Brand New Upcoming Marathi movies 2025 : पुढच्या वर्षी येतायत नवनवीन मराठी चित्रपट आपल्या भेटीला वाचा कोणते ते..!

Upcoming Marathi Movies 2025 : चित्रपटाचे बदलते स्वरूप

पूर्वीच्या काळी चित्रपट समाज प्रबोधनाच माध्यम म्हणून वापरलं जायचं थोड्या काळानंतर चित्रपट मनोरंजनाच्या उद्दिष्टाने पाहिले जाऊ लागले बदलत्या काळानुसार चित्रपटांचे स्वरूप देखील बदललेले आपल्याला दिसून येत आहे. म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टीत देखील अनेक नवे बदल झालेले आपल्याला दिसून आले. प्रेक्षकांचे चित्रपटाकडे पाहण्याचे स्वरूप किंवा दृष्टिकोन देखील बदललेला आपल्याला दिसून येतो. हल्ली पूर्वीचाच काळ परत येतोय की काय असं वाटायला लागलंय आता चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक परिवर्तनाचे देखील माध्यम बनत चालले आहे..

चित्रपट जसा एखाद्याला हसवू शकतो तसेच अनेकांचे विचार देखील बदलू शकतो. बदलत्या काळानुसार चित्रपट हा सामाजिक,आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाचा एक भाग बनला आहे. बदलत्या काळानुसार चित्रपटाचे हे बदलते स्वरूप आपण स्वीकारले पाहिजे. हल्ली चित्रपटांमध्ये नवनवीन प्रकार आलेले आहेत जसं की हॉरर कॉमेडी, डार्क कॉमेडी, सायन्स फिक्शन सिनेमे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेलं सिनेमे आजकाल १००० कोटींचा गल्ला जमवायला लागलेयत या नवनवीन प्रकारांमुळे चित्रपट हा अधिक रंजक होतो.

प्रेक्षकांचे चित्रपटाकडे आकर्षण वाढते. दिग्दर्शक देखील चित्रपटांमध्ये प्रत्येक भागात काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. मग ती प्रेम कथा असो किंवा भयकथा प्रत्येकामधून काही ना काहीतरी नवीन माहिती प्रेक्षकांना मिळत असते. मराठी चित्रपटसृष्टीतले हे दिग्दर्शक हाच प्रयत्न घेऊन असे अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. आता हे नविन चित्रपट नक्की असणार तरी कोणते ? या चित्रपटातून दिग्दर्शक कोणती माहिती प्रेक्षकांना देणार ? हे नवीन चित्रपट प्रेक्षकांना आवडतील का ? अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे या संपूर्ण लेखातूनच तुम्हाला मिळतील त्यामुळे जास्त डोक्याला ताण देऊ नका मी सगळं समजावुन सांगते..

Upcoming Marathi Movies 2025 : मराठी चित्रपटसृष्टीत येणारे सिक्वेल्सचं वादळ..!

हिंदी सिनेमा सृष्टी प्रमाणेच मराठी सिनेमा सृष्टीत देखील प्रत्येक चित्रपटाचा सिक्वेल समोर येताना आपल्याला दिसत आहे. प्रेक्षकांचा चित्रपट पाहिल्यावर त्याचा सिक्वेल केव्हा येणार याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जास्त वाढलेला दिसून येतो. यामुळेच हिंदी चित्रपट सृष्टी प्रमाणे मराठी चित्रपट सृष्टी मध्ये देखील सिक्वेलने जोर धरलेला दिसून येतो. अशातच नुकताच धर्मवीर २ हा चित्रपट या महिन्यात आला त्यामुळे या पुढच्या वर्षी अनेक चित्रपटाचे सिक्वल आपल्या सर्वांच्या भेटील येत आहेत. दिग्दर्शक संजय जाधव यांनी हल्लीच त्याच्या सोशल मीडियावरून ” येरे येरे पैसा ३” या चित्रपटाची घोषणा केली त्यामुळे येरे येरे पैसा ३ साठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.) Upcoming Marathi Movies 2025

२०१३ साली आलेल्या सुपरहिट दुनियादारी चित्रपटाच्या सिक्वल म्हणजेच ” दुनियादारी २ ” या चित्रपटावर काम करत असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर आली आहे. त्याचबरोबर अंकुश चौधरी बऱ्याच वर्षाने साडे माडे तीन या चित्रपटाचे सिक्वेल कडे वळलेले आपल्या दिसून येतात. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव हे त्रिकूट पुन्हा एकदा सिक्वेल च्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. याचबरोबर जत्रा २ , देऊळ बंद २ , वाळवी २ , झोंबिवली २ , मुंबई पुणे मुंबई ४ यांच्या वर देखील काम सुरू असल्याची माहिती सर्व प्रेक्षकांना मिळाली आहे. तसेच कल्याणच्या सिक्वेलवर देखील आता काम सुरू असल्याची माहिती आपल्यासमोर आली आहे. आता हे सिक्वेल्स सर्वांसमोर केव्हा येतात ? कशाप्रकारे ते प्रेक्षकांचे मन जिंकतात ? याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे..

