रपट प्रेक्षकांना हसवतो घाबरवतो आणि काही काही ठिकाणी तर चक्क दचकवतो त्यापेक्षाही जबरदस्त अनुभव तुम्हाला स्त्री २ चित्रपट बघताना येईल. या चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अभिजीत बॅनर्जी, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी यांची जबरदस्त एक्टिंग आणि योग्य ठिकाणी कथेप्रमाणे अफलातून कॉमेडी पाहायला मिळते.

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.) Stree 2 movie box office collection

vedaa box office collection day 4 :- जॉन आणि शर्वरीच्या वेदाने अक्षयच्या खेल खेलमे चित्रपटाला पाडलं मागे !

Stree 2 movie box office collection :- स्त्री चित्रपटाचे बजेट आणि स्टारकास्ट

मॅडॉक फिल्म स्टुडिओ निर्मित स्त्री 2 हा चित्रपट निरेन भट्ट यांनी लिहिला असून अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात आपल्याला श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळतात.
स्त्री २ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्त्री या चित्रपटाचा सिक्वल आहे. स्त्री हा चित्रपट २५ करोडच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता तर स्त्री २ हा चित्रपट ५० करोड चा बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.

स्त्री २ चे काही शोज 14 ऑगस्ट ला रात्री नऊ वाजता प्रदर्शित करण्यात आले होते काही निवडक शोध मधून सुद्धा पहिल्या दिवशी स्त्री २ ने 8.5 cr एवढा गल्ला जमवला होता. यामध्ये चित्रपटाला संपूर्ण दिवसही मिळाला नव्हता फक्त नाईट शोज प्रदर्शित करून चित्रपटाने एवढी मोठी ओपनिंग घेतली . इतकेच नव्हे तर आत्तापर्यंत प्री रिलीज शोज मधून सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणजे स्त्री २. या आधी हा रेकॉर्ड चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटाच्या नावावर होता.

Stree 2 movie box office collection
Stree 2 movie box office collection Credit :- Google

Stree 2 movie box office collection :- पहिल्याच दिवशी पठाण चित्रपटासोबत स्पर्धा

चित्रपटाच्या ओपनिंग डेला चित्रपटाने ५१.५ करोड इतकी कमाई केली 15 ऑगस्ट सुट्टीचा दिवस असल्यामुळे चित्रपटाने मोठी ओपनिंग घेणे अपेक्षित होते मात्र स्त्री २ चे फर्स्ट डे कलेक्शन हे स्त्री च्या तुलनेत आठ ते नऊ पटीने जास्त आहे. आता स्त्री चे प्री रिलीज शो आणि डे वन कलेक्शन जर एकत्र केले तर ६० करोड हा आकडा समोर येतो. मुळात मुद्दा असा आहे कि बॉलीवूडच्या किंग खान म्हणजेच शाहरुखच्या पठाण चित्रपटाची फर्स्ट डे ओपनिंग होती ५७ करोड आणि कोणताही मोठा स्टार नसतानाही स्त्री २ ची ओपनिंग होते ६० करोडच्या घरात म्हणजेच हि कमाल आहे सर्व एक्टर्सच्या एक्टिंग आणि मॅडॉक फिल्म स्टुडिओची त्याबरॊबरच स्त्री २ हा चित्रपट जवान आणि ऍनिमल नंतर पहिल्या दिवशी सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन करणारा तिसरा हिंदी सिनेमा ठरला.

Stree 2 movie box office collection :- स्त्री २ आतापर्यंत कमावले किती ?

चित्रपटाने पहिल्या दिवशी जबरदस्त ओपनिंग करत जवळपास ६० करोडचा आकडा जमवला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ३१.४ करोड इतका गल्ला जमवला तर तिसऱ्या दिवशी पुन्हा जोर धरत ४३.८५ करोड आणि हीच स्पीड चौथ्या दिवशीही सुरूच राहिली आणि चौथ्या दिवशी चित्रपटाने ५५.९ करोड एवढे बॉक्स ऑफिस कलेक्शन करत विकेंडला १९१ करोडचा गल्ला जमवला. स्त्री २ चा हा आकडा चित्रपटाला बिगेस्ट ओपनिंग विकेंड इन इंडिया या लिस्टच्या पाचव्या नंबर वर घेऊन गेला. जवान पठाण ॲनिमल के जी एफ भाग दोन यानंतर सर्वाधिक वीकेंड कमाई करणारा चित्रपट म्हणजे स्त्री २.

Stree 2 movie box office collection
Stree 2 box office collection
Stree 2 movie box office collection Credit :- Google

ओपनिंग डे आणि ओपनिंग विकेंड मध्ये मोठमोठ्या सिनेमांसोबत कॉम्पिटिशन केल्यानंतर हायेस्ट कलेक्शन इन इंडिया यामध्ये पठाण आणि जवान यांसारखे शाहरुख खान स्टारर हाय बजेट सिनेमे स्त्री २ समोर होते मात्र आत्तापर्यंत स्त्री २ चित्रपटाने सर्वाना मागे टाकत एकूण जगभरात ५८९ करोडचा जबरदस्त गल्ला जमवला आहे.

तर तुम्ही स्त्री २ चित्रपट पाहिलात का ? जर पहिला असेल तर तुमच्या प्रत्रिक्रिया आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.