Top 10 richest actors in india 2023 :-
भारतातील श्रीमंत ऍक्टर्सबद्दल लोकांच्या मनात खूप जास्त उत्सुकता असते कि भारतातील सर्वात श्रीमंत ऍक्टर्स नेमकं कोण आहे कोण बोलतं बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा सगळ्यात श्रीमंत ऍक्टर्स आहे तर कोण बोलतं बॉलीवूडचा बादशाह किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा सगळ्यात श्रीमंत ऍक्टर्स आहे.
बॉलीवूड ऍक्टर्सना नेहमी स्टारडम , ग्लॅमरमध्ये राहावं लागतं नेहमी पार्टी नाहीतर कोणतेतरी इव्हेंट्स ते अटेंड करत असतात. त्यांची ऑन-स्क्रीन कामगिरी आणि वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीमुळे ते मौल्यवान उपकरणे आणि भव्य बंगले घेऊ शकतात त्यांच्या कामांमुळे त्यांनी आतापर्यंत खूप मोठी संपत्ती कमावली आहे यात आश्चर्य नाही.
पण तुम्हाला खरंच माहितीय का कि भारतातील टॉप 10 रिचेस्ट ऍक्टर्स कोण आहेत ते ? नसेल माहिती तर जास्त लोड घेऊ नका चित्रपट चर्चा आहे ना तुम्हाला सांगायला. तर चला पाहूया भारतातील टॉप 10 रिचेस्ट ऍक्टर्सची यादी
शाहरुख खान
अमिताभ बच्चन
सलमान खान
हृतिक रोशन
अक्षय कुमार
आमिर खान
सैफ अली खान
राम चरण
अक्किनेनी नागार्जुन
रजनीकांत
1) Shahrukh Khan :- शाहरुख खान यांना बॉलीवूडमध्ये सगळेजणं बॉलीवूडचा ” बादशाह ” किंवा ” किंग खान ” म्हणून ओळखतात. शून्यापासून साम्राज्य ज्यांनी निर्माण केलं अश्या काही ऍक्टर्सपैकी एक म्हणजे शाहरुह खान. त्यांची एकूण संपत्ती 6300 करोड रुपयांची असून तो Top 10 richest actors in india 2023 च्या यादीमध्ये एक नंबरवर येतो. त्यांनी 1992 मध्ये “दिवाना ” या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, परंतु त्यांच्या कारकिर्दीला यश आले ते ‘बाजीगर’ चित्रपटाद्वारे. भारतीय सिनेमा सृष्टीमध्ये त्याच्या योगदानाबद्दल त्यांना फिल्मफेअर, पद्मश्री इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत.
2) Akkineni Nagarjuna :- अक्किनेनी नागार्जुन हा सर्वात श्रीमंत भारतीय अभिनेत्यांपैकी एक आहे ते तेलगू सिनेमातील एक प्रमुख अभिनेता आहे ज्यांना नऊ राज्य पुरस्कार, 3 फिल्मफेअर पुरस्कार आणि राष्ट्रीय अकादमी पुरस्कार मिळाले आहेत. प्रसिद्ध अभिनेते म्हणून त्यांचा विशेष उल्लेख 1997 मध्ये आलेल्या ‘अन्नमय्या’ चित्रपटात झाला होता. 1989 मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या ‘शिवा’ चित्रपटातही ते प्रमुख व्यक्तिरेखा म्हणून दिसले होते. त्यांची एकूण संपत्ती 3010 करोड असून ते Top 10 richest actors in india 2023 च्या यादीमध्ये दुसऱ्या नंबरवर येतात.
3 ) Salman Khan :- बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सगळ्यांचा लाडका सलमान खान हा बॉलीवूडचा आणखी एक यशस्वी अभिनेता आहे. तो केवळ एक यशस्वी टीव्ही अभिनेताच नाही तर एक प्रसिद्ध टीव्ही होस्टदेखील आहे . एक परोपकारी आणि या सिनेमामधला सर्वात श्रीमंत भारतीय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याची एकूण संपत्ती 3000 करोड असून ते Top 10 richest actors in india 2023 च्या यादीमध्ये तिसऱ्या नंबरवर येतात. ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1989 मध्ये आणि ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने त्यांच्या करिअरला एक यश मिळवून दिले. बॉलीवूडमध्ये त्याचे सगळ्यात जास्त फॅन्स आहेत असं रिपोर्टनुसार समजतं.
4) Aamir Khan :- आमिर खान बॉलीवूडमधला एक प्रतिभावान अभिनेता आहे ज्यांचे मुख्य उद्दिष्ट नेहमीच असे चित्रपट करायचे होते जिथे तो त्याच्या निर्दोष आणि परिपूर्ण अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाऊ शकतो. त्याच्या चित्रपटातील ॲक्शन सिक्वेन्स पाहण्यायोग्य आहेत लगान, यादों की बारात, कयामत से कयामत तक, रंग दे बसंती , थ्री इडियट इत्यादीसारख्या काही चित्रपटांमध्ये त्याच्या भूमिकेचे महत्त्वपूर्ण कौतुक केले गेले आहे. आमिर खान यांची एकूण संपत्ती 1500 करोड असून ते Top 10 richest actors in india 2023 च्या यादीमध्ये चौथ्या नंबरवर येतात.