Upcoming Marathi Movies 2025
Upcoming Marathi Movies 2025 Credit :- Google Image

Upcoming Marathi Movies 2025 : चित्रपटाची गाठ बांधली इतिहासाशी

मनोरंजनाचे माध्यमं म्हणून पाहिलं जाणार साहित्य म्हणजे चित्रपट. या चित्रपटातून केवळ मनोरंजन न होता अनेक ऐतिहासिक माहिती देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. इतिहासातील अनेक घटना घडामोडी व्यक्ती याची सांगड घालून तयार केला जाणारा चित्रपट हा ऐतिहासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. इतिहासातील अनेक गोष्टींची माहिती प्रेक्षकांना नसते. पुरातन कालीन अशा काही घटना ज्या प्रत्येकाला माहित असायला हव्यात यांची सांगड घालून सध्या अनेक चित्रपट तयार केले जातात. प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात अशा चित्रपटांना प्रतिसाद देतात. सध्या अशाच चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

सध्या पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या ” फुलवंती ” या कादंबरीवर आधारित असलेला दिग्दर्शक स्नेहल तरडे यांचा चित्रपट लवकरच सर्वांच्या भेटीला येत आहे. त्याचप्रमाणे दिग्दर्शक रितेश देशमुख हे देखील लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ” राजा शिवाजी ” हा चित्रपट लवकरच सर्वांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटामध्ये रितेश देशमुख स्वतः मुख्य भूमिकेत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत हे सुरू असतानाच दुसरीकडे रवी जाधव यांचा ” बाल शिवाजी ” हा चित्रपट जोरदार तयारी करत असल्याची बातमी समोर आली आहे. त्याचबरोबर दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे हे अण्णाभाऊ साठे यांच्या “फकीरा ” या कादंबरीवर एक भन्नाट चित्रपट सर्वांचे भेटीला घेऊन येत असल्याची माहिती आपल्याला मिळाली. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे ” शिवाष्टक ” सिनेमासह ” मुक्ताई ” हा सिनेमा आपल्या सर्वांच्या भेटीला घेऊन येत आहेत.

नागराज मंजुळे यांच्या ” खाशाबा ” या चित्रपटाकडे देखील प्रेक्षक डोळे लावून आहेत. अशातच मंगेश मांजरेकरांच्या ” वेडात मराठी वीर दौडले सात “या चित्रपटाची देखील प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर भालचंद्र नेमाडे यांच्या ” कोसला ” कादंबरीवर आधारित देखील चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. “कोसला – शंभरातील नव्यांण्णवास”असे या चित्रपटाचे नाव आहे. असे अनेक चित्रपट लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षक आता या सर्व नवीन चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Upcoming Marathi Movies 2025
Upcoming Marathi Movies 2025 Credit :- Google Image

हेपण वाचा : Dharmaveer 2 review : जाणून घ्या कसा आहे प्रसाद ओक यांचा धर्मवीर २ वाचा संपूर्ण माहिती..!

Upcoming Marathi Movies 2025 : चित्रपटांबाबत बदलत आहे प्रेक्षकांची मागणी

बदलत्या काळानुसार चित्रपटाचे स्वरूप जसे बदलत चाललेले आहे त्याचप्रमाणे प्रेक्षकांचे चित्रपटाकडे पाहण्याचे दृष्टिकोन देखील बदलत असल्याचे आपल्याला दिसून येत आहेत. बदलत्या चित्रपटांचे प्रकारानुसार प्रेक्षकांची देखील चित्रपटांंबाबतची मागणी बदलत चाललेली आहे. आजचा प्रेक्षक हा सुजाण आणि जाणकार आहे म्हणूनच सिनेमा निर्माते अत्यंत विचार करून सिनेमा तयार करत आहेत. याचबरोबर सिनेमा निर्माते आपल्या चित्रपटामध्ये कौटुंबिक समस्या, सामाजिक समस्या, कौटुंबिक संघर्ष याचा समावेश आपल्या चित्रपटामध्ये करत आहेत. प्रेक्षकांच्या बदलत्या मागणीमुळे अशा अनेक घटकांना चित्रपटामध्ये स्थान मिळत आहे. आणि अनेक नवीन गोष्टींचा आस्वाद प्रेक्षकांना घेण्याचा अनुभव मिळत आहे.

Upcoming Marathi Movies 2025
Upcoming Marathi Movies 2025 Credit :- Google Image

आता हे आगामी चित्रपट कशी बाजी मारतील आणि प्रेक्षकांचे मन जिंकतील याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. अशाच नवीन नवीन अपडेट साठी चित्रपट चर्चा ला फॉलो करा आणि तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा !