vedaa box office collection day 4
बॉलीवूडचा एक्शन सुपरहीरो जॉन अब्राहम नेहमीच चाहत्यांसाठी एकापेक्षा एक असे एक्शन मूवी घेऊन येत असतो आणि त्याच्या एक्शन मूवीचे खूपच लाखो चाहते आहे. त्याचा शेवटचा चित्रपट बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानसोबत होता ज्यात त्याने खलनायकाची भूमिका लीलया पार पाडली होती. नुकताच त्याचा अजून एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हवा करतोय त्याचं नाव आहे “वेदा” ज्यामध्ये आपल्याला त्याच्यासोबत रोमान्स करताना दिसतेय मुंज्या चित्रपटातील मराठमोळी गोड अभिनेत्री “शर्वरी वाघ”.
बॉलीवूडमध्ये या एकाच आठवड्यात तीन मोठे चित्रपट रिलीज झालेयत त्यामध्ये जॉन शर्वरीचा “वेदा”, श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा “स्त्री २” आणि मल्टिस्टार कास्ट असलेला अक्षय कुमार याचा “खेल खेलमे”. त्यामुळे या पूर्ण पंधरा दिवस तरी बॉक्स ऑफिसवर या तीन चित्रपटामध्ये कलेक्शन वरून मस्त चढाओढ पाहायला मिळणार आहे. जर दिवसाच्या कमाईनुसार बघितलं तर अक्षयचा “खेल खेलमे” जॉन आणि शर्वरीच्या “वेदा”च्या पुढे आहे पण आतापर्यंतची टोटल कमाई जर पहिली तर “वेदा” “खेल खेलमे” ला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर येतोय.
(‘Chitrapat Charcha” चित्रपट चर्चा हे आपल्यासाठी चित्रपट विश्वातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. चित्रपट चर्चच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून चित्रपट चर्चाची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व चित्रपट चर्चा स्वीकारत नाही.) Veda box office collection day 4
vedaa box office collection day 4 :- शर्वरी आणि जॉनची करतायत सर्व तारीफ
‘वेदा” चित्रपटाची कथा राजस्थानमधल्या चालू असलेल्या जातीवादावर भाष्य करणारी आहे होय तुम्हाला माहितीय कि या आधी बॉलीवूडमध्ये जातीवादावर खूप चित्रपट येऊन गेले पण हा चित्रपट थोडा वेगळा आहे. वेदा नावाच्या मुलीला तिच्यासोबत गावात झालेल्या जातीपातीच्या अत्याचाराचा बदला घ्यायचा असतो आणि त्याच बदल्याच्या भावनेमुळे ती कशी जॉन अब्राहमकडे बॉक्सिंगची ट्रैनिंग घेते आणि गावातील उच्चं जातीविरुध्द कसा लढा लढते त्याबद्दल चित्रपट आहे.
त्यामध्ये बोलायचं झालं तर जॉन आणि शर्वरी या दोघांची जबरदस्त एक्टिंग चित्रपटाच्या कथेला थोडं वेगळं वळण देते. सगळ्यात जास्त उल्लेखनीय काम कोणाचं असेल तर ते अभिनेता अभिषेक बॅनर्जीचं त्याने “स्त्री २” या चित्रपटात विनोदी भूमिका केलीय आणि तो “वेदा” चित्रपटात खलनायकाची भूमिका करतोय. म्हणजे एकीकडे प्रेक्षकांना खळखळून हसवायचं आणि दुसरीकडे प्रेक्षकांना आपल्या गंभीर अभिनयाने खिळवुन ठेवायचं वाह रे वाह लोकांचं मन जिंकलस तू तर..! तर शर्वरी उर्फ वेदा जॉनच्या मदतीने कशाप्रकारे तिचा बदला पूर्ण करते ते तुम्हाला चित्रपट बघून समजेलच. चित्रपट खूप स्लो आहे असं वाटतं काही ठिकाणी चित्रपट खूप खेचलाय कारण चित्रपटात काही नको असलेले सीन दाखवलेत जे कट होऊ शकले असते. पण ओव्हरोल चित्रपट खूप जबरदस्त आहे जॉन, शर्वरी आणि अभिषेक बॅनर्जी या तिघांनी खूप अप्रतीम काम केलय.
Vedaa box office collection day 4 :- अक्षयच्या ‘खेल खेलमे’ चित्रपटाला टाकलं मागे
‘वेदा’ चित्रपट १५ ऑगस्ट्च्या दिवशी रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी चित्रपटाने ६.३० करोडचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी मात्र चित्रपटाने थोडी झुकती बाजू पहिली आणि फक्त १.८५ करोड कमावले. तर दुसरीकडे अक्षयच्या ‘खेल खेलमे’ ने पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अनुक्रमे ५.०५ करोड आणि २.०५ करोडची कमाई केली. तिसऱ्या दिवशी ‘वेदा’ने २.४५ करोडची मुसंडी मारली तर तिकडे ‘खेल खेलमे’ ने ३.१ करोड कमावले. चौथ्या दिवशी ‘खेल खेलमे’ ने ३.११ करोड कमावून या चार दिवसात आतापर्यंत जवळपास १३.३१ करोड कमावले असून ‘वेदा’ने चौथ्या दिवशी २.०७ करोड कमावून आतापर्यंत जवळपास १४ करोडच्या आसपास पोहोचले असं एका वृत्तावरून समजतेय. दोन्ही चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची अशी चुरशीची लढाई असल्यामुळे दोघांमध्ये सगळ्यात जास्त कोणाची कमाई होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
Vedaa box office collection day 4 :- चित्रपटाबद्दल थोडी माहिती घेऊया
‘वेदा’ चित्रपट दिग्दर्शित केलाय निखिल अडवाणी यांनी त्यात “जॉन अब्राहम, शर्वरी वाघ, अभिषेक बॅनर्जी, आणि आशिष विद्यार्थी यांची मुख्य भूमिका आहे. वेदा चित्रपटाच्या निर्मात्यांचा म्हणणं आहे कि हा खऱ्या घटनेवर आधारित चित्रपट आहे त्यामुळे चित्रपट बघताना तो तसा वाटातोदेखील. चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ, एम्माई एंटरटेनमेंट आणि जे. ए एंटरटेनमेंट यांनी केली असून एका दलित मुलीची प्रेरणादायी कथा अशाप्रकारेपण तुम्ही या चित्रपटाकडे पाहू शकता. वेदा चित्रपट तुम्ही एकदा फॅमिलीसोबत पाहू शकता अशी एक्शन पॅक मूवी आहे आणि जर तुम्ही जॉन अब्राहमचे हार्डकोर चाहते असाल तर हा चित्रपट तुमचाच आहे.
तुम्ही ‘वेदा’ चित्रपट पाहिलात का ? जर पहिला असेल तर तुमच्या प्रत्रिक्रिया आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चित्रपटाच्या नवनवीन घडामोडीसाठी चित्रपट चर्चाला फॉलो करायला विसरू नका.