5) Ram Charan :- दाक्षिणात्य चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्यापैकी एक अभिनेता म्हणजेच राम चरण. हल्लीच येऊन गेलेल्या त्याच्या RRR चित्रपटाने कमाईचे नवीन रेकॉर्ड सेट केले आणि ऑस्कर मध्ये देखील त्यांनी पुरस्कार मिळवले. राम चरण यांची एकूण संपत्ती 1370 करोड एवढी असून ते Top 10 richest actors in india 2023 च्या यादीमध्ये पाचव्या नंबरवर येतात. दाक्षिणात्य चित्रपटातील श्रीमंत अभिनेत्यापैकी एक ते आहेत आणि त्यांचे येत्या वर्षात खूप मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत.
6) Saif Ali Khan :- सैफ अली खान यांचे संपूर्ण कुटुंब बॉलीवूडमध्ये कार्यरत आहे त्याचे वडील जे तत्कालीन प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू होते. त्यांनी एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी विवाह केला त्यांच्या मुलाने म्हणजेच सैफने स्वतः आपल्या अभिनय कौशल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक यश मिळवले आहे. सैफ अली खान यांची एकूण संपत्ती 1200 करोड असून ते Top 10 richest actors in india 2023 च्या यादीमध्ये सहाव्या नंबरवर येतात.
7) Rajanikant :- दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातील आणखी एक प्रसिद्ध भारतीय अभिनेते ज्यांची अंदाजे एकूण संपत्ती 750 करोड असून ते Top 10 richest actors in india 2023 च्या यादीमध्ये सातव्या नंबरवर येतात. प्रसिद्ध चित्रपट ” शिवाजी द बॉस ” कोणीच विसरू शकत नाही त्यांच्या अभिनय आणि अद्वितीय कौशल्यासाठी त्यांना 2020 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2016 मध्ये पद्मविभूषण, 2000 मध्ये पद्मभूषण इत्यादी अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांनी त्यांच्या 5 दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत 160 हून अधिक चित्रपटांमध्ये अनेक भाषांमध्ये अभिनय केला आहे.1978 मध्ये आलेला ‘मुल्लम मलारम’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी ” काला ” “पेटा “.” जेलर ” सारखे चित्रपटही केले.
8) Akshay Kumar :- बॉलीवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार आपल्या ढासू एक्शन मधून लोकांना एनटरटेन करत असतो. वर्षातून किमान 4-5 सिनेमे रिलीज करणारा तो एकमेव बॉलीवूड अभिनेता आहे. आपल्या 30 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 742 करोड एवढी असून ते Top 10 richest actors in india 2023 च्या यादीमध्ये आठव्या नंबरवर येतात.
9) Amitabh Bacchan :- बॉलीवूडचा “डॉन ” म्हणजेच ” बिग बी ” यांना तर सगळेच ओळखतात बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध ऍक्टर्सपैकी एक म्हणजेच अमिताभ बच्चन आहेत. बॉलीवूडचा डॅशिंग अभिनेता म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात एकदा खूप निराशेने आणि संघर्षाने झाली होती परंतु ‘आनंद’ चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेने त्याला यश मिळाले. डॉन, सिलसिला, शोले इ. त्याचे काही प्रसिद्ध चित्रपट आहेत. त्य त्यांना त्यांच्या अभिनयासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इ. मिळाले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 410 करोड रुपये असून ते Top 10 richest actors in india 2023 च्या यादीमध्ये नवव्या नंबरवर येतात.
10) Hritik Roshan :- प्रसिद्ध दिग्दर्शक आणि ऍक्टर राकेश रोशन यांचा मुलगा आणि मोस्ट हॅण्डसम मेन चा किताब खूप वेळा पटकावणारा बॉलीवूडचा हॅण्डसम अभिनेता ह्रितिक रोशन अशी त्यांची ओळख आहे. ह्रितिक रोशन यांनी त्यांच्या डान्समुळे खूप मुलींना घायाळ केलंय ” काहो ना प्यार हे ” चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर त्यांच्या करिअरला ब्रेकथ्रू मिळाला. त्याचे बहुतेक चित्रपट त्याच्या वडिलांनी दिग्दर्शित केले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 375 करोड एवढी असून ते Top 10 richest actors in india 2023 च्या यादीमध्ये दहाव्या नंबरवर येतात.
मित्रांनो तुम्हाला Top 10 richest actors in india कोण वाटतं आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा
बॉलीवूड आणि मराठी सिनेमाच्या लेटेस्ट अपडेटसाठी चित्रपट चर्चला नक्की फॉलो करा