Ude Ga Ambe Serial :- स्टार प्रवाह वरील नवी मालिका “उदे ग अंबे” लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला या दिवशी होणार सुरु !
नुकतेच १ सप्टेंबर ला स्टार प्रवाह वाहिनीने ‘उदे ग अंबे’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसमोर आणला आणि या मालिकेची ओळख सर्वांना करून दिली. या मालिकेतून साडेतीन शक्तिपीठे व देवीची एतिहासिक माहिती प्रेक्षकांना मिळणार आहे. नक्की या मालिकेत काय काय असणार? कशाची माहिती मिळणार ? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. नुकतेच स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा दुसरा प्रोमो प्रेक्षकांचा भेटीला आणून मालिकेची तारीख व वेळ कळवली आहे. आता मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार तरी कधी याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. चला तर जाणून घेऊया या मालिकेबद्दल थोडक्यात माहिती.
Ude Ga Ambe Serial :- उदे ग अंबे या मालिकेत कोण कोण साकारणार भूमिका
स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या उदे ग अंबे मालिकेत आपल्याला अभिनेता देवदत्त नागे मुख्य भूमिका म्हणजेच भगवान शीवशंकराच्या भूमिकेत दिसणार आहेत.जवळपास १० वर्षानंतर ते या मलिकेनिमित्त स्टार प्रवाह वाहिनीवर झळकणार आहेत. त्यांच्याच बरोबर प्रमुख भूमिकेत आपल्याला अभिनेत्री मयुरी कापडणे दिसणार आहेत. आता हे कलाकार ‘उदे ग अंबे’ ही मालिका कशी पुढे नेतात व प्रेक्षकांच्या मना-मनात कशी पोहोचवतात यांकडे सगळ्यांच लक्ष लागणार आहे. तसं म्हणायला गेलं तर देवदत्त नागे यांची झी मराठीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेतील त्यांची मल्हार देवाची भूमिका लोकांना खूप आवडली होती त्यामुळे प्रेक्षकांना ‘उदे गं अंबे’ मालिकेतील त्यांची भगवान शंकराची भूमिका नक्कीच आवडेल यात काही शंका नाही.
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.)
Ude Ga Ambe Serial :- कोणती मालिका घेणार मग आता प्रेक्षकांचा निरोप ?
स्टार प्रवाह वाहिनीवर आता ‘उदे ग अंबे’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता ही मालिका कोणत्या मालिकेची जागा घेणार ह्या कडे प्रेक्षक वर्ग डोळे लावून बसला आहे. नक्की कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असा प्रश्न प्रेक्षक वर्गाला पडला आहे. मालिकांचा विचार करता नवी मालिका आल्यावर जुनी मालिका बंद केली जाते अथवा टी. आर. पी.च्या अनुषंगाने तिचा स्लॉट बदलला जातो.आता ‘उदे ग अंबे’ या नव्या मालिकेच्या प्रोमो मधून या मालिकेची वेळ सायंकाळी ६.३० अशी सांगितली आहे.
‘उदे ग अंबे’ मालिकेचा प्रोमो पहा इथे :-
या दृष्टीकोनाने विचार केला तर सध्या या वेळेत स्टार प्रवाह वाहिनीवर “मन धागा धागा जोडते नवा” ही सर्वांच्या आवडीची असणारी मालिका सुरू आहे. आता ही मालिका बंद होणार की तिचा स्लॉट बदलला जाणार ह्या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्या मालिकेच्या प्रोमो वर कमेंट करत “मन धागा धागा जोडते नवा” ही मालिका आपला निरोप घेणार अशी शक्यता सुद्धा काही प्रेक्षकांनी वर्तवल्या आहेत. आता सर्वांचे लाडके आनंदी आणि सार्थक प्रेक्षकांचा निरोप घेऊन त्याची जागा ‘उदे ग अंबे’ ही मालिका घेणार का ? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा !
Ganesh Chaturthi 2024 : झी मराठी वाहिनीवरील ‘या’ मालिकांमध्ये होणार गणेशोत्सव साजरा..
Ude Ga Ambe Serial :- मालिका नक्की केव्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ?
साडेतीन शक्तिपीठावर आधारित असलेली एतिहासिक परंपरा व तिची ओळख करून देणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय !! महाराष्ट्रात प्रत्येक घरात या साडेतीन शक्तिीठांच फार महत्त्व आहे. प्रत्येक घरात या साडेतीन शक्तिपीठां पैकी एक देवी कुलदैवत म्हणून घरात ठेवली जाऊन आपण तिचे पूजन करतो आणि ती आपल्या कुटुंबाचं आई प्रमाणे रक्षण करते. याचाच उद्देश लक्षात घेऊन नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर :उदे ग अंबे” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ११ ऑक्टोबर वाजता सायंकाळी ठीक ६.३० वाजता ही मालिका आपल्या भेटीला येत आहे. चला तर मग पाहुयात या साडेतीन शक्तिपीठाचे महत्व फक्त आणि फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर..
तुमच्या प्रत्रिक्रिया आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.
Table of Contents
अर्पिता पाटील या रुईया महाविद्यालयात बॅचलर इन मास मीडियामध्ये पहिल्या वर्गात शिकत असून त्या मनोरंजन आर्टिकल विषयावर लिहितात